Chota Kashmir in Mumbai

छोटा काश्मीर,  मुंबई आरे कॉलोनी 

Chota Kashmir in Mumbai
Chota Kashmir in Mumbai

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आपल्या भारताच्या उत्तरेस असलेलं आपल्या भारताचं काश्मीर हे तुम्हाला माहीतच असेल पण तसेच आपल्या महाराष्ट्रातील मुंबई मधील छोटा काश्मीर (Chota Kashmir Mumbai) या बद्धल आज आपण बघणार आहेत आणि त्याबद्धल अन्य काही महत्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. 

तुम्हाला माहित आहे का? आपल्या मुंबई मध्ये छोटा काश्मीर आहे? होय तर मित्रांनो आज आपण वाचणार आहोत मुंबई मधील छोट्या काश्मीर बद्धल, नेमकं हे ठिकाण आहे तरी कुठे?  मित्रांनो आपल्या या ब्लॉग (anilblogs.in) वर जास्त तर कर्जत, खोपोली, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकानाबध्दल आणि काही प्रमाणात निसर्गाच्या सानिध्यात असलेला शहारा बद्धल माहिती असते. 

 

   पण आज आपण पाहणार आहोत मुंबई मधील छोटा काश्मीर (Chota Kashmir Mumbai) या ठिकाणबद्धल माहिती, मित्रांनो मला सुद्धा नव्हते माहिती कि चक्क मुंबई मध्ये होय मुंबई मधेच असं निसर्ग रम्य ठिकाण असेल मला तर निसर्गरम्य ठिकाण खुप आवडतात आणि ते सुद्धा शहरापासून दूर धाकधुकीच्या जीवनापासून लांब डोंगरावर ताजी शुद्ध हवा घेत टेकडयांवर बसून हिरवीगार जंगल बघत व खळखळत्या धबधब्याजवळ बसत आणि सर्वत्र हिरवीगार ठिकाण असल्या जागा मला खूप आवडतात.

 

हे ठिकाण म्हणजेच छोटा काश्मीर बघायला नक्की आवडेल तर मित्रांनो चला वाचूया नक्की हे ठिकाण आहे तरी कुठे आणि तिथे कसं पोहचायचं?

How can I go to Chota Kashmir?

गोरेगाव रेल्वे स्थानकाहून २ ते ५ किलोमीटर अंतरावर ऑटो रिक्षाने तुम्ही जाऊ शकता, तसेच तुम्ही मुंबई मधील बस ने सुद्धा प्रवास करू शकता ३२६, ३४१, ४५०,४५१,४६०,४७९ ह्या नंबर च्या बसेस आहेत ज्या आरे डेअरी मिल्क कॉलनी होऊन जातात, शक्य तो मित्रांनो कॉलनी मधील विविध ठिकाण पाहायचं व बघायचे असतील तर तुम्ही तुमची स्वतःच्या गाडीने येऊ शकता ते खूप चांगलं आणि त्यातच तुम्ही खूप जागा एक्सप्लोरे करू शकता बघू शकता आनंद घेऊ शकता. 

 

मित्रांनो आपण अश्या पर्यटन स्थळं ला जात असताना कधी कधी प्रश्न पडतो ते ठिकाण चालू असेल कि नाही ( लॉक डाउन मुले ) तर त्या बद्धल खाली वाचू शकता  – 

Is Chota Kashmir open now?

Chota Kashmir in Mumbai
Chota Kashmir in Mumbai

 

आता सध्या ते चालू असेल कि माहित नाही जर मित्रांनो तुम्हाला या बद्धल माहित असेल तर नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट देऊ शकता ज्याने करून हा लेख वाचत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती भेटू शकेल व मदत हू शकेल,  काय आहे ना मित्रांनो गेल्या काही दिवसापासून वर्षांपासून काही पर्यटन स्थळे चालू बंद चालू बंद असे होऊ लागले तर खात्री पूर्वक माहित नसते  म्हणून मित्रांनो जर तुम्हाला माहित असेल तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर माहिती द्या, 

तस तर हे मुंबई मधील आरे कॉलनी जवळील छोटा काश्मीर याच्या म्हण्याप्रमाणे ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तेथील माहिती प्रमाणे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहते तसेच त्याला वेळेचे बंधन आहेत तर वेळ काही अशी आहे कि सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजे पर्यंत हे छोटा काश्मीर ठिकाण चालू असत, तसेच मित्रांनो इथे तुम्ही बोटिंग (Boat Ride) सुद्धा करू शकता हे त्याचसाठी प्रसिद्ध आहे त्याची वेळ आहे सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजे पर्यंत. 

Chota Kashmir entry fees मित्रांनो इथे येण्यासाठी प्रत्येकी २० रुपये आकारले जातात म्हणजे प्रवेश शुल्क (हि किंमत बदलू हि शकते ) आणि मित्रांनो हे पर्यंटन स्थळ असल्याकारणाने जर तुम्ही तुमच्याकडील कॅमेरा घेऊन व अन्य शूट साठी येत असाल तर तुमच्याकडून अन्यशुल्क हि आकारलं जात याची नोंद घ्या व मित्रांनो सामान्य माणसाला परवडणार असं मुंबईला मधीलच एक पिकनिक स्पॉट असं आरे कॉलनी मधील हे छोटा काश्मीर शांतेते साठी चांगलं ठिकाण असं लोकांचं मत आहे.

 

एक उत्तम असं मुंबई मधील पिकनिक स्पॉट म्हणून आपण छोटा काश्मीर याला बघू शकता, इथे ६० वर्ष असलेले झाडे आहे तसे तर खूप जुनी जुनी वृक्ष आहेत तसेच इथे बोटिंग नौका तलावामध्ये फिरण्यासाठी आनंद घेण्यासाठी दोन, चार आणि सहा पॅडल नौका आहे, तसेच तुम्ही तुमच्या मित्र मंडळी सोबत व परिवार सोबत तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत आणि सवंगडी सोबत वेळ घालवू शकता बोटिंग करू शकता,  त्याची वेळ व इथे येण्याची वेळ हि वरती सांगितलीच आहे,  इथे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती येऊ शकतो व शांततेचा आनंद घेऊ शकते, आपला एक मौल्यवान व शांततेच्या शोधात असाल तर इथे येऊन जरूर भेट देऊ शकता. 

Chota Kashmir in Mumbai
Chota Kashmir in Mumbai

photo courtesy-FB Chota Kashmir

मित्रांनो हे छोटा काश्मीर ४ एकर मध्ये आहे आणि हे छोटा काश्मीर तलाव रस्त्याच्या शेजारी आहे, हे बोटिंग व फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे, रंगीबेरंगी दोन, चार आणि सहा पँडल सीटर बोट (boat) आपलं लक्ष वेधून घेतात, सकाळी ११  ते ३ वाजे पर्यंत असलेली बोटिंग हि फक्त ३० किंवा ५० मिनिटांकरिता तलाव मध्ये आनंद घेत तुम्ही फिरवू शकता, पक्ष्याची किलबिलाट आणि इतरत्र शांतता व ताजी हवा ह्या बोटी दरम्यान तुम्ही पाहू शकता. 

 

तर मित्रांनो मी इथंच थांबतो अशा करतो तुम्हाला हि छोटा काश्मीर, मुंबई (Chota Kashmir Mumbai) माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या मित्रांबरोबर हि माहिती जरूर शेअर करा पोहोचवा आणि खाली कॉमेंट बॉक्स मध्ये काही कॉमेंट असतील तर नोंदवा, मित्रांनो जर तुम्ही आपल्या मुंबई मध्ये ह्या धाकधुकीच्या, डिस्को च्या पब च्या दुनियेपासून दूर मनाला शांतात देणार हे जणू आमची मुंबई मधील स्वर्गचा तुकडा छोटा काश्मीर याला जरूर भेट द्या.  

धन्यवाद
#mianilshinde #chotakashmirmumbai

1 thought on “Chota Kashmir in Mumbai”

Leave a Comment