सिंहगड किल्ला पुण्याजवळील सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग व ऐतिहासिक ठिकाण आहे. Sinhagad Fort history, तानाजी मालुसरेची शौर्यगाथा, अप्रतिम निसर्ग, आणि तेथील हॉटेल, स्टॉल्स व पर्यटकाची गर्दी पाहायला मिळेल, माझा Sinhagad trek YouTube व्हिडिओ नक्की पाहा!

Sinhagad fort | सिंहगड किल्ला
पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला किल्ल्यांचा राजा असेही म्हटले जाते. येथील हिरवीगार डोंगररांग, थंडगार हवा आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.
सिंहगड किल्ल्याचा इतिहास
सिंहगड किल्ला (कोंढाणा किल्ला) म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष! १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी दिलेल्या शौर्यपूर्ण लढाईमुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. म्हणूनच “गड आला पण सिंह गेला” ही अमर वाक्यं आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून राहिली आहेत.

किल्ल्यावर काय पाहावे?
तानाजी स्मारक
पुण्याचे सुंदर विहंगम दृश्य
गणेश दरवाजा, पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा
टिळक निवास, राजाराम महाराज स्मारक
डोंगराच्या कड्यावरून दिसणारे अप्रतिम सूर्योदय व सूर्यास्त 🌄
Sinhagad किल्यावर जाण्याचा मार्ग
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अगदी सरळ आहे, किल्यावर जाण्यासाठी तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता तसेच तुम्ही तुमची गाडी किल्याच्या पार्किंग पर्यंत घेऊन जाऊ शकता, किल्यावर मोठी पार्किंग असून तिथे जाण्यासाठी चार चाकी गाडी करिता १००/- रुपये तर दुचाकी गाडी करिता ५०/- रुपये दयावे लागतात.
Sinhagad fort distance : Sinhagad Ghat Rd, Thoptewadi, Maharashtra 412205
ट्रेकिंग आणि निसर्ग
सिंहगड किल्ला ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. सकाळी लवकर डोंगर चढताना मिळणारा निसर्गाचा आनंद आणि किल्ल्यावर मिळणारे झणझणीत कांदे भजी, पिठलं-भाकरी आणि ताक यांची चव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरते. Sinhagad Trek Distance बोलाल किल्यावर जाण्यासाठी दोन तास लागतात.
👉 माझा सिंहगड किल्ल्याचा संपूर्ण अनुभव पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा :
🎥
निष्कर्ष
इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंग यांचा एकत्रित आनंद घ्यायचा असेल तर सिंहगड किल्ला हा सर्वोत्तम पर्याय आहे. एकदा का तुम्ही या गडावर गेलात, की पुन्हा पुन्हा जायची इच्छा नक्कीच होईल.