Mumbai To Alibaug, Nayantara Water Taxi | ४० मिनिटांत मुंबई ते अलिबाग प्रवास पहिली वॉटर टॅक्सी

Mumbai to Alibaug, Nayantara Water Taxi, अलिबाग मुंबई वॉटर टॅक्सी

Mumbai To Alibaug Water Taxi

नमस्कार मित्रांनो तुम्ही आज या ब्लॉग मध्ये Mumbai to Alibaug प्रवास कसा करायचा या बद्धल वाचणार आहात, तसेच Nayantara Water Taxi Service alibag बद्धल माहिती पाहणार आहोत, १ नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झालेली महाराष्ट्रात नयनतारा सुपरफास्ट महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील Mumbai to Alibaug आणि Alibaug to Mumbai ४० मिनिटांचा प्रवास कसा असेल आणि किती रुपये भाडे असेल या मध्ये काय सुविधा असतील या बद्धल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mumbai to alibaug ferry प्रवास करण्यासाठी या अगोदर ही M2M ferry, roro alibaug होतीच जी bhaucha dhakka to alibaug पर्यंत जाते, तसेच आता २०२२ नोव्हेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी mumbai to alibaug आणि alibaug to mumbai असा प्रवास Water taxi service NAYAN XI या भारतातील पहिली water taxi ने करू शकता, यामुळे अलिबाग-मुंबई पर्यटनाला चालना मिळेल तसेच mumbai to alibaug roro अनुभव घेणाऱ्या लोकांसाठी आजच हा ब्लॉग आहे. 

NAYAN XI Water taxi service कुठे मिळते 

जर तुम्ही Mumbai to alibaug प्रवास करू इच्छिता तर तुम्हाला सर्वात अगोदर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हुन किंवा भायखळाहुन भाऊच्या धक्क्याला (Mumbai Domestic Cruise Terminal) बस द्वारे किंवा टॅक्सी द्वारे पोहचवं लागेल, तिथून ही नयनतारा वॉटर टॅक्सी मिळते, व तिचे सर्व तिकीट भाड, सुख सुविधा या बद्धल पुढे जाणून घेणार आहोत, तर मित्रानो तुम्हाला समजलं असेल ही वॉटर टॅक्सी मुंबई मध्ये कुठे मिळते, तसेच जर तुम्ही अलिबाग पासून प्रवास करायचा असल्यास या वॉटर टॅक्सी साठी तुम्हाला मांडवा या ठिकाणी यावं लागेल.

कशी आहे Mumbai To Alibaug सुपरफास्ट वॉटर टॅक्सी 

नयनतारा शिपिंग प्रा. लि. (Nayantara shipping private limited) या मालकीची गोवा मध्ये बनलेली ही भारतातील पहिली वॉटर टॅक्सी रोज ४० मिनिटांत प्रवास करणारी व ही फेरी सहा वेळा मुंबई ते मांडवा परत मांडवा ते मुंबई असा प्रवास करते, या सर्वा बद्धल माहिती पुढे वाचूया त्या अगोदर ही कशी आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो nayantara water taxi चांगली आहे, दोन डेक असणाऱ्या फेरी मध्ये AC आहेत, बाथरूम आहेत, चांगल्या सुविधा उपलब्ध आहे, मुंबईहून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत नयनतारा प्रवासात करते.

 

Mumbai DCT ते Mandwa रोज प्रवास करणारी नयनतारा Water taxi या मध्ये २०० सीट आहेत, वरती आणि खाली असे दोन माळे आहेत त्याला इंग्लिश मध्ये Lower Deck Executive Class आणि वरच्या माळ्याला Upper Deck Business Class अस म्हंटल जातं. या Water taxi मध्ये जागो जागी सी.सी टीव्ही कॅमेरा आहेत, सेफ्टी साठी बसण्याच्या सीट खाली लाईफ जॅकेट्स दिल्या आहेत, त्याच बरोबर नऊ लाईफगार्ड आहेत, शनिवार-रविवार जास्त पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Nayantara Water Taxi भाड किती व तिकिटं कुठे मिळतात 

मित्रांनो या अलिबाग वॉटर टॅक्सी दोन माळ्याची आहे, सुरवातीला खालच्या म्हणजेच lower deck ला प्रत्येकी ४०० रुपये तर वरच्या माळ्यात म्हणजेच upper deck बसण्यासाठी प्रत्येकी ४५० रुपये मोजावे लागतात, बाकी वॉशरूम्स ६ आहेत चांगलं क्लीन आहेत. भाऊच्या धक्क्या पासून निघणारी Nayantara water taxi tickets बोट मधेच मिळते, सुरू होण्यापूर्वी १०-२० मिनिटांत तुम्ही तिकीट काढू शकता. तसेच तुम्ही नयनतारा मुंबई अलिबाग, अलिबाग मुंबई ऑनलाइन तिकीट सुद्धा काढू शकता व नयनतारा ऍप सुद्धा आहे.

Mumbai To Alibaug वॉटर टॅक्सी सुविधा

मित्रांनो Mumbai To Alibaug प्रवास ४० मिनिटात होतो, अलिबाग पर्यटनाला देखील चालना मिळते, पर्यटकांना या मुळे mumbai to alibaug व alibaug to mumbai अजून पर्यायी मार्ग मिळाला, पण लक्ष्यात ठेवा मांडवा ते अलिबाग अंतर थोडं जास्त आहे ते तुम्हाला स्वतःच्या सहखर्चाने करावा लागेल. मांडवा पासून तुम्हाला लोकल गाड्या मिळतील ज्या तुम्हाला अलिबाग पर्यंत पोहोचवतात. 

Mumbai Alibaug वॉटर टॅक्सी या बद्धल सुविधा चांगल्या आहेत, अजून कोणाला फेरी बद्धल एवढ माहीत नसल्याने गर्दी सध्या कमी आहे, upper deck मध्ये ६० आरामदायी सीट आहेत बसण्याची जागा तर खालच्या lower deck मध्ये १४० जणांची बसण्याची सोय आहे, प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट्स ठेवल्या आहेत जे काही संकटं वेळी कामाला येईल, तसेच आत मध्ये नो स्मोकिंग झोन आहे, स्मोकिंग डिटेक्टर आहे, मोबाइल चार्जिंग साठी usb पोर्ट आहेत, तसेच प्रवासादरम्यान फ्री पाण्याच्या बॉटल मिळतात अजून तरी जेवणाची व नाश्ताची सोया नाही.

Mumbai Alibaug Nayantara Water Taxi Timetable

नयनतारा मुंबई ते अलिबाग वॉटर टॅक्सी वेळ

मित्रांनो सांगितल्या प्रमाणे भाऊच्या धक्क्याहून सकाळी साडे दहाला निघते म्हणून अर्धा तास आगोदर किंवा पंधरा मिनिटे अगोदर आलात तरी चालेल, बाकी वेळ खालील प्रमाणे आहे:
 
  • सकाळी १० वाजून ३० मिनटं
  • दुपारी १२ वाजून ५० मिनटं
  • दुपारी ३ वाजून १० मिनिटं 
वरील वेळेत मुंबई भाऊच्या धक्क्याहून अलिबाग मांडवा असा प्रवास नयनतारा वॉटर टॅक्सी करते. तसेच मित्रांनो आता खाली जाणून घेऊयात अलिबाग मांडवा ते मुंबई भाऊचा धक्का नयनताराचा वेळ.

नयनतारा अलिबाग ते मुंबई वॉटर टॅक्सी वेळ

जशी ही बोट मुंबई हुन निघते ती अलिबाग मांडवा इथे ३५-४० मिनिटात पोहोचते, नंतर १० मिनिटात पर्यटकांना भरून पुन्हा अलिबाग ते मुंबई असा प्रवास दिवसातून सहा वेळा करते, जाणून घेऊ अलिबाग ते मुंबई नयनतारा वॉटर टॅक्सी सुटण्याची वेळ:
 
  • सकाळी ११ वाजून ४० मिनिटे
  • दुपारी ०२ वाजता
  • दुपारी ४ वाजून २० मिनिटं
 

तर मित्रांनो असा काही वेळ नयनतारा वॉटर टॅक्सी मुंबई ते अलिबाग व अलिबाग मांडवा ते मुंबई भाऊचा धक्का या प्रवासाचा आहे. तुम्ही देखील याचा आनंद घेऊ शकता, तसे तर alibaug mumbai ferry खूप आहेत पण NAYAN XI Water taxi चा प्रवास जरा AC मधून न हालत न डुलता ना कसला इंजिनचा चा आवाज ना कसला त्रास एकदम आरामदायी प्रवास करता येईल.

Mumbai Alibaug Distance

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातून सुंदर किनारपट्टी mumbai alibaug distance फक्त ९६ किलोमीटर आहे, जर तुम्ही बस प्रवास करत असाल तर १३० रुपये आता सध्या तिकीट भाडे आहे आणि जर तुम्ही अन्य गाडी किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तुम्ही खर्च खाली कॉमेंट मध्ये सांगू शकता, अंदाजे १००० रुपये समजून चला. बाकी mumbai to alibaug अंतर ११८ किलोमीटर, प्रवासासाठी ३ तास ५० मिनिटे लागू शकतात. तेच NAYAN XI Water taxi ferry ने प्रवास कराल तर अवघ्या ४५ मिनटात अलिबाग गाठू शकता. 

 

Alibaug information in Marathi

 प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या लेखातून मराठी मध्ये मिळेलेली असेल. अलिबाग मध्ये फिरण्यासाठी टुरिस्ट खूप जागा आहेत त्यात अलिबाग मधील रिसॉर्ट असो हॉटेल असो किंवा किनारपट्टी किंवा किल्ले. अलिबाग हे एकदम शांत तसेच धमाल करणार व सुट्ट्या घेऊन तिथे रिलॅक्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे.  

List Of Alibaug Beaches

  1. Alibaug Beach
  2. Nagaon Beach
  3. Mandwa Beach
  4. Kashid Beach
  5. Kihim Beach
  6. Murud Beach
  7. Kasim Beach
  8. Saswane Beach
  9. Rewas Beach
  10. Korlai Beach
  11. Varsoli Beach
  12. Awas Beach
  13. Akshi Beach
  14. Revdanda Beach

Alibaug Resorts । Hotels Alibaug

मित्रांनो जर तुम्हाला resorts in alibaug बद्धल माहित नसेल तर ती माहिती सुद्धा आपल्या या लेखात देण्यात आली आहे. 

Top Luxury Resorts Nagaon, Alibaug, Maharashtra | Sea Beach Touch | Swimming Pool & jacuzzi 

  1. Nakhawa beach Resort
  2. Casuarina The Beach Resort(old name Karpewadi Nagaon)
  3. Hotel West Coast, Nagaon
  4. hill side resort alibaug
  5. Breeze Resort Nagaon

Conclusion :

तर मित्रांनो ही होती माहिती Mumbai To Alibaug, Alibaug to Mumbai Nayantara water taxi service ची, Best way to go from Mumbai to Alibaug आणि Alibaug information in Marathi ही माहिती कशी वाटली जरूर खाली कमेंट्स करून सांगा, आरामदायी प्रवास असेल तर नयनतारा पर्याय निवडू शकता, बाकी मुंबई ते अलिबाग वेगवेगळ्या बोटी शिप आहेत त्याने प्रवास करू शकता, नयनतारा अलिबाग-मुंबई मध्ये प्रवास सुखकारक हवा असेल तर ह्या बद्धल विचार करू शकता वयस्कर पर्यटक याला पसंती देतात. 

धन्यवाद 🙏

1 thought on “Mumbai To Alibaug, Nayantara Water Taxi | ४० मिनिटांत मुंबई ते अलिबाग प्रवास पहिली वॉटर टॅक्सी”

Comments are closed.