Central Bank Of India Recruitment
Central Bank Of India Recruitment: आम्ही नेहमी नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येतच असतो. आज आम्ही आपल्यासाठीही अशीच एक उत्तम नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. कितीतरी जणांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असते आणि आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेने विविध पदांवर भरती सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या भरती अंतर्गत, योग्य उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
ही भरती प्रक्रिया ऑफिस असिस्टंट, सिक्युरिटी गार्ड आणि गार्डनर या पदांसाठी राबवली जात आहे. या पदांसाठी एकूण 13 पदे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी सगळ्या पात्र आणि योग्यता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच असणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे. आम्ही या पुढील लेखात या भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख संपूर्ण वाचा.
कोणत्या पदासाठी भरती आयोजित केली गेली आहे?| Central Bank Of India Recruitment Post Name
सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे फॅकल्टी ऑफिस असिस्टंट, अटेंडर वॉचमन, आणि गार्डनर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदांची संख्या | Central Bank Of India Recruitment Post Numbers
या भरती अंतर्गत 13 जागा उपलब्ध आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत.
अर्ज पद्धत | Central Bank Of India Recruitment Application Mode
या पदासाठी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज तुम्हाला करावा लागेल.
✅अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख | Last date to Apply?
अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच आहे.
हे देखील वाचू शकता: Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… एकूण 500 पदांवर भरती.., एवढा पगार सुद्धा मिळणार… असा करा अर्ज..
शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवार संगणक साक्षर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक असणार आहे. ऑफिस असिस्टंट या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला एमएम ऑफिसचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. वॉचमन आणि गार्डनर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण सातवीपर्यंत असणे आवश्यक असणार आहे.
Central Bank Of India Recruitment वय मर्यादा | Age Limit
या भरती अंतर्गत सहभागी होण्यासाठी 22 ते 40 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वेतनमान | Central Bank Of India Recruitment Salary Details
फॅकल्टी या पदासाठी वेतन मान: 30,000 रुपये प्रति महिना.
ऑफिस असिस्टंट या पदासाठी वेतन मान: 20,000 रुपये प्रति महिना
अटेंडर या पदासाठी वेतन मान: 14,000 रुपये प्रति महिना
मंडळी, आशा करतो ही Central Bank Of India Recruitment माहिती तुम्हाला समजली असेल, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील