Peruchi Wadi Chulivarachi Misal Nashik | पेरूची वाडी चुलीवरची मिसळ नाशिक

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या Peruchi Wadi Chulivarachi Misal ब्लॉग मध्ये, आज तुम्ही वाचणार आहेत माझा नाशिक मधील मिसळ बाबतीत अनुभव आणि जस द्राक्षच्या बागेत बसून मिसळ खाऊ शकतात तसंच पेरूच्या बागेत सुद्धा मिसळ खाऊ शकता ते ही नाशिक मध्येच.
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal

 

Peruchi Wadi Chulivarachi Misal

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मे २०२२ या वेळेस मी खास नाशिक मधील मिसळ खाण्याचं ठरवलेलं मुंबई हुन फक्त मिसळ खाण्यासाठी कोण जात, त्या पेक्षा आपल्या ठाण्यात डोंबिवली कल्याण मध्ये पण भेटते पण कस असत ना एकदा का मनाला वाटल हा जाऊन खायचीच आहे आणि बघायची एवढी का नाशिकचीच मिसळ फेमस असते तर जाऊन पोहोचलो नाशिक ला. Peruchi Wadi Chulivarachi Misal

अधिक वाचा –

2024 Famous Misal In Nashik || नाशिक मधील काही सुप्रसिद्ध मिसळचे ठिकाणं!!!

 
Peruchi Wadi Chulivarachi Misal
 

गंमत अशी झाली ना की काय सांगू , भरपूर ऐकलेलं नाशिक मिसळ बोलो तर king of misal nashik तर कुठे द्राक्षच्या बागेत चुलीवरची मिसळ,  साधना चुलीवरची मिसळ, पेरूच्या वाडीतली मिसळ, झटका मिसळ, मामाचा मळा चुलीवरची मिसळ, असे अनेक femous misal nashik मिळाले पण कल्याण हुन जायचं होतं तर उशीर होणार होता.

 
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal

 

 

कल्याणहून नाशिक १४० किलोमीटर अंतर होत, वाजले होते दुपारचे बारा, मित्रानो गंमत अशी आहे ना की नाशिक मध्ये कुठेही मिसळ घ्या त्याचा वेळ ठरलेला असतो, नाशिक मधील मिसळच ठिकाणं संध्याकाळी चार वाजता बंद करतात, हे माहीत होतं पण कुठे तरी मिळेल म्हणून आम्ही Peruchi Wadi Chulivarachi Misal या ठिकाणी मिळेल म्हणून निघालो त्या ठिकाणी.

 
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal
 
सकाळ पासून काही खाल्लं न्हवतं म्हंटल नाशिक मधेच जाऊन डायरेक्ट फेमस ठिकाणी आणि चव असणाऱ्या ठिकाणीच जायचं ठरवलं, गूगल मॅप द्वारे निघालो त्यात मित्रांनो कल्याण हुन किंवा मुंबई हुन नाशिक करत असाल तर ट्रॅव्हल चा खर्च पहिल्या पेक्षा आता खूप महाग झालाय या अगोदर जिथे ५००-७०० मध्ये जाऊन यायचो तिथे १०००-१५०० रुपये जातात.
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal
 

नाशिक ला जात असाल तर पकडून चला तुमचा २००० चा खर्च होणार, टोल, गाडी मध्ये गॅस, जेवण, पाणी, आणि त्यात जर तुमच्याकडे पेट्रोल ची गाडी असेल तर कर्माने मेला, त्या पेक्षा जिथं आहे तिथं काय तरी खावा बाकी नाशिक मध्ये एवढं करून पण गेलात आणि वेळेत नाही पोहोचला तर मिसळ बिसल विसरून जावा त्यांनी ठरवलेलं संध्याकाळी ४ नंतर बंद, बर पैसेच बोलू नंतर अजून काय मन झालं तर त्याला २००-३०० रुपये गेले म्हणून समजा.

 

नाशिकचीच मिसळ खायची त्यातच Peruchi Wadi Chulivarachi Misal Nashik हे ठिकाण फिक्स झालं होत, नाशिक मध्ये पोहोचलो, जायचं त्या ठिकाणी लाईनशीर फेमस मिसळ चे दुकान आहेत, जसे की साधना मिसळ, झटका मिसळ, द्राक्षेच्या बागेतील मिसळ, मामाचा मळा, मला काहीच माहीत न्हवतं माझ्याबरोबर काय होईल म्हणून तिथं ४.३० पोचलो ते ठिकाण बंद झालेलं समजलं.

 
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal

 

 

म्हंटल आता काय करायचं, खायला तर काय नाही भेटणार, पेरूच्या वाडीतील पेरूच आइसक्रीम तरी खाऊन घेऊ आणि तुमच्यासाठी येथील व्हिडिओ फोटो तर काढू, म्हणून विडिओ बनवला व फोटो काढले आणि या बद्धल माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून हा ब्लॉग लिहला, बाकी Peruchi Wadi Chulivarachi Misal बद्धल जर विचाराल तर खूप चांगलं ठिकाण आहे.

 

लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे तिथे लहान मूल खूप आनंदाने खेळू शकतात मस्त राहू शकतात नवनवीन काही तरी बघू शकतात, तिथे छोटे छोटे ससे, अन्य प्राणी सुद्धा बघू शकता, आतमध्ये काही दुकान आहेत टॅटू शॉप, आईसक्रीम दुकान, त्याच बरोबर छानसा सुंदर सुंदर फुलांचा बगीचा, छोटे छोटे फलक लावले आहेत त्यामुळे समजू शकत पेरूच्या वाडी पासून कोणकोणते सुप्रसिद्ध ठिकाण जवळ आहेत, जिथं तुम्ही भेट शकता.

 
 
Peruchi Wadi Chulivarachi Misal
 

त्याच बरोबर पेरूच्या बागेत झणझणीत मिसळ खाण्याची मज्जा घेऊ शकता, चांगल्या वातावरणात फिरू शकता, साधारण पणे ९०₹ मध्ये मिसळ मिळते, त्याच मिसळ बरोबर त्यानी बनवलेली गुळापासून जिलेबीचा स्वाद घेऊ शकता पापड, लस्सी तिखट तरि सर्व काही मिळत फक्त या साठी सकाळी १० ते संध्याकाळी ४ च्या आत इथं भेट दयची असती.

 

मुंबई मध्ये अस काय नाही वेळेचं काय नसत फक्त हे नाशिक मधेच का हा प्रश्न मला पडला, जाऊद्या काय तरी असेल पण सर्व मिसळीची दुकानं संध्याकाळी चार ला का बंद होतात हे अजून समजत नाही त्यासाठी एकदा तरी वेळेत येऊन मी त्याचा अनुभव घेणार आहे नक्की अस का,  बाकी सर्व चांगलं होत फक्त खंत एकाच गोष्टीची होती, मला मिसळ चा आनंद घेता आला नाही.

 
Peruchi Wadi Chulivarachi Misal
 

एकतर सकाळ पासून काय खाल्लं न्हवतं तिथं गेल्यावर पण काय भेटलं नाही मित्रांनो मज्जा म्हणजे जस गेलेलो तसच परत आलो आणि गपचूप आपण डोंबिवली मध्ये रात्रीचं जेवण केलं, अक्क्या नाशिक मध्ये कुठंच काय भेटलं नाही, गाडी थांबवावी पण नाही वाटली म्हणून थेट परत कल्याण डोंबिवली आलो आणि इकडचं जेवलो.

 

चला जाऊद्या बाकी Peruchi Wadi Chulivarachi Misal नाशिक हे ठिकाण मस्त होत, धन्य झालो आइस्क्रीम खायला भेटली, फोटो विडिओ काढायला भेटले, सांगितल्या प्रमाणे जर नाशिक मधिल मिसळ खायचा मन होत असेल तर संध्याकाळी ४ च्या अगोदर या, सर्व फेमस मिसळचं ठिकाणं एकाच जागी आहेत, जरूर भेट द्या अनुभव शेअर करा आणि माझा हा अनुभव कसा वाटला नक्की खाली कंमेंट मध्ये सांगा.

तसेच मित्रांनो खाली Youtube वरील व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, झाल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका धन्यवाद ….

 

 

Conclusion :-

जर Peruchi Wadi Chulivarachi Misal पेरूचीवाडी चुलीवरची मिसळ नाशिक येथे पोहचयचं असेल तर नाशिक शहराच्या बाहेरील लोकांनी लवकर लवकर संध्याकाळी ४ वाजताच्या अगोदर पोहचावे अन्यथा तुम्हाला पेरूच्या वाडी तील पेरूची आईस्क्रीम खावी लागेल व पेरूची वाडी असच पाहून घरी जावं लागेल. तर मित्रांनो कसा वाटला हा अनुभव जरूर खाली कंमेंट करून सांगा तसेच जर हा मराठी पेरूची वाडी चुलीवरची मिसळ ब्लॉग तुमच्या मित्र परिवाराला शेयर करू शकता.

धन्यवाद….

Share This Blogs 🙂

2 thoughts on “Peruchi Wadi Chulivarachi Misal Nashik | पेरूची वाडी चुलीवरची मिसळ नाशिक”

Leave a Comment