State Bank Of India Bharti 2024: मंडळी जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु झाली असल्याचं दिसून येत आहे. SBI ने एकूण 1511 रिक्त पदांवर भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच या भरतीमध्ये डेप्युटी मॅनेजर (system) आणि असिस्टंट मॅनेजर (system) या दोन पदांचा समावेश आहे.
State Bank Of India Bharti 2024
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात नक्की वाचावी, कारण प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही 14 सप्टेंबर 2024 या तारखेपासून पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 04 ऑक्टोबर 2024 अशी देण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा. State Bank Of India Bharti 2024
State Bank Of India Bharti 2024 Post Details
✅पदांचे नाव👇 | ✅पदांची संख्या👇 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 |
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 |
असिस्टंट मॅनेजर (System) | 798 |
Total Post | 1511 |
अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख | State Bank Of India Bharti 2024 Last date to Apply
SBI भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आणि ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 04 ऑक्टोबर 2024 अशी निश्चित केली गेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता लवकरच या भरती अंतर्गत अर्ज भरून घ्यावा.
अर्ज शुल्क | Application fees
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्कसुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. ओपन आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 रुपये परीक्षा शुल्क आहे, तर मागासवर्गीय (SC/ST) उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपल्या श्रेणीच्या आधारे योग्य ते शुल्क भरावे.
हे देखील वाचू शकता: Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… एकूण 500 पदांवर भरती.., एवढा पगार सुद्धा मिळणार… असा करा अर्ज..
वयोमर्यादा | Age Limit State Bank Of India Bharti 2024
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे. ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट दिली जाईल. सरकारी नियमांनुसार ही सूट दिली जाते, त्यामुळे जर तुम्ही या श्रेणींमध्ये येत असाल तर अवश्य या सूटचा फायदा घ्या.
शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria State Bank Of India Bharti
पदाच्या आवश्यकतेनुसार या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या दोन्ही पदांसाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता आणि लागणारा अनुभव मूळ जाहिरातीत देण्यात आला आहे. त्यामुळे, आपली पात्रता तपासण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक नक्की वाचा.
नोकरीचे ठिकाण |Job Location State Bank Of India Recruitment
ही भरती विशेषतः नवी मुंबईसाठी होणार आहे. ज्यांना नवी मुंबईत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
निवड प्रक्रिया | SBI Selection Process
उमेदवारांची निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसारच पार पडणार आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण जाहिरात वाचणे अत्यंत गरजेचे आहे.
SBI मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी आता उपलब्ध झाली आहे. 1511 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. जर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर तात्काळ या भरती अंतर्गत अर्ज करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करा.
State Bank Of India Bharti Important Links
✅ऑफिशियल नोटिफिकेशन👉 | इथे क्लिक करा |
✅ऑनलाईन अर्ज लिंक👉 | इथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट लिंक👉 | इथे क्लिक करा |
निष्कर्ष–
या पोस्ट मध्ये State Bank Of India Bharti 2024 अंतर्गत 1511 पदांची भरती चालू आहे, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
3 thoughts on “State Bank Of India Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी…1511 पदांवर भरती सुरू…आताच अर्ज करा!”