18 best mumbai tourist places | मुंबई मधील प्रसिद्ध आणि छान ठिकाणं

 

 
Mumbai Tourist Places : ‘ए दिल हैं मुश्किल जिना यहाँ, जरा हटके जरा बचके ये मुंबई मेरी जान’ ६० च्या दशकात जॉनी वॉकरवर मुंबईतील रस्त्यांवर चित्रित झालेलं हे गाणं आजही अनेकांच्या तोंडी असतंच.
 

Mumbai Tourist Places, मुंबई मधील प्रसिद्ध आणि छान ठिकाणं

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

काय नाही या शहरात? तुम्ही मागाल ते मिळेल अशा या मुंबईत अनेक लोकांची पोटं भरली जातात. जितके हे शहर कामासाठी प्रसिद्ध आहे तितकेच ह्या शहरात tourist places देखील अनेक आहेत. मुंबई बाहेरच्या अनेक शाळांमध्ये दरवर्षी मुंबई दर्शन ही सहल आयोजित केलेली असतेच पण त्यात मर्यादित स्थळेच दाखवली जातात. मुंबईत खरंतर अनेक ठिकाणं आहेत जी अनेक मुंबईकरांना माहिती नाहीत.

त्यात गेल्या वर्षी  कोरोनामुळे सर्वात जास्त फटका पर्यटन क्षेत्राला झाला आहे आज बऱ्यापैकी  परिस्थिती रुळावर येत आहे, तरी लांब प्रवास करणे लोक टाळत आहेत.तर ह्यांचं मुंबईकरांना त्यांच्याच शहरातील पर्यटनस्थळ कोणती आहेत जिथे आज सहज जाऊ शकतो अशा पर्यटनस्थळाबद्दल जाणून घेऊयात.

हे देखील वाचू शकता : One day trek places near mumbai

Mumbai tourist places मुंबई पर्यटन स्थळे :

मुंबई वर पहिल्यापासूनच पोर्तुगीज, इंग्रज या लोकांची सत्ता असल्याने तसेच मुंबईत येणाऱ्या जातीधर्माच्या लोकनी आपल्या संस्कृतीचे दर्शन पर्यटनस्थळामध्ये दिसून येते.  
 

१. गेटवे ऑफ इंडिया

 
भारताचे प्रवेशद्वार हे उल्लेखनीय चिरकालीन स्मारक असून त्याचे architecture एका मराठी माणसाने केले आहे. सन १९११ मध्ये किंग जॉर्ज (पाच) आणि राणी मेरी यांनी भारतास भेट दिल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.
या भागामध्ये एलिफंटा बेट आणि बंदराच्या आसपास अन्य समुद्रकिना-यांवर जाण्याकरिता बोट सेवादेखील आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर असे जुने आणि नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे.
 

२. एलिफंटा लेणी

 
१९८७ मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तु ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी असंख्य स्थानिक आणि परकीय पर्यटक भेट देत असतात.
पोर्तुगीजांनी या लेणीस घारापुरी ऐवजी एलिफंटा असे आधुनिक नाव दिले. एलिफंटातील त्रिमुर्ती शंकराचे त्रिमुख ब्रम्ह, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडविते.
येथे अन्य शिल्प नटराज आणि सदाशिव यांच्या उठावांचे आणि अर्धनारीश्वराच्या भव्य नक्षीकामाचे दर्शन घडविते.गेटवे वरून येथे जाणयासाठी बोटी सुटतात.
 

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)

 
मुंबईमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयाकरिता हे फार महत्वाचे स्थानक आहे. हे भारतातील एक सर्वात व्यस्त स्थानक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत सुंदरतेचा नमुना असून आज जगामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्टया एक सुंदर स्थानक म्हणून गणले गेले आहे.
 

४. समुद्रकिनारे 

 
मुंबई मुळात सात बेटांवर वसली असल्याने सभोवताली अरबी समुद्र आहेच त्यामुळे समुद्रकिनारी फिरणे साहजिकच होणार.
मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बॅण्डस्टॅण्ड या ठिकणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. वीकेंडसाठी हा एक मस्त पर्याय आहे.
 

५. चैत्यभूमी

 
चैत्यभूमी ही दादर येथे असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनविली आहे.
दर वर्षी ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दिवशी देशभरातून हजारो लोक या भारतीय घटनेच्या शिल्पकारास आदरांजली वाहण्यास येत असतात.
 

६. हाजी अली

 
हाजी अली दर्गा वरळी भागात वसला आहे. मक्का येथे यात्रेस जाताना आपले प्राण गमाविणा-या मुस्लिम संतांच्या स्मरणार्थ ही मशिद उभारण्यात आली आहे.
दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. या दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूने समुद्र हा सहलीच्या यात्रेचा विलोभणीय क्षण आहे.
 

७. जहांगीर कला दालन

 
कलाप्रेमी आहात? मग या ठिकाणाला तुम्ही भेट दिलीच पाहिजेत.
काळाघोडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाजवळ असलेले हे दालन मुंबईच्या कलाकारांकरिता समकालीन कला दाखविते.
पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून के.के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या इच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी त्याची स्थापना केली होती. या वास्तुत सातत्याने नवोदित कलाकारांसह ज्येष्ठ कलाकरांची कला प्रेक्षकांना अनुभवता येते.
 

८. कमला नेहरु उद्यान

 
मलबार टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या उद्यानास भारताच्या प्रथम पंतप्रधानांच्या पत्निचे नाव देण्यात आले आहे.
१९५२ मध्ये खुले झालेल्या उद्यानातून मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीचा चहूबाजूचा परिसर परिसर पहायला मिळतो.
 

९. महालक्ष्मी मंदिर

 
भुलाभाई देसाई मार्गावर स्थित असलेले हे मुंबईतील सर्वात प्रसिध्द मंदिर संपत्तीची देवता महालक्ष्मीकरिता बांधले आहे.
साधारण १७८५ मध्ये बांधलेले ह्या मंदिराचा इतिहास हॉर्नबाय वेलार्डच्या इमारतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
 

१०. महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)

 
खरेदी करणा-यांसाठी पर्वणी म्हणजे क्रॉफर्ड मार्केट! मायानगरीत आलात आणि खरेदी केली नाहीत तरच नवल! तिथे अनेक प्रकारच्या वस्तू घाऊक प्रमाणात मिळतात.
हात्मा ज्योतिबा फुले मंडई किंवा क्रॉफर्ड मार्केट हे नाव बाँम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले.
 

११. तारापोरवाला मत्सालय

 
तारापोरवाला मत्सालय हे शहरातील एकमेव मत्सालय आहे. सन १९५१ मध्ये बांधकाम झालेल्या या वास्तुत समुद्र आणि तलावातील मासे पहावयास मिळतात.
हे मत्सालय प्रसिध्द मरीन ड्राईव्ह येथे स्थित आहे.
 

१२. मलबार टेकडी

 
मलबार टेकडी हे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण. टेकडीवर वाळकेश्वर मंदिर असून त्यांचे संस्थापक राजे सिलहारा होते. पोर्तुगीजांनी मंदिर उध्वस्त केले होते परंतु रामा कामत यांनी १७५० मध्ये ते पुन्हा बांधले. 50 मीटर(80 फूट) असून मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे.
मलबार टेकडी हे शहरातील जास्त गर्दीचा निवासी भाग असून उद्योग जगतातील आणि करमणूक क्षेत्रातील मोठया व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत.
 
राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि वर्षा बंगला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थानही येथे आहे.
 

१३. मणी भवन

 
साधं आणि सुंदर संग्रहालय म्हणून याची ओळख आहे. महात्मा गांधीनी १९१७ ते १९३४ या कालावधीत मुंबईस भेट दिली त्यावेळेस गांधीजी येथे राहत असत. मणीभवन येथे गांधीजींची खोली आणि ते वापरत असलेल्या वस्तुंसहित पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवल्या असून हे संग्रहालय लेबरनम मार्ग, ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ स्थित आहे.
 
मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.
 

१४. नेहरू तारांगण

 
ज्यांना अवकाश आणि खगोलशास्त्रांत रुची असल्यास त्यांनी इथे आवश्य भेट द्यावी. इथे आल्यावर एक अद्भुत जगात आपण वावरतो.
तारांगणाच्या घुमटात ६०० लोक बसू शकतात. अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या मदतीने आपल्याला पहायला मिळते.तसेच नेहरू तारांगण ची इमारत ही वैशिष्ठ्यपूर्ण आहे.
 

१५. राणीची बाग 

 
लहान मुलांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे  प्राणीसंग्रहालय आणि उद्यान! मुंबईच्या मध्यभागी भायखळा येथे स्थित असून त्यास राणी जिजाबाई उद्यान किंवा राणीबाग म्हणून ओळखले जाते.
 

१६. व्हिक्टोरियन इमारती

 
‘फोर्ट भागातील जुन्या इमारती पाहून अस्सल मुंबईकर हळहळतो’ असे पुलंच्या मुंबईकर मधील वाक्य आहे, जे तंतोतंत पटणारे आहे.
 
फोर्ट भागात अनेक जुन्या इमारती आहेत ज्यां आजही सरकारी कार्यलये म्हणून वापरल्या जातात. राजाभाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, जुने सचिवालय आणि एका शेवटच्या भागात शास्त्रीय संस्था यासहित मुंबई विद्यापीठ इमारत, सेंट थॉमस कॅथेड्रल, दि एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे वा टाऊन हॉल, पोलिस महासंचालकांचे कार्यालय, मुख्य पोस्ट कार्यालय. नुसत्या इमारती न बघता तर त्यावरचे नक्षीकाम बघण्यासारखे आहे. प्रामुख्याने गॅथेलिक शैलीमधील बांधकाम आहे.
 

१७. हुतात्मा चौक

 
फ्लोरा फाऊंटन हे जुन्या चर्चगेटच्या बॉम्बे फोर्टजवळ उभे असून त्यास हुतात्मा चौक असे म्हटले जाते.
 
बाँम्बेचे माजी राज्यपाल सर बार्टले फ्रेर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले असून नंतर ग्रीक देवता प-लोराचे नाव देण्यात आले.
 

१८. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

 
भारतीय संस्कृचे दर्शन घडवणारे हे संग्रहालय आहे अनेक पुरातन वस्तू इथे पाहण्यास मिळतात. हे ठिकाण अभ्यासकांचेही आवडते ठिकाण आहे. एकदा का आत प्रवेश केला तर पुढे पुढे जात वेळ केव्हा संपतो आणि ३-४ तास कसे निघून जातात, ते कळत नाही.
 
अनेक ट्रॅव्हल संस्था मुंबई दर्शन नावाची एक दिवसीय सहल आयोजित करतात .
 
मुंबई मध्ये अनेक जण कामासाठी येतात, पैसे कमवण्यासाठी येतात पण ह्या शहरातील पर्यटनस्थळे फार कमी लोक पाहतात.
 
सुपर फास्ट जगणाऱ्या या शहराला कोरोनाने थांबवले होते पण आता पुन्हा एकदा हे शहर वेग घेत आहे. अनेक परदेशी पाहुणे मुंबईला भेट देत असतात त्यांच्या बरोबरीने आपण ही हे ‘शहर’आणि त्याची संस्कृती जाणून घेण्यासाठी पाहिले पाहिजे.
 
तसेच मित्रांनो कशी वाटली ही 18 best mumbai tourist places मुंबईतील झकास १८ ठिकाणं माहिती जर आवडल्यास ही माहिती आपल्या मित्र मंडळी आणि परिवार मध्ये जरूर share करा…
 
धन्यवाद…

Leave a Comment