CBI Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. CBI ने टीचिंग स्टाफ आणि वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्टपर्यंत Centralbankofindia.co.in या ऑफिशियल वेबसाइटवर अर्ज करू शकणार आहेत.
शिक्षक कर्मचारी आणि वॉचमन कम गार्डनर यांची 01 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे, परंतु असोसिएशन/ट्रस्टच्या विवेकबुद्धीनुसार आणि समाधानकारक कामगिरीच्या अधीन राहून या कालावधीत मुदतवाढ देण्यात येई शकते. उमेदवारांना दरभंगा आणि मधुबनी येथील RSETI केंद्रांवर ठेवण्यात येईल. CBI Recruitment 2024
वयोमर्यादा | CBI Recruitment 2024 Age Criteria
शिक्षक कर्मचारी उमेदवारांची वयोमर्यादा कमाल ६५ वर्षे असणार आहे आणि सोबतच ते निरोगीही असावेत. गार्ड कम गार्डनरसाठी किमान वय 22 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि कमाल वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.
पात्रता | CBI Recruitment 2024 Eligibility Criteria
शिक्षक कर्मचारी या पदासाठी, उमेदवारांनी ग्रामीण विकासात MSW/MA, MA समाजशास्त्र/मानसशास्त्र, B.Sc.(कृषी)/B.Ed सह BA असावे. उमेदवारांकडे संगणक कौशल्य आणि शिकवण्याची आवड असावी. गार्ड कम गार्डनर या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 7 वी उत्तीर्ण केलेली असावी.
निवड प्रक्रिया | CBI Recruitment 2024 Selection Process
या सेंट्रल बँकेच्या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वेतनमान: सेंट्रल बँकेच्या या भरती अंतर्गत या पदांसाठी निवड झालेल्या कोणत्याही उमेदवाराला 6,000 ते 20,000 रुपया पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा? | CBI Recruitment 2024 How to Apply?
इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार: CBI सफाई कर्मचारी भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक क्लिक करून तुमचा अर्ज भरावा लागणार आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी, IBPS द्वारे प्रदान केलेली अर्जाची लिंक https://ibpsonline आणी ibps.in/cbiskssnov23/ ही आहे, तुम्ही थेट या लिंक ला भेट देऊ शकता.
नवीन वेबसाइटला भेट दिल्यानंतर, “नवीन युजर नोंदणी” या ऑप्शन वर क्लिक करा.
आता तिथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर आवश्यक माहितीसह नोंदणी करावी लागेल.
ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीवर नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळेल.
आता यूजर आयडी आणि पासवर्ड चा पर्याय निवडून तुम्हाला लॉगिन करावं लागणार आहे.
लॉगिन केल्यानंतर, अर्जामध्ये आवश्यक माहिती प्रदान करा.
त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे योग्य आकारात आणि फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागणार आहेत.
कृपया दिलेल्या माहितीची पुन्हा एकदा पडताळणी करा आणि यानंतर दिलेले अर्ज शुल्क भरा.
शेवटी, या अर्जाची एक प्रिंटआउट देखील घ्या. CBI Recruitment 2024
हे देखील वाचू शकता: Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… जाणून घ्या पात्रता!
अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा
1 thought on “CBI Recruitment 2024: या पदांवर होणार भरती… 23 ऑगस्टपूर्वी करा अर्ज… एवढा पगार सुद्धा मिळणार… ही असेल पात्रता…”