Canara Bank Recruitment: कॅनरा बँकेत 3 हजार पदांसाठी भरती… पदवी पास उमेदवारांसाठी विशेष सुवर्णसंधी…

Canara Bank Recruitment
Canara Bank Recruitment

Canara Bank Recruitment: कॅनरा बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 3 हजार रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीमधे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

भरतीसाठी महत्त्वाची माहिती | Canara Bank Recruitment Recruitment Details

एकूण पदसंख्या | Total Post Number

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण 3 हजार शिकाऊ पदांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

वयोमर्यादा | Canara Bank Recruitment Age Criteria

अर्जदाराचे किमान वय हे 20 वर्षे, तर कमाल वय हे २८ वर्षे असणे आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादेची गणना ही 1 सप्टेंबर 2024 ला अनुसरून करण्यात येईल.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येईल.

हे ही वाचू शकता: State Bank Of India Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी…1511 पदांवर भरती सुरू…आताच अर्ज करा!

शैक्षणिक पात्रता | Canara Bank Recruitment Eligibility Criteria

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत | Canara Bank Recruitment Application Process

  • सर्वप्रथम, तुम्ही कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर www.canarabank.com वर जा आणि त्यांनतर “Recruitment” या पर्यायावर क्लिक करा.
  • दिलेली जाहिरात सविस्तर वाचा आणि त्यामधील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या. “Apply Online” वर क्लिक करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर त्याची एक प्रिंट आउट अवश्य घ्या आणि भविष्यासाठी जतन करून ठेवा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख | Last date to apply

ऑक्टोबर 4, 2024.

वयोमर्यादेमधे देण्यात आलेली सवलत | Age Criteria

आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. यासाठी, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महत्वाची सूचना | Important Note

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी. ही एक मोठी संधी आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

कॅनरा बँकेतील शिकाऊ पदांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी संधीचे सोनं करण्यासाठी तत्काळ अर्ज करावा.

हे देखील वाचू शकता: UMED MSRLM Recruitment 2024: या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी… महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत भरती सुरू… लगेचच अर्ज करा!

मंडळी, आशा करतो ही पोस्ट तुम्हाला समजली असेल, या पोस्ट मध्ये Canara Bank Recruitment अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 4, 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर घर बसल्या मोबाईल वर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment