IOCL Bharti 2024: इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 50 हजारांपर्यंत पगारासह करा आपल्या करिअरची सुरुवात!

IOCL Bharti 2024: आपण नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला एक चांगली कंपनी, चांगला पगार, आणि भविष्याबाबत सुरक्षितता हवी आहे का? मग तुमच्या या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी आता तुमच्या दाराशी आली आहे. होय, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या देशातील प्रतिष्ठित कंपनी द्वारे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनाच नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

IOCL Bharti 2024

IOCL Bharti 2024
IOCL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

पदाचे नाव: लॉ ऑफिसर इन ए ग्रेड (Law Officer in Grade A)
होय, तुम्हाला इंडियन ऑईलमध्ये लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज करता येणार आहे. आपण वकील असाल, आणि तुम्हाला कामाचा चांगला अनुभव देखील असेल, तर ही नोकरी तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकणार आहे!

पात्रता | IOCL Bharti 2024 Eligibility Criteria

इथे फक्त शिक्षणच नाही तर तुमच्या अनुभवालाही महत्त्व दिले जात आहे. पुढे आवश्यक असणाऱ्या अनुभवाबाबतची पात्रता देण्यात आली आहे:

न्यायालये किंवा न्यायाधिकरणांमध्ये वकील म्हणून काम केलेले उमेदवार
लॉ फर्म्समध्ये काम करणारे वकील
खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये सेवा केलेले उमेदवार
केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालयांमध्ये कार्यानुभव असलेले उमेदवार

वयोमर्यादा | IOCL Bharti 2024 Age Criteria

जर तुमचे वय हे 30 वर्षांपर्यंतचे असेल, तर या भरती साठी अर्ज करण्याची ही संधी तुम्ही अजिबात गमावू नका! इथेही शासनाच्या नियमांनुसार SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाईल.

हे देखील वाचा: Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक मधे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पगार 83,180/-…

निवड प्रक्रिया | IOCL Bharti 2024 Selection Process

या भरती प्रक्रियेसाठी PG CLAT 2024 परीक्षेत मिळवलेले गुण तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. होय, याच परीक्षेतील गुणांच्या आधारावर तुमची निवड केली जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्कमध्ये तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आणि शेवटी, तुमची मुलाखत घेतली जाईल, ज्याद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे.

वेतन | IOCL Bharti 2024 salary details

आता या पदासाठी पगाराची गोष्ट सांगायची तर, सुरुवात 50,000 प्रति महिना मूळ वेतनासह होईल. ही वेतनश्रेणी 50,000 ते ₹1,60,000 या दरम्यान असणार आहे. याशिवाय तुम्हाला महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्तेही मिळणार आहेत. हेच नव्हे तर, वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सुविधाही यासोबत मिळतील.

अर्ज कसा करायचा? | Appllication Process

  1. ऑनलाइन अर्जाची पद्धत: या पदांसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर (https://iocl.com/latest-job-openinghttps://iocl.com/latest-job-opening) भेट द्यावी लागेल.
  2. अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील माहिती भरावी लागणार आहे: – PG CLAT 2024 प्रवेशपत्र क्रमांक – PG CLAT 2024 अर्ज क्रमांक – जन्मतारीख – PG CLAT 2024 मध्ये मिळालेला स्कोअर

वरील सर्व माहिती योग्य प्रकारे दिल्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरू: सुरू झाली आहे!
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ऑक्टोबर 8, 2024

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment