Chanderi Fort | बदलापूर मधील चंदेरी किल्ला जवळील गाव

चंदेरी किल्ला जवळील गाव आणि Chanderi Fort

Chanderi Fort जाण्या अगोदर तेथील काही ठिकाण या खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता आणि थोडी फार चंदेरी किल्ल्या या बद्धल माहिती आपल्या या ब्लॉग मध्ये खाली दिली आहे. 

Chanderi Fort
Chanderi Fort
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now


दिवस सुट्टी चा होता जवळील ठिकाण बघायचा बेत होता,  जावस वाटत होत बदलापूर मधील कोंडेश्वर मंदिर या ठिकाणी पण तिथे नाका बंदी असेल अशी शंका होतीच म्हणून प्लॅन कॅन्सल करून कर्जत बदलापूर रोड वरून वळण घेऊन Chanderi Fort या रस्त्याला गेलो, पावसाळ्यासचे दिवस असल्या कारणाने निसर्ग अगदी फुलून दिसत होता सर्वत्र हिरवळ आणि या मधेच एक छान गाव तिथेच धबधबा आणि थोडी वाहती नदी दिसली. 

 
    गाव छोट होत सुंदर होत निसर्गानी हिरवी चादर या गाववर टाकली होती आणि अजून सुंदर बनवलं होत, बेत होता चंदेरी किल्ला या जवळील पायथ्या जवळील ठिकाण पाह्ण्याच पण रस्त्याला जात असताना सर्व पाहावयास वाटत होत,  एक गावात पोहोचलो जाणार होतो गावामधील छोटयाश्या बंदराकडे जात असताना तेव्हड्यात मागून बाईक वाले आले तसेच ते एक दिशेने निघाले, म्हंटल याना अजून काहीतरी चांगली जागा माहित असेल तसेच त्याच्या मागे गेलो. 
 
Chanderi fort
Badlapur Chanderi Fort

 

 
   गेल्यावर बघितलं खूप शांतता त्या बरोबर पाण्याचा खळखळाट ऐकू यायला लागला त्यातच मनाला म्हंटल यांचा वेगळा बेत आहे आपण वेगळी जागा बघू तसेच जेवण करत निसर्गाच्या सानिध्यात बसू म्हणून रास्ता बदलला आणि ओढ्याच्या, ओढा म्हणू कि नदी माहित नाही पण जे काय होत मस्त होत, थोडी फोटो काढले म्हणजे फोटोग्राफी केली मोबाइलला ने,  कॅमेरा असून मोबाइलने काढावे लागले कारण कॅमेरा होता , बॅटरी होती पण मेमरी कार्ड नव्हते मानून मोबाइलला ने काढले सोबत आपला YouTube चॅनेल साठी वलॉंग बनवायला लागलो तोच तुम्ही खाली पाहू शकता. 
छान अशी आठवण साठून घेतली कॅमेरा मध्ये नाही म्हणून काय झालं पण मनात तर राहील, बरं चंदेरी किल्ला जाण्याच्या शोधात आणि एक बदलापूर मधील धनगर धबधबा याच्या शोधात हे ठिकाण भेटल छान वाटलं. मित्रांनो तुमच्या साठी आणि माझ्यासाठी सुद्धा काही माहिती मी इंटरनेट वरून आपल्यासाठी देतोय आहे कधी चंदेरी किल्ल्याबद्दल माहिती शोधात असला व जायचा विचार करत असलं तर खालील माहिती जरूर वाचा. 

 

महाराष्ट्राच्या बदलापूर भागातील चंदेरी किल्ला ट्रेक हे मुंबई जवळील 1 दिवसाचे ट्रेकिंग ठिकाण आहे. या किल्ल्याला फारसा इतिहास नाही पण ते एक चांगले साहसी स्थान म्हणून काम करते!

स्थान पत्ताः चिंचवली गाव, बदलापूर व पनवेल जवळ, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र (भारत).

भेट देण्याची उत्तम वेळ: नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा या किल्ल्याचे दर्शनासाठी योग्य काळ आहे. मुख्य ट्रेक मार्ग धबधब्याकडे जातो त्यामुळे पावसाळ्यात आपण हा ट्रेक करू शकत नाही.

उंची: हा किल्ला समुद्रसपाटीपासून 710 मीटर (2300 फेट) उंचीवर उभा आहे.

हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर उपनगरातील चिंचवली गावाजवळ आहे. महाराष्ट्रातील चंदेरी किल्ला ट्रेक एक आव्हानात्मक पण एक रोमांचक ट्रेक आहे. किल्ला एमएसएलपासून 800 मीटर उंचीवर आहे. हे माथेरान पर्वतराजीच्या मध्यभागी आहे. हा किल्ला आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असल्याने किल्ल्याची उंच उंची आहे. गडाच्या माथ्यावर आपल्याला महान छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ कांस्य मूर्ती दिसते.

हे काय आहे?

जमिनीपासून  2300 फूट उंचीवर बदलापूरचा चंदेरी किल्ला मुंबई व पुण्याहून एकदिवसीय योग्य मार्गावर आहे. चंदेरी किल्ला 1600 च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधला गेला आणि आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. एकदा तुम्ही वरच्या बाजूस जाताना तुम्हाला छत्रपती शिवाजीची पितळेची मूर्ती दिसेल आणि ती माथेरान पर्वतराजीच्या मध्यभागी आहे.

ट्रेक बद्दल

चंदेरी किल्ला ट्रेक किल्ल्याच्या पायथ्यापासून 3 तास चालत आहे आणि शीर्षस्थानी जाण्यासाठी आपल्याला दाट जंगले आणि धबधब्यांमधून जावे लागेल. रोमांचक वाटतंय, प्रेम? आपल्या मार्गावर, आपणास लहान लहान धबधबे, गुहा आणि खडक रचना सापडतील. जर आपण पावसाळ्यात चंदेरी किल्ल्याच्या ट्रेकसाठी जात असाल तर डोंगराच्या नयनरम्य दृश्यांसाठी आणि हिरव्यागार सज्ज्यांसाठी तयार राहा. एकदा आपण शिखरावर गेल्यावर आपणास भगवान शिव यांच्या पुतळ्यासह एक मोठी गुहा सापडेल.

तिथे कसे पोहचायचे

मध्य रेल्वेकडून, वांगणी किंवा बदलापूर स्थानक आपल्यासाठी सर्वात जवळचे असेल. दोन्ही स्थानकांवरून चिंचवली गावच्या पायथ्याकडे ऑटो रिक्षा घ्या.
गडाच्या माथ्यावर अन्न / पाणी उपलब्ध नाही. चिंचवली गावच्या पायथ्याशी आपल्याला काही खाद्य स्टॉल्स सापडतील जे स्नॅक्स, पेये आणि पाणी देतील. ट्रेकसाठी आपल्याला आवश्यक असलेली सर्व वस्तू आपण आधी खरेदी केली तर उत्तम होईल. 

तर मित्रांनो हि होती चंदेरी किल्ल्या जवळील गाव बद्धल आणि चंदेरी किल्ला या बद्धल माहिती , कशी वाटली हि माहिती जरून खाली कळवा आणि हि माहिती मराठी मांस पर्यंत व इतर माणसापर्यंत जरूर पोहोचवा. 

।। धन्यवाद ।।

😊💗👍

#mianilshinde

20210620 144919

1 thought on “Chanderi Fort | बदलापूर मधील चंदेरी किल्ला जवळील गाव”

Leave a Comment