Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेद्वारे एकूण 500 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. संपूर्ण भारतभरात ही रिक्त पदे भरली जातील. उमेदवार त्यांच्या मूळ राज्यातूनच यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, पात्रता, अर्ज तसेच निवड प्रक्रिया, पगार आणि सोबतच इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख कृपया शेवटपर्यंत नक्की वाचा.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ऑगस्ट 28, 2024
अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख: सप्टेंबर 17, 2024
देशभरात एकूण 500 पदे भरली जाणार आहेत. ही रिक्त पदे खालील प्रमाने आहेत.
- महाराष्ट्र – 56
- उत्तर प्रदेश – 61
- मध्य प्रदेश – 16
- बिहार – 05
- दिल्ली – 17
- झारखंड – 05
- छत्तीसगड – 04
- हिमाचल प्रदेश – 01
- हरियाणा – 07
- पंजाब – 10
- राजस्थान – 09
- तामिळनाडू – 55
- उत्तराखंड – 03
- आंध्र प्रदेश – 50
- ओडिशा – 12
- तेलंगणा – 42
- केरळ – 22
- अरुणाचल प्रदेश – 01
- पश्चिम बंगाल – 16
- कर्नाटक – 40
- जम्मू आणि काश्मीर – 01
- गुजरात – 56
- जा – 04
- चंदीगड – 03
Union Bank of India भरतीची ठळक वैशिष्ट्ये
- संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया
- पदाचे नाव: अप्रेंटीस/प्रशिक्षणार्थी
- एकूण रिक्त पदे: 500
- ऑफिशियल वेबसाइट: http://www.unionbankofindia.co.in
- श्रेणी – सरकारी नोकऱ्या
युनियन बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थींसाठी शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण.
युनियन बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थींसाठी वयोमर्यादा
- किमान वय 20 वर्षे
- कमाल वय 28 वर्षे
युनियन बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थी 2024 पगार | Salary
प्रशिक्षणार्थी एका वर्षाच्या कालावधीसाठी प्रति महिना रु 15,000/- स्टायपेंडसाठी पात्र असणार आहेत. इतर कोणतेही भत्ते/लाभ उपलब्ध नसणार आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थी 2024 साठी निवड प्रक्रिया | Selection Process
निवड पुढील निकषांच्या आधारावर केली जाणार आहे:
- ऑनलाइन चाचणी (objectives)
- स्थानिक भाषेबद्दलचे ज्ञान आणि चाचणी.
- प्रतीक्षा यादी
- वैद्यकीय तपासणी
हे देखील वाचू शकता: MUCBF Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी… महाराष्ट्र अर्बन बँकेत या पदांवर भरती सुरू… पदवीधर ठरणार पात्र…
Union Bank of India Recruitment 2024 परीक्षेचा नमुना
ऑनलाइन परीक्षेमधे चार चाचण्या असणार आहेत: सामान्य/financial awareness, सामान्य इंग्रजी, quantitative and reasoning aptitude आणि संगणक कौशल्ये.
Union Bank of India Recruitment 2024 notification
अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर जारी केली गेली आहे. नोटिफिकेशनमध्ये भरतीशी संबंधित असलेली सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
✅PDF जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट👉 | येथे क्लिक करा |
युनियन बँक ऑफ इंडिया ट्रेनी पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक | Application Links
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांसाठी एक महत्वाची सूचना आहे, ती अशी की सर्व उमेदवारांनी ते पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करून घ्यावी. बँक ॲप्रेंटिसशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फक्त सरकारी अप्रेंटिसशिप पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in आणि https://nats.education.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज कसा करावा? Application Process
🔸 उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 🔸 सर्व पात्र उमेदवारांनी सगळ्यात आधी भारत सरकारच्या प्रशिक्षण पोर्टलला भेट दिली पाहिजे:
🔸 NAPS या पोर्टल ला भेट देण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://www.apprenticeshipindia.gov.in (सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य) आणि NATS पोर्टल ला भेट देण्यासाठी या लिंक वर https://nats.education.gov.in (हे पोर्टल फक्त 1 एप्रिल 2020 नंतर जे उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले असतील त्या उमेदवारांसाठी असणार आहे) तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
1) सगळ्यात आधी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
2) त्यांनतर अर्ज करण्याच्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
3) यापुढे सगळी आवश्यक माहिती योग्य प्रकारे भरा.
4) शेवटी हा अर्ज तुम्ही सबमिट करा.
5) आणि सगळी आवश्यक कागदपत्रे सुद्धा जमा करा.
Union Bank of India Recruitment 2024 | अर्ज फी
- General/OBC रु. 600+ GST
- महिलांसाठी अर्ज शुल्क रु. 600+ GST
- SC/ST रु. 600+ GST
- PWBD रु. 400+ GST
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील
3 thoughts on “Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… एकूण 500 पदांवर भरती.., एवढा पगार सुद्धा मिळणार… असा करा अर्ज..”