Parshuram Temple Chiplun | Tourist Places in Chiplun | Parshuram Mandir

 

आख्यायिका:- परशुरामांनी समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले  हे Parshuram Temple Chiplun. श्री परशुराम मंदिरच्या मागेच परशुरामाची आई रेणुकामातेचं मंदिरही इथे आहे. श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून हे मंदिर उभारण्यात आल. 

Parshuram Mandir Chiplun
आता सध्या मी चिपळूण मधील पेढे या गावात आहे परशुराम मंदिर कडे जात असताना गायत्री देवीचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळालं जस कि खालील फोटो मध्ये दाखवण्यात आलं आहे. हे मंदिर आणि पेढे हे गाव चिपळूण रेल्वे स्टेशन पासून ४-५ किलोमीटर अंतरावर असेल. सोबतच लहान मुलांनी बांधलेला छत्रपती शिवरायांचा किल्ला बघायला मिळाला. 
 
पेढे या गावातून छोटा डोंगराळ रस्त्यावर चालत चालत पुढे हा रास्ता परशुराम मंदिर हे ज्या डोंगरावर वसले आहे तो त्या पर्वताच्या बाजूने गेला आहे. तसेच गावातून जात असेलेला रस्ता वर वर चढत मुंबई गोवा या हायवे वर जातो तसेच फोटो मध्ये पाहू शकता.  हा मुंबई गोवा हायवे हे उलांडून समोर महिंद्रगिरी पर्वतावर जायचं त्या वरती वसलेले आहे परशुरामचं मंदिर. 
 
मुंबई गोवा रास्ता ओलंडून एक छोटासा रस्ता आहे जो महिंद्रगिरी पर्वता वर जातो आणि तिथून जस जस वरती जातो तसे तसे सर्वत्र हिरवीगार झाडे दिसू लागतात आणि सुंदर दृश्य त्याच बरोबर शांती मिळते. वरून जंगलातून जात असताना इथून असं काही विहंगम चिपळूणचा नजारा पहावयास मिळतो. 
 
रस्त्याने महिंद्रगिरी पर्वतावरून जात असताना मधेच हनुमानाची हि मूर्ती बघायला मिळते त्याच बरोबर वशिष्ठ नदी जिथे बघाल तिथे उंच उंच झाडे काही सुपारीचे झाडे आहेत आणि छान असा निसर्ग अनुभवयास मिळतो. 
 
खूप वेळ २५ ते ३० मिनिट चालल्या नंतर आता पोहोचलो मंदिरच्या जवळच, इथेच छोटस हॉटेल कोकणरूची, इथे नास्ता करण्याची सोया त्याच समोरील रस्ता जो मंदिराकडे जातो, नंतर त्या रस्त्या वरून पुढे मंदिर येते मंदिरच्या बाहेर इथे हार वैगरे घेऊ शकता, हे आहे प्रवेशद्वार श्री परशुराम मंदिराचं. 
 
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

चिपळूण मधील परशुरामच मंदिर बघण्यासाठी लोक लांबून येतात भेट देतात.

मंदिरा बाहेरील परिसर दुकान।

हे मंदिर  या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम हे जगदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे चिरंजीव.
 
मंदिराच्या समोरील खाली जात असलेला रस्ता जो जात आहे भक्तनिवास आणि प्रसादलाय कडे. 
 
महाविष्णूचे सहावे अवतार भगवान परशुरामांच हे निवास स्थान आहे या ठिकाणी भगवान परशुरामांनी तपश्चर्या साठी हे स्थान निवडलंय काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर. 
 
परशुराम मंदिरातील गाभार्‍यात परशुरामांचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरात ३ मुर्त्या दिसतात त्यापैक्की मधली मूर्ती हि भगवान परशुराम यांची. 
 
या मंदिराचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे मंदिर प्रथम विजापूरच्या अदिलशहाने बांधले. त्यानंतर ३०० वर्षांनी श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून हे मंदिर पुन्हा बांधल जंजिराच्या सिध्दिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागिर ख्रिस्ती होते. त्यामुळे मंदिरावर हिंदु, मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्यकलेचा अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. परशुरामांच्या जन्मोत्सानिमित्त कीर्तन, भजनाचे कार्यक्रम येथे ठेवले जातात. अक्षयतृतीयेस येथे मोठा उत्सव असतो.
तर मित्रांनो कास वाटलं हा श्री देव भूमी परशुराम मंदिर-चिपळूण | Parshuram Temple Chiplun | Tourist Places in Chiplun | Parshuram Mandir हा लेख जरूर खाली कॉमेंट करून सांगा. 
  

Leave a Comment