7 Best Water Park In Maharashtra: यंदाच्या उन्हाळ्यात या सात वॉटरपार्कला जरूर भेट द्या !

7 Best Water Park In Maharashtra: उन्हाळा न आवडणारे भरपूर कारणं असतात पण याच उन्हाळ्यात २-३ अश्या गोष्टी असतात, ज्या गोष्टी बद्धल उन्हाळ्यात आकर्षण असत एक तर आंब्यांचा सीजन, दुसरं पोरांसाठी सुट्ट्या आणि तिसरं खास म्हणजे वॉटरपार्क.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Best Water Park In Maharashtra

7 Best Water Park In Maharashtra

गावाकडे कस मस्त उन्हात मित्र मंडळी सोबत विहिरीत उद्या मारणे नदीत पोहणं असे ऑपशन असतात, पण शहरात मात्र अशी काय मज्जा मिळत नाही. पण शहरातील लोकांसाठी एकच ऑपशन तो म्हणजे उन्हाळ्यात वॉटरपार्क ची धम्माल, उन्हाळ्यात पोरांना सुट्या लागल्या कि नुसते प्लॅन बनवत आपल्या मित्र किंवा फॅमिली सोबत वॉटरपार्कस मध्ये जाऊन जेवढ्या राइड्स आहेत सर्वांची मज्जा घेत वॉटरपार्क मध्ये धम्माल करायची.

तुमच्या अश्याच प्लांनिंगचं काम सोपं करण्यासाठी धम्माल करण्यासाठी आज मी सांगणार आहे महाराष्ट्रातील काही बेस्ट वॉटरपार्कस जिथे यंदाच्या उन्हाळ्यात नक्की जाऊ शकता. वॉटरपार्क ला जाण्याअगोदर त्या वॉटरपार्कची संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये वाचून घ्या जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या शब्धात समजतील आणि गोष्टी सोप्या वाटतील.

वॉटरपार्कचा वेळ, वॉटरपार्कची एन्ट्री फीस, वॉटरपार्क लोकेशन, रेटिंग्स, नक्की हे वॉटरपार्कस कसे आहेत बजेट फ्रेंडली आहेत का या सर्वबद्धलची माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, आता उन्हाळा सुद्धा येतोय यातच सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक असो किंवा विकेन्डर हे नवीन नवीन किंवा माहित नसलेल्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात त्याच बरोबर विकेन्डर वीकएंड स्पेंड करण्यासाठी बेस्ट वॉटरपार्कस शोधत असतात.

पहिला Best Water Park In Maharashtra लोणावळा जवळील

Wet n Joy Water Park

या Wet n Joy Water Park च नाव आलं कि लोक पाहिलं wet n joy water park ticket price असं शोधतात याच प्रकारची सव माहिती आपल्या या ब्लॉग मध्ये मिळणार आहे, वॉटरपार्क ला जात असाल तर त्या बद्धलची संपूर्ण माहिती इथंच जाणून घ्या ज्याने करून तुम्हाला हे वॉटरपार्कस नक्की आहेत तरी कसे हे समजेल, Wet n Joy Water Park हे भारतातलं सर्वात मोठं वॉटरपार्क असं आपण म्हणू शकतो, इथे फूडबॉल स्टेडियम च्या आकाराचं म्हणजेच जवळपास ६० हजार square feet चा वेवपुल आहे जिथे तुम्ही मस्त पोहू शकता मस्त चिल करू शकता.

या वॉटरपार्क मध्ये २५ सलाड्स आहेत तसेच हे वॉटर पार्क सर्व वय गटातील लोकांसाठी सुटेबल आहे. या १० हजार square feet असंख्य स्लाइड्स आहेत. जर तुम्हाला फॅमिली बरोबर राइड्स ची मज्जा घ्याची असेल तर मेघगर्जनेच्या लाटा म्हणजे thunder waves, फंगामा, रॉयल कॅसल, रेन डान्स, आळशी नदी म्हणजेच lazy river इ. शिवाय चक्रीवादळ,आकाशात पडणे, फ्री फॉल, चक्रीवादळ, बूमरँग, मास्टर ब्लास्टर इ, राइड्स आहेत, यांचा आनंद तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत घेऊ शकता.

Wet n Joy Water Park Ticket Price Adults :999 , College Students : 799
Wet n Joy Water Park Activity Timings 10:00 AM – 06:00 PM
Wet n Joy Water Park Rating चांगल्या आहेत
Wet n Joy Water Park Address Old Pune Mumbai Highway, NH-4 Post-Takve, Mundhaware

Read More – One day trek places near mumbai

दुसरा Best Water Park In Maharashtra सुरज वॉटर पार्क

Suraj Water Park Mumbai

उन्हाळ्यात वॉटरपार्क चा विषय चालाय आणि सुरज वॉटरपार्क च नाव नाही विषय आहे का भावांनो, सुरज वॉटर पार्क बद्धल बोलणं झाल्यास मुंबई मधील ठाणे जिंक्यमधील सर्वाना माहित असणारा हा वॉटरपार्क खूप जणांच्या लहानपणाची आठवण करून देतो. एवढंच काय मित्रांनो ६ वेळा लिमका बुक वर्ल्ड त्याच बरोबर राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पुरस्कार जिंकल्या मुले हे वॉटर पार्क महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जाते, हे वॉटरपार्क ११ एकरावर पसरलेलं आहे आणि सर्व वय गटातील लोकांसाठी आहे.

ह्या वॉटरपार्कची रचना कॅनडाच्या व्हाईट वॉटर वेस्ट इंडस्ट्रीजने केली आहे. या वॉटर पार्क मध्ये अनेक रिडेसी आहेत ज्यांची नाव पण मजेशीर आहेत जस कि, धड़कन सबके दिल की, Ding Dong Sing Song, Labak Zabak Matak Slide, Rainbow Slides, Rim-Zim Baarish Hall, Ulat Palat, Wave Pool, Har Har Ganga, Shiv Ganga अश्या खतरनाक राइड्स मज्जा घेता येणार आहे.

Suraj Water Park Ticket Price Adults : 1000 /- , Kids :800 /-
Suraj Water Park Activity Timings 10:00 AM – 06:00 PM
Suraj Water Park Rating चांगल्या आहेत
Suraj Water Park Address Dongripada, Thane West, Thane, Mumbai, Maharashtra

 

तिसरा Best Water Park In Maharashtra पुण्याचं कृष्णाई वॉटर पार्क

Krushnai Water Park Pune

हे वॉटरपार्क सिहंगडाच्या आणि खडक वासला धरणाच्या मधोमध आहे, या वॉटर पार्क मध्ये सर्व वय गटातील व्यक्तीसाठी वेगवेगळ्या स्लाईडस उपलब्ध आहे, इथलं मुख आकर्षण म्हणजे फनेल आणि टनेल हे रिसॉर्ट च्या अगदी टोकाला आहे, शिवाय मुलांसाठी सेपरेट पूल आणि स्लाईड्स आहेत, त्याच बरोबर इथे Wave Pool, Crazy Cruise, Aqua Dance, अजून. इथे सुद्धा Game Zone आहे जे पार्क मध्ये आहे तिथे तुम्ही विडिओ गेम खेळू शकता, ride the bull ride, and play with dashing cars इत्यादी अक्टिव्हिटीस पुण्याच्या कृष्णाई वॉटर पार्क मध्ये उपलब्ध आहेत.

इथे तुम्हाला शु रॅक कपड्यासाठी लॉकर या सारखा आवश्यक गोष्टी ५० ते १०० रुपये भाड्याच्या आधारे मिळतात, इथला वेव्ह पूल तर एवढा मोठा आहे तुम्हाला समुदारात पोहोल्याचा फील येतो, बाकी इथे नॉर्म सलिएड्स तर आहेतच शिवाय इथे तुम्ही पार्टी आणि इव्हेंट्स होस्ट करू शकता. आणि रिसॉर्ट मध्ये राहू शकता, शिवाय तुम्ही इथे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी Relish Local Cuisines या रेस्टोरंटला भेट देऊ शकता.

Krushnai Water Park Ticket Price Adults : ७००-८०० /- , Kids: ५००-६०० /-
Krushnai Water Park Activity Timings 10:00 AM – 06:00 PM
Krushnai Water Park Rating चांगल्या आहेत
Krushnai Water Park Address Old Pune Mumbai Highway, NH-4 Post-Takve, Mundhaware

 

चौथा Best Water Park In Maharashtra फन एन फूड व्हिलेज नागपूर

Fun N Food Village Nagpur

फन एन फूड व्हिलेज हे नागपुरातील एक मनोरंजन आणि वॉटर पार्क आहे, फन एन फूड व्हिलेज या वॉटर पार्क मध्ये वाटर स्लाइड हे भारतातलं सर्वात मोठे कलेक्शन आहे, यात aqua पार्क च्या ऍक्टिव्हिटी मोठा वेव्ह पूल ऍक्शन रिव्हर, गेमिंग झोन, किड्स प्ले एरिया असं सर्व आहे, ३६०० चौ मी वेव्ह पूल वॉटर पार्क च्या मधोमद आहे, इथे फन स्लाईड्स आणि थ्रिल स्लाईड्स असे दोन प्रकारचे खतरनाक स्लाईड्स आहेत.

त्याच बरोबर मित्रांनो jacuzzi, spa and sauna पर्याय आहेतच तसेच भेटवस्तूंचे दुकान तुम्ही भेटवस्तू व आठवण म्हणून काही तरी खरेदी करू शकता, तसेच इथे हेल्थ क्लबचा आनंद देखील घेऊ शकतो. उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात जेथे एक मजेदार संध्याकाळचा आनंद घेता येतो.

Fun N Food Village ticket price Adults : १००० /- , Kids: ८०० /-
Fun N Food Village Water Park 10:00 AM TO 4:00 PM
Fun N Food Village Amusement Park 4:00 PM TO 7:00 PM
Fun N Food Village Rating चांगल्या आहेत
Fun N Food Village Activity Location Amrawati Road, Dist Nagpur, Bajargaon

 

पाचवा Best Water Park In Maharashtra शुभम वॉटर वर्ल्ड नाशिक

Shubham Water World Nashik

या वॉटर वर्ल्ड मध्ये चौदा प्लॅटफॉर्म वाली अकॅव्हिटी सिस्टिम आहे जर तुम्हला थरारक अनुभयच असेल तर तुम्ही शुभम वॉटर वर्ल्ड ला भेट देऊ शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे थरारक स्लायडिंग आहेत, शुभम वॉटर वर्ल्ड हे 16 थरारक वॉटर राइड्सचे घर आहे. इथे लहान-मोठे, तरुण आणि वृद्ध सर्व भेट देऊ शकतात, पार्किंगची सोया सुद्धा उपलब्ध आहे, शुभम वॉटर वर्ल्ड नाशिक पोहोचण्याकरिता मॅप चा वापर करू शकता.

मित्रांनो नाशिक मध्ये असाल तर शुभम वॉटर वर्ल्ड इथे जरूर भेट द्या मोठा वॉटर पार्क असून बजेट फ्रेंडली वॉटर पार्क आहे. तिकीटात दुपारचे जेवण आणि अमर्यादित पॉपकॉर्न सुद्धा देतात. शुभम वॉटर वर्ल्डला प्रत्येक थरार प्रेमींनी भेट देणे आवश्यक आहे. इथे पोहोचायचं असल्यास पत्ता असा काही आहे शुभम वॉटर वर्ल्ड, जाधव पॅराडाईज, अंजेनारी हिल्स, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड.

Shubham Water World Nashik Ticket Price Adults : ५५० /- kids : फ्री
Shubham Water World Nashik Timing सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:००
Shubham Water World Nashik Rating चांगल्या आहेत
Shubham Water World Activity Location Jadhav Paradise, Anjeneri Hills, Nashik-Trimbakeshwar Road

 

सहावा Best Water Park In Maharashtra शिवतेज वॉटरपार्क कोल्हापूर

Shivtej Water park & Adventures

मुळात या शिवतेज वॉटरपार्क च लोकेशन एवढं सुंदर आहे बाकी काही लागतच नाही हे वॉटर पार्क आहे पन्हाळा फोर्ट जवळ, इथे भारसात स्लाईड्स आणि रिडेसी नाहीत पण ज्या आहेत त्या सु स्थितीत आहेत, या वॉटरपार्क ला गेल्या तुम्ही तुमचा वेळ निवांत घालू शकता, तुम्ही कोल्हापूर जवळ असाल आणि वने डे औटींग किंवा वने डे पिकनिक प्लॅन करायची असेल तर हि एक नंबर जागा आहे.

Shivtej Water park Ticket Price Regular 400/- to 500/-
shivtej water park kolhapur timing 10 AM to 3PM
Shivtej Water park Rating Best Waterpark in Kolhapur
Shivtej Water park Address Gat No 358/3, Panhala, Kolhapur

 

सातवा Best Water Park In Maharashtra H2O Water Park

Chhatrapati Sambhaji Nagar H2O Water Park

H2O Water Park मध्ये तुम्हाला अनेक राइड्स स्लाईडस ट्राय करायला मिळतील, इथे साधं स्वामिंग पूल आहेत शिवाय रेन डान्स, वेव्ह पूल आहे एक सायक्लॉन म्हणून प्रकार आहे साहसी खेळ बाबत सांगायचं झालं तर ४० ड्रॉप स्लाईड्स आहेत लहान मुलांसाठी स्पेसिअल किडी स्कूल आहे, समजा तुम्हाला राहण्याची इच्छा झाली तर या पार्क मध्ये विशेष सोया आहे.

H2O Water Park Ticket Price Regular 600/- to 500/-
H2O Water Park Activity Timings 10:00 AM to 6:00 PM
H2O Water Park Rating Best Waterpark in chhatrapati sambhaji nagar
H2O Water Park Address Near Daulatabad Fort 14 Kms Stone, chhatrapati sambhaji nagar 431002

Conclusion:-

तर हे होते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील उत्तम अशी 7 Best Water Park In Maharashtra अगदी हि लिस्ट वाढू तशी जास्त वाढते imagica water park, water kingdom, mumbai शिवाय tikuji ni wadi water park सारखी अजून अनेक वॉटर पार्क आहेत जिथे या उन्हाळ्यात जाऊन येऊ शकता बाकी कंमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुमच्या लिस्ट मधली नाव टाका राहा तसेच हा लेख तुमच्या मित्र परीवाला शेअर करायला विसरू नका धन्यवाद..

FAQ :-

Ques -१ महाराष्ट्रातील सर्वात मोठे वॉटर पार्क कोणते आहे?

तसे तर आपल्या महाराष्ट्रात सर्वच वॉटर पार्क मोठे आहे पण जर उत्तर सांगायचं झाल्यास ” वॉटर किंग्डम मुंबई ” हे आतापर्यतच सर्वात मोठं वॉटर पार्क आहे.

Ques -२ भारतातील प्रथम क्रमांकाचे वॉटर पार्क कोणते आहे?

मित्रांनो भारतातील एक नंबर च वॉटर पार्क लोक इंटरनेट वर खूप शोधत आहेत याच उत्तर हि आपलं या ब्लॉग मध्ये इथेच देणार आहोत, भारतातील नंबर एक च वॉटर पार्क सुद्धा वॉटर किंग्डम आहे जे आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आहे ज्याला पार्ट ऑफ Esselworld म्हणतात.

Ques -३ आतापर्यंतचा सर्वोत्तम वॉटर पार्क कोणता आहे?

१. Chimelong Water Park, Guangzhou, China. २. Typhoon Lagoon, Disney World, Florida, US. ३. Blizzard Beach, Disney World, Florida, US. ४.Therme Erding, Erding, Germany. ५.Thermas dos Laranjais, Olimpia, Brazil. ६. Atlantis Aquaventure, Paradise Island, Bahamas हे आहेत आतापर्यंतचा सर्वोत्तम वॉटर पार्क.

Ques -४ जगातील सर्वात जुने वॉटर पार्क कोणते आहे?

Lake Compounce: 1846 मध्ये उघडलेले, हे युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुने सतत कार्यरत मनोरंजन उद्यान आहे. हे 332 एकर (134 हेक्टर) मध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये प्रवेशाच्या किंमतीमध्ये एक समुद्रकिनारा आणि क्रोकोडाइल कोव्ह नावाचे वॉटर पार्क समाविष्ट आहे..

Ques -५ मुलांसाठी कोणता वॉटर पार्क सर्वोत्तम आहे?

जर तुम्ही सर्वात चांगले लहान मुलांसाठी आणि फॅमिली साठी वॉटरपार्क बघत असाल तर बदलापूर मधील शांती सागर रिसॉर्ट आणि वॉटर पार्क आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता आणि हे वॉटर पार्क लहान मुलांसाठी चांगले सुद्धा आहे.