One Day Mahuli Fort Trek Asangaon Maharashtra

Mahuli Fort Trek Asangaon: एक दुर्गत्रिकुट माहुली किल्ला

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
अनेक सुळके असलेला लांबलचक २८०० फूट उंच असा हा किल्ला माहुलीगड या नावाने ओळखला जातो...
Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Map

Mahuli Fort Trek Asangaon: गडाच्या पायथ्यसही असणारे शिव मंदिर गणेश मंदिर फार सुंदर आहेत हि जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्यातील शहापूर – आसनगाव जवळ एक दुर्गत्रिकुट आहे माहुलीगड, भंडारगड, आणि पळसगड मुद्दाम जाऊन पाहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौदर्याने वेड लावते.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Temple

Mahuli Fort Trek Distance

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahuli fort trek distance: मुंबई ते माहुलीगड अंतर १ तास ३४ मिनिटांचं आहे एकूण ७४.३ किलोमीटरचं अंतर आहे आणि पुणे पासून ३ तास ५३ मिनिटांचं अंतर आहे एकूण २०२. १ किलोमीटर आहे आणि ट्रेन ने येत असाल तर आसनगाव मार्गे लोकल ट्रेन ने आसनगाव रेल्वे स्टेशन ला यावे तिथून रिक्षा ने माहुली गावात जाऊ शकता व चालत सुद्धा जाऊ शकता किंवा एस टी आलात व स्वतःच्या गाडी ने आलात तर आसनगाव हुन ५  किमी अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणार्या माहुली या गावी पायी किंवा रिक्षाने येऊ शकता. आणि दुसरा शहापूर हुन सुद्धा रिक्षा करून येऊ शकता आणि आजकालच्या योगा मध्ये गुगल मॅप ने सुद्धा गडाच्या पायथ्या पर्यंत पोहोचू शकता. 

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Starting Point

Mahuli Fort Trek Difficulty Level

या गडाच्या दक्षिणेस चार सुळके असून त्याला स्थानिक लोकांनी भटजी, नवरा, नवरी, करंगळी अशी नवे दिलेली आहेत.  उजवीकडे एक ओढा पार करून ३ किमी चा खडा चढ चढून जायचं आहे सुमारे दीड ते दोन तासाच्या चढणीत वाटेत कोठेही पाणी नसल्याने पाणी जवळ असणं गरजेचं आहे. गणपती मंदीर समोरील मार्ग सोपा मार्ग आहे तिथे तुम्हाला प्रति व्यक्ती ३० रुपये दयावे लागतात आणि तिकीट घ्यावे लागते गणपती मंदीर समोरील मार्ग सोपा मार्ग आहे तिथे तुम्हाला प्रति व्यक्ती ३० रुपये दयावे लागतात आणि तिकीट घ्यावे लागते तिथेच गार्डन आहे शिवाय फोटो काढण्यासाठी खूप स्पॉट आहेत आणि गडावर जाण्यासाठी सोपा मार्ग दर्शवला आहे.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडका पासून बनलेला हा Mahuli Fort किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड, आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे.त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

 

मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अश्या दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे. गडावर चढाई सोपी आहे शिवाय सोबत पाणी आणि जेवण असणं चांगलंच आहे थोडासा दमछाक होऊ शकतो. 

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
 

 

  • Mahuli Fort History जाणून घेऊया 

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

इतर अनेक किल्ल्या प्रमाणे या किल्ल्याची उभारणी कोणी केली ज्ञात नाही पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण  नगरच्या निजाम शाही च्या संस्थापाक असलेल्या मलिक अहमद यांच्याकडे आले. पुढे शाहजीराजे निज़ामशीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मुगल फौजा व अदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

१६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजी महाराज माहुलीला मुक्काम हलवला खानजमान म्हणजे महाबतखानच्या मुलाने माहुलीला वेडा दिला.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

शहाजी राजेंनि पोर्तोगीजांकडे मदत मागवली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. 

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

 

लगेचच तो परत  जिकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदर तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोघलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजी राजेंच्या नेतृत्वाखाली माहुली वर केलेला हल्ला अयशस्वी ठरला.  दीडहजार मराठी मावळ्यांपैक्की तब्बल हजार मावळे मोघलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतर मनोहर दास गौंडने किल्लेदारी सोडली.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek

 

त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा किल्लेदार रुजू झाला नंतर १६ जुन १६७० रोजी दोन महिन्याच्या वेढ्या नंतर दोनशे मोगल सैनीकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यानी माहुली. पळसगड व भंडारगड हे त्रिकुट स्वराज्यात करून घेतले.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
  • गडावर बघण्यासारखं

पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्लाच्या पायथ्याशी आहेत वाटेत एक ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. ते वर गेल्यावर दोन पाण्याचे टाके आहेत या वाटेने जाताना आम्हाला ३ तास लागले. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort View

 

मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे  म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
 

एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत.  वास्तविक हि किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

 

ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
  • माहुली किल्ला आणि आमचा अनुभव  ?

 
Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

माहुली किल्ला चढण सोपी आहे २-३ किलोमीटर उंचावर आहे थोडासा दमछाक होऊ शकतो जसा सर्वच किल्ले चढताना होतो सोबत पाण्याची बाटली घेऊन चला पायथ्यापासून किल्ल्या पर्यंत कुठेही पाणी भेटणार नाही पावसाळ्यात माहुली किल्ला अतिशय सुंदर दिसतो आणि तेव्हा तर काय पाण्याची गरज भासणार नाही पण तरीही चांगलं पाणी सोबत असणं गरजेचं आहे.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

 

त्रिकुट किल्ले असल्यामुळे सर्वात अगोदर भंडारगड करा आणि त्या नंतर माहुली गड आणि त्या नंतर पळसगड करा. भंडारगड कडे बघण्यासारखं खूप काही आहे आणि पळसगड हि चांगलाच आहे आणि माहुली गडावर एक माहुलेश्वर मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची २ ते ३ फूट उंचीची मूर्ती असेल ती मूर्ती सुबक आहे आणि तिथे खूपच स्वछता असते.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon
 

आमचा वेळ हा गड चढण्यामध्ये गेला सर्व सामान्यांना २ तास पुरे पण आमच्या बरोबर २ अशे नवीन मूळ होते कि त्यांनी कधी असा गड चढला नसेल शक्य तो आलात तर लवकर या सकाळी ५.३० गड चढण्यास घ्यावा आणि सोबतीला अनुभवी हा हवाच जरी कोणी अनुभवी नसेल तरी चालेल गाद चढताना हरवण्याची शक्यता कमी आहे चढाई सोपी आहे मार्ग हि सोपा आहे आम्ही गड चढण्यासाठी ४ तास घेतले. कोणाकडे पाणी नसल्या मुले पाणी फक्त मधला किल्ला असलेला माहुली  गडावरील शिव मंदिर असलेल्या २ टाक्या मध्ये होत पहिले टाके बघितल्या नंतर महादरवाजा कडे जात तिथे शिव मंदिर , महाराजांची मूर्ती, महादरवाजा, देवड्या, आणि पाण्याचं स्वतःच आणि गडावरील शुद्ध पाणी पिण्यासाठी भेटलं.

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

नंतर आमच्याकढे जेवणासाठी व काही खाण्यासाठी काहीच नव्हते फक्त होत ते पार्लेजी बिस्कीट ते आणि पाणी पित आम्ही तिथे १ ते १.३० तास वेळ घालवला नंतर भंडारगड कडे निघालो जात असताना वेळ जातच होता त्या बरोबर नवीन रस्ता शोधण्याच्या गडबडीत खूप वेळ वाया घालवला भंडारगड कडे जाणारा मार्ग मिळत नव्हता माझी खूप इच्छा होती पण ती या  वेळी पूर्ण नाही होऊ शकली. मी पुन्हा माहुली गड ट्रेक करणार तेव्हा प्रयत्न हाच असेल कि माझे तिन्ही गड एका दिवसात बघून होवा उत्तरेस पळसगड दक्षिणेस भंडारगड आणि मध्ये माहुलीगड एकुंदर आमचा अनुभव चांगला होता एवढंच राहील कि पुरेस जेवण सोबत नाही घेतलेले आणि खूप ब्रेक घेत घेत गड चढलो आणि जे बघायचं होत ते बघितलं नाही. 

Mahuli Fort Trek Asangaon
Mahuli Fort Trek Asangaon

पुन्हा माहुलीगड ट्रेक लवकरच करेल तर मित्रांनो हि माझी माहिती कशी वाटली नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि फोल्लोव करा आपल्या या मराठमोळ्या ब्लॉग्स ला.

 

तर मित्रांनो तुम्ही जर माहुली गड ट्रेक करायचा विचार करत असाल तर हि माहिती संपूर्ण वाचा, या मराठी ब्लॉग मध्ये Mahuli Fort Trek Asangaon या बद्धल संपूर्ण माहिती व Mahuli Fort Trek Photo आणि विडिओ शेयर केली आहे, आशा करतो हा लेख व हि माहिती तुम्हाला आवडली असेल, जर हि माहुलगडची संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर जवळच्या ट्रेकर मित्रांना जरूर शेयर करा, तसेच हा लेख मराठी मध्ये कसा वाटला जरूर खाली कंमेंट करा व काही कंमेंट असतील तर खाली कंमेंट करा.

।। धन्यवाद ।।

1 thought on “One Day Mahuli Fort Trek Asangaon Maharashtra”

Leave a Comment