One day trek near mumbai

मुंबई जवळील ५ एकदिवसीय ट्रेक ठिकाण 

 

Top 5 Place: One day trek near mumbai

One day trek near mumbai
ट्रेकिंग साठी जाणे  हे आणि महाराजांच्या प्रेरणेचे एक मोठं स्रोत आहे. हे फक्त काही तास चालत राहणे म्हणून नव्हे तर त्यावेळेस त्या बद्धल जाणीवपूर्वक त्या ठिकाणाची आणि वातावरणाचे निरीक्षण करणे निसर्गाच्या सानिध्यात फिरणे आणि त्यांच्याकडून काही शिकणे नव्हे. मुंबई जवळील एकदिवसीय ट्रेक ठिकाण आहेत ते एकदा ट्रेकला जाऊन आणि विहंगमय दृश्याकडे पाहत चहाच्या गरम कपमधून चहा पिण्याची कल्पना केवळ ट्रेकिंगच्या प्रवासासाठी कोणालाही आनंदीत आणि उत्साहित करण्यासाठी पुरेसे आहे. महाराष्ट्रात मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशात जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणजे एकदिवसीय ट्रेक (One day trek) ला जाणे यासाठी या खाली काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

मुंबई जवळील या ट्रेकिंग स्पॉट्समध्ये खूप सारी अस नैसर्गिक सौंदर्य आणि रम्य ठिकाणं आहेत ज्या ट्रेकर्स चा  नवीन लोकांचा कामाबद्धलचा थकवा दूर करतात आणि मनाने धीट बनवतात. मुंबईजवळ मॉन्सून ट्रेक्ससाठी अनेक पर्याय आहेत जिथे एखादी व्यक्ती डोंगरावर व गड किल्ले वर जाऊ शकते आणि न पाहिलेले धुके पृथीवर पाहू शकते. ही ठिकाणे एक विलक्षण विहंगमय वातावरणाची आठवण करून देतात जे ना विसरणारे असतात जिथे एखादे डोंगर व गडकिल्ले चढणायसाठी आणि निसर्गाच्या शर्यतीत पुनरुज्जीवन करण्यासाठी ट्रेक करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

तर मित्रांनो हे पर्याय पाहू शकता जे मुंबई जवळ नैसर्गिक ठिकाण व गड केले जे मुबई जवळ आहेत ते हि एक दिवसात करू शकता या सारा बद्धल माहिती खाली प्रमाणे आहे आवडल्यास शेअर जरूर करा आणि काही नोंदणी असेल तर  खाली देऊ शकता

कर्नाळा किल्ला (Karnala fort ) :-

सुट्टीच्या दिवशी तुम्ही आणि जर पाऊस असेल तरी सुद्धा हा ट्रेक करू शकता फक्त योग्य ती काळजी घेत.  मुंबई जवळ कर्नाळा किल्ला हा एक उत्तम पर्याय असू शकतो, असू नाही आहेच. हा ट्रेक २ तासाचा आहे आणि जर सुट्टीच्याचे दिवस सोडून कोणत्याही दिवस ट्रेक करत असाल तर उत्तम. कर्नाळा चढताना हवेचा गारवा आणि पावसात भिजत ट्रेक करण्याची कल्पना करा खूप छान आहे ते देखील मध्यभागी  हिरवळ आणि आजूबाजूला देखील हिरवळ आणि अनेक गडकिल्ले याचे दर्शन आणि शिव मंदिर व कर्नाळा किल्ला याचे अवशेष असलेले एक चांगला अनुभव.

कर्नाळा किल्ला हा पक्षी अभयारण्यासही असा प्रदेश आहे म्ह्णून जर वाटेत वेगळा प्राणी आढळ्यास आश्चर्यचकित होऊ नका मुंबई करांची कर्नाळा किल्ला हा ट्रेक साठी एक चांगला पर्याय आहे असे गुगल द्यारे कळल.

मुंबई पासून कर्नाळा किल्ला   (Mumbai to karnala fort distance):-  १ तास १३ मिनिट वेळ (४७.९) किलोमीटर 

पुणे पासून कर्नाळा किल्ला (pune  to karnala distance) :-     २ तास १० मिनिट वेळ (१२२.८) किलोमीटर

तिकोना किल्ला  (Tikona Fort)

तिकोना किल्ला बरोबर तिहेरी लोहगड व विसापूर किल्ले पाहायला भेटू शकतात हा आपल्या महाराष्ट्रातील मावळ मध्ये आहे तुम्ही गुगल द्व्यारे येऊ शकता उत्तर भागात असल्यामुळे मुंबई जवळील ट्रेकर करिता हा सोपा ट्रेक समजला जातो.  काही भाग किंवा जागा चढाई साठी अवघड आहेत हे चांगलं आहे कोणी आपल्या शरीर आपल्या प्रमाणे ठेवण्यासाठी व कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे जे गड चढून होईल तेव्हा थकवा जाईलच त्या बरोबर पाव्हना नदीचे खूप छान असे दृश्य पाहायला भेटेल त्या बरोबर विसापूर किल्ला आणि लोहगड दुहेरी किल्ले पाहायला भेटतील.

कामशेत जवळील पेठेतून रस्ता आहे तेथून आपल्याला गड चढायचा आहे आणि त्यासाठी सुरवात करायची आहे. तिकोना किल्ला चढण्यासाठी सुमारे २ तास लागतात आणि किल्याच्या टोकावर पोहोचण्यासाठी १ तास लागतो. खाली येणासाठी हि एवढाच वेळ लागतो किंबहुना १ तासात खाली येऊ शकता तिकोना किल्ला हा मुंबई जवळील लोकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो तो सर्वाना आकर्षित हि करतो.

मुंबई पासून तिकोना किल्ला  (mumbai to tikona fort):- २ तास ४४ मिनिट वेळ (१२१) किलोमीटर 

पुणे पासून तिकोना किल्ला ( pune  to tikona fort) :-   १ तास ५१ मिनिट  वेळ (६१. ८) किलोमीटर

माथेरान (Matheran) :- 

मुंबईपासून जवळच ट्रेकिंगसाठी व फिरण्यासाठी माथेरान हा आणखी एक चांगला पर्याय आहे. सह्याद्री च्या खुशीत असलेले महाराष्ट्रातील हे एक छोटस हिल स्टेशन आहे. सर्वत्र  हिरवंगार परिसर खळखळते छोटे छोटे झरने व निसर्गात फिरण्याचा सुखदः  अनुभव. 

माथेरान म्हणजे खूप मोठ हिल स्टेशन आहे माथेरान मध्ये कार गाड्या नसल्यामुळे ते तिथं पर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत, म्हणून हे माथेरान निसर्गाचं दर्शन घडून देते व हे प्रदूषण विरहित प्रदेश आहे म्हणजेच स्वच्छ, नैसर्गिक वातावरण बघायला भेटते. विश्रांती घेण्यासाठी व चांगला अनुभव घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात एका शांत वातावरणात कसली हि पर्वा न करता राहू शकता. एकदा आपण ह्या माथेरान हिल स्टेशन मध्ये प्रवेश केलात तर मोबाइल रेंज मुक्त ठिकाण आणि लाल मातीचे रस्ते सुंदर हिरवंगार आणि गुलाबी दृश्यामुळे मन अगदी प्रसन्न होते.

मुंबई पासून माथेरान अंतर (mumbai to matheran distance) :- २ तास १९ मिनिट (८३) किलोमीटर

पुणे पासून माथेरान अंतर ( pune  to matheran distance) :- २ तास ४१ मिनिट (१२३) किलोमीटर

लोहगड  (Lohgad fort) :-

नवीन ट्रेकर्स साठी मुंबई आणि महाराष्ट्रातील लोहगड हा एक पर्याय आहे आणि तो अनेक ट्रेकर्स ला आकर्षित सुद्धा करतो. एक सोपा मार्ग तो हि काही म्हणजे अनेक पायऱ्या चालून जावे लागते. खास करून पावसाळ्यात हा ट्रेक ट्रेकर्सना एक सुखदः आणि मनमोहक अनुभव देतो सर्वत्र हिरवळ चादर गुंडाळली असते छानश्या धुक्यामध्ये दिसतो. दुसरी गोष्ट म्हणझे रस्त्याला तुम्हाला भाजे लेणी सुद्धा पाहता येतील.

नयनरम्य दृश्य आणि लोहगड किल्ला आणि त्यातील त्यात चार दरवाजे शोधणे हि एक आठवण राहते जी आपल्या प्रवासातील अनुभवानं मध्ये भर टाकते. लोहगड किल्ला हा मुंबई आणि महाराष्ट्रातील एक सोपा मार्ग असलेला ट्रेक करण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे.

मुंबई पासून  लोहगड किल्ला अंतर (mumbai to lohagad distance) :- २ तास ८ मिनिट (९८.५ ) किलोमीटर

पुणे पासून लोहगड किल्ला अंतर ( pune  to  lohagad distance) :- १ तास ४१ मिनिट (६५.५ ) किलोमीटर

माहुली किल्ला (Mahuli Fort) :-

महाराष्ट्र मधील मुंबई जवळील आसनगाव मधील माहुली गावातील माहुली किल्ला हा ट्रेक साठी प्रसिद्ध  मानला जातो, हा माहुली किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे २८०० फूट उंच आहे आणि ठाणे जिल्यामधील एव्हरेस्ट मानला जातो व सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री रंगाच्या पश्चिमेला हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. माहुली किल्यावर पोहोचताच तुम्हाला खाली विहंगमय दाट जंगलाचे दृश्य दिसू लागते आणि सर्वत्र हिरवळ पाहायला भेटते. सकाळी लवकर गेलात तर धुक्याची चादर सुद्धा पाहायला भेटते. शक्य तो हा ट्रेक पावसाळ्याच्या आधी करावा आणि पावसाळ्यात हा ट्रेक टाळावा.

ट्रेक संपून किल्ल्यावर पोहोचता थोडा वेळ दृश्य बघत थंड हवा घेत शांत बसून एक चांगला अनुभव घेऊ शकता.  माहुली बरोबरच अजून २ किल्ले बघायला भेटू शकतात दक्षिणेस भंडारगड आणि उत्तरेस पळसगड. भंडारगड वर कल्याण दरवाजा काही पाण्याच्या टाक्या सभागृह हे ऐतिहासिक बघायला भेटेल. आणि पळसगड वर सुंदर असा तानसा धरणच दृश्य पाहायला भेटेल. माहुली गडावर छत्रपती शिवाजी महाराजही छोटुशी मूर्ती बघायला भेटेल आणि जवळच गाभाऱ्यात देवड्या , महादरवाजा आणि एक पिण्याच्या  पाणीच टाक भेटेल. देवड्यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते .

किल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ३ तास लागतात कोणताही ट्रेक करत असाल तर सोबत मुबलक पाणी ठेवावे.

मुंबई पासून माहुली किल्ला अंतर (Mumbai to Mahuli fort distance) :- २ तास ९ मिनिट (७४.३ ) किलोमीटर

पुणे पासून माहुली किल्ला अंतर ( pune  to  lohagad distance) :- ४ तास  (२०२.१ ) किलोमीटर

निष्कर्ष:

मुंबई जवळील एकदिवसीय ट्रेक ठिकाण महाराष्ट्रातील ह्या काही जागा आहेत ट्रेकिंग पॉईंट आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता आपल्या आयुष्यात असलेला ताण तणाव कमी करण्यासाठी आणि निसर्गात बागडण्यासाठी फिरण्यासाठी मनसोक्त आपला वेळ स्वतःसाठी जगण्यासाठी आणि गड किल्ले सर करण्यासाठी ट्रॅकिंग साठी हि काही स्थळे ट्रेकिंग पॉईंट आहेत या शिवाय अजून भरपूर माहिती आपल्या या ब्लॉग्स वर भेटत राहील कल्याण जवळील आणि पनवेल , मुबई जवळील कर्जतखोपोली, मुरबाड अश्या ठिकाणं मध्ये अजून खूप गुपित आहेत ते बघण्यासाठी आपल्या मराठी ब्लॉग्स ला सुब्स्क्रिब करून ठेवा व आपल्या YouTube चॅनेल ला Subscribe करून ठेवा.

माहिती कशी वाटली जरूर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नोंदणी करू शकता तुमच्या या लाईक ने अजून उत्साह वाढतो तर मित्रांनो हि माहिती मित्राबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका.

धन्यवाद 😇
#mianilshinde