महिला सन्मान योजना १७ मार्च २०२३: आज महाराष्ट्र सरकारच “Mahila Samman Yojana” महिला सन्मान योजना GR आला ज्यात महाराष्ट्रातील महिला एसटी प्रवास सरसकट ५०% सूट तिकिटावर करू शकतात.
Mahila Sanman Yojana Maharashtra: महिलांना ST प्रवासाला ५० टक्के सूट
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांना “Mahila Samman Yojana” या राज्य सरकार योजनेच्या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत मिळणार आहे. हि घोषणा आज दिनांक १७/०३/२०२३ रोजी झाली असून महिलांना महाराष्ट्रातच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत मिळाली आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारे आहे
महिला एसटी प्रवास सवलत । Women ST Travel Discount
Women ST Travel Discount: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस यात साधी, एसटी, मिडी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून Mahila Samman Yojana 50 टक्के सवलत सर्व वयोगटातील महिलांना मिळणार आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील त्यामध्ये ही सवलत मिळणार आहे. या मुळे महाराष्ट्रातील महिलां खूपच आनंदीत असून या अगोदर महिला सन्मान योजना ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.
50 reservation for ladies in india । भारतातील महिलांसाठी 50 आरक्षण
2006 मध्ये पंचायत राज संस्थांमध्ये (PRIs) महिलांसाठी 50% जागा राखून ठेवणारे बिहार हे पहिले राज्य होते. राजस्थानने 2010 मध्ये हे स्वीकारले. आता आपल्या महाराष्ट्रात देखील यंदाच्या २०२३ महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पणात “Mahila Samman Yojana” या योजनेमार्फत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये महिलांना 50% सवलत देण्याचा निर्णय झाला आहे आणि तो mahila samman yojana gr द्वारे सर्वांपर्यंत पोहोचला आहे.
हे देखील वाचू शकता:- पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक कसे करायचे?
Yojana Maharashtra Government
महिला सम्मान योजना 2023 यापूर्वी देखील अनेक yojana maharashtra government ने राज्यात सादर केल्या आहेत व त्याची अंमलबजावणी देखील होत आहे, जसे कि पुढील प्रमाणे योजना आहेत राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना १०० % सवलत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना १०० टक्के सवलत, माहित नसेल तर सांगतो अपंग, रुग्ण याना देखील १०० टक्के या गाड्यांमध्ये सवलत आहे असे अनुक्रमे ३० योजना आहेत या बद्धल माहिती ST Travel Discount तुम्हाला msrtc.maharashtra.gov.in या राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईट वर मिळेल.
सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना‘ या नावाने संबोधण्यात येत आहे. सदर महिला सम्मान योजना 2023 सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे. ज्यां महिलांनी अगोदर तिकीट बुकिंग केलं असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही अशी माहिती मिळते आणि असे शासन आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. या GR मध्ये देखील सांगितलं आहे ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना Mahila Samman Yojana ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
डाउनलोड करा “Mahila Samman Yojana 2023” परिपत्रिका
मित्रांनो वरील दिल्या प्रमाणे डाउनलोड करा “Mahila Samman Yojana 2023″ परिपत्रिका” म्हणजेच Mahila samman yojana gr डाउनलोड करा व वाचून थेट मोबाईल मध्ये सेव्ह करा, तसेच डाउनलोड करून आपल्या सर्व जवळच्या लोकांपर्यंत परिवारामध्ये पोहोचउ शकता, जसे कि आपल्या घरातील कोणी वयस्कर बाई असेल जे गावाला राहत असतील, त्यांना हि माहिती वाचुन सांगू शकता, ज्याने करून खेड्यापाड्यातील महिलांना या योजनेचा Mahila Samman Yojana लाभ घेऊ शकता.
तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु.५०/- व रु. १००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. “Mahila Samman Yojana”
Conclusion :
तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना “Mahila Samman Yojana” या राज्य सरकार योजनेच्या अंतर्गत एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल कशी वाटली हि माहिती जरूर कंमेंट करून सांगा व “Mahila Samman Yojana 2023″ परिपत्रिका” वरती लिंक दिल्याप्रमाणे तिथून PDF डाउनलोड करू शकता, हा ब्लॉग आपल्या मित्र मंडळी आणि आपल्या परिवारामध्ये शेयर करायला विसरू नका धन्यवाद.
Chan mihiti dilit .. Khup abhar… mast lihale aahe sagal detail madhe…
It’s actually informative content.