नाशिक सुला वाईन । nashik sula wine

 

Nashik Sula Vineyard

एक दिवशी जीवनात एक हा क्षण आम्ही मजेदार आणि आनंदाचा घालवला आणि काही आठवणी मनात साठवल्या ।
Sula vineyard
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

nashik sula wine :- एक दिवस मित्रांमध्ये अचानक प्लॅन झाला कुठे तरी जायचं यार कोणाला शेवट पर्यंत माहीत नव्हतं नेमका कुठला प्लेस कोणत्या ठिकाणी जाऊया जिथे मनमोकळं वावरता येईल कोणी कल्याण जवळील ठिकाण सुचवत होत कोण लांबच पण अमच्याकडे फक्त एक दिवस होता एक दिवसाचा प्लॅन करायचा होता आणि तो कुठे तरी जवळ पास करण्याचा विचार होता पण नंतर आमच्या मनात आले आणि त्यातून नवीन एक होणार जोडपं होत (असत चिडवत होतो आम्ही ) त्याला आपल्या मैत्रिणी ला भेटायचं होत आणि ती राहते नाशिक ला मैत्रीच्या मैत्रिणीची चुलत बहीण ही माझ्या मित्राची मैत्रीण मला माहित समजलं नसेल तुम्हाला तरी समजून घ्या की आमचं ठरलं नाशिक ला जायचं ।

कॉल ची सुरवात झाली दिवस ठरला नंतर निघालो नाशिक साठी सकाळी लवकर निघायचं ठरल्या प्रमाणे सर्व वेळेवर आले आणि आम्ही कल्याण हुन निघालो कल्याण हुन कल्याण फाटयवर जायचं मानून कोणगाव चा रस्ता पकडला त्या साठी अजून एक रस्ता होतो जो बाप गाव वरून जातो आणि नाशिक रोड ला भेटतो प्रवासाला सकाळी 7 वाजता सुरवात झाली ।
छान सकाळी थंड हवा आणि थोडा चहावैगरे घेतला आणि निघालो नंतर पेट्रोल वैगरे नाशिक रोड च्या आणि पडघा या जवळ पेट्रोल पंप वर भरले नंतर निघालो नंतर  कल्याण हुन जाताना घाट सुरवात होतो तिथे घाटाच्या अगोदर गाडी थांबवली खूप भूक लागली होती सकाळचा नाष्टा करायचय म्हणून छान हॉटेल बघून कार थांबवली आणि पोट भर नाष्टा केला आणि निघालो।

सभोतालचा परिसर तुम्हाला तर माहीतच असेल सर्वत्र हिरवीगार झाडे गवत आणि खुल निळसर आभाळ वाह !  तुम्ही imagine करू शकता काय वातावरण असेल काय मौसम असेल मस्त थंड वातावरण कार आणि खिडकीतून थंड हवा घेत आम्ही पुढे पुढे निघालो कसारा घाटात पोहोचलो

Ghat

 

 
 थांबलो फोटो वैगरे काढले थोड्या वातावरणाचा आणि घाटावरून ते खुल आभाळ बघत बसलो ।
Ghat kasara
 
   थोड्या वेळात आम्ही निघालो नंतर नाशिक जवळ येत होते तसे तसे रस्ते आम्ही पाहत होतो रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीन म्हणजे एकदम छान दमदार असे रस्ते आणि भवतलीच परिसर रस्त्याच्या बाजूचा तो दृश्य वाह मनाला अलगद स्पर्श करणारी ती हवा असे बघत बघत आम्ही नाशिक मध्ये पोहोचलो ।
 
     तिथून आम्ही थोडा रस्ता पकडून ब्रिज वरून सरळ जात होतो तसे तसे नाशिक मागे जात होते नंतर आम्हाला नाशिक मध्ये कुठे जायचे होत ते आम्ही गूगल म्याप (google map) मध्ये टाकले आणि तिथे गेलो नाशिक ची मैत्रीण आली आम्ही कल्याण हुन 7 वाजता निघालो आणि नाशिक ला 10-11 दरम्यान पोहोचलो थांबलो मैत्रिणीला पीकप केले ।
 
  नाशिक ला आलो भूक लागलेली थोडी नाशिक मध्ये काय भेटत चांगले जे भेटत ते नाही भेटला नाष्टा केला आणि निघालो जायचं कुठे अस त्या मैत्रिणीला विचारलं नाशिक मध्ये काय चनगले कोणतं ठिकाण चांगले  विचारले असता तिने सुला वाइन बद्धल सांगितले तस तर आम्ही ते त्या पूर्वी पण बघितले होते पण जे माझ्या सोबत होते त्यातील काही जणांनी नव्हते बघितले मानून गाडी आमची वळली सुला वाइन कडे ।
 
   सुला वाइन चा रस्ता जरा लांब वाटत होतं कारण ती रस्ता सांगत होती आणि तो गाडी चालवत होता त्यांना ही माहीत नक्की चाललं तरी कुठे आपण करण तिला ही एवढं माहीत नव्हते रस्ता चुकलो पुन्हा आम्ही गूगल मॅप लावला आणि सुला वाइन साठी निघालो मध्ये मध्ये छान दृश्य होते दिखावा होता तळे होते छान छोटा रस्ता होता असे बघत बघत आम्ही आमच्या सुला वाइन या ठिकाणी पोहोचलो ।
Sula vine
   सुला वाइन सुरवाती गेट वर डीपॉजीट घेतले ते दिले आणि गाडी आत घेऊन आलो थोडं महाग वाटत होते पण बोलो बघू या पूर्वी आलो असल्यामुळे मी जरा शांत होतो नंतर आम्ही गाडी पार्क करून पार्किंग मध्ये फोटो शेशन सुरू केले आत मधले छोटं जग अजून पहायचे होते गेट वर पोहोचलो आत शिरलो छान अस स्वागत ची पाटी लावली होती आणि तसेच आत गेलो जात जात फोटो काय संपत नव्हते नुसते फोटो काढत शिरलो ।
 
Sula wine

 

 
    ते द्राक्षच्याबागी वेगवेगळे disgn decore कधी न दृश्य काही ठिकाणी दिसत होते त्या बरोबर फोटो काढले आणि आत शिरलो तिथे सुला वाइन बद्धल माहिती दिली होती जस की कशी सुला वाइन बनते किती प्रकार आहेत हे ठिकाण कस आहे कधी बनले हे सर्व माहिती दिलेली छान वाटत होत आत मध्ये वाइन च्या बॉटल मोठ्या मोठ्या शोकेस साठी होत्या
Sula vine

 

 
 त्याबरोबर फोटो काढले वरती हॉटेल होते तिथे गेलो थोडं ऑर्डर केलं थोडस महाग होत पण ठीक होय वाइन घायला एक एक छोटा ग्लास 200-300 रुपये एवढी किंमत होती रेड वाईन घेतलेली किमती तुम्ही नेट वर पाहू शकता त्यासाठी इथे क्लिक करा ।
IMG 20200714 001203
    छान वाटत होते छान उगडे हॉटेल समोरचा देखावा द्राक्षयची बाग आणि समोर ठवलेली ती वाईन ची बाटली त्यात होती रेड वाइन थोडी कडू होती पण छान होती तिथे जाऊन ही वाईन पियची मज्जा काही औरच त्याबरोबर त्या काचेतील ती वाइन मस्त त्याबरोबर खाण्यासाठी
Screenshot 2020 07 13 23 43 46 05

 

Screenshot 2020 07 13 23 43 56 68
 होते थोडं अप्रतिम वाटत होतं सर्व खाल्लं पिलं आणि आम्ही निघालो निघताना ही फोटो काढायचे सोडले नाही जिथे भेटेल तिथे फोटो काढले सर्व आठवणी घेऊन आम्ही गेट मधून बाहेर पडलो आणि परतीच्या प्रवासकडे वळलो।
     गाडी मध्ये बसलो  बडबड सुरू झाल्या नाशिकच्या मैत्रिणी बद्धल थोडं गुपित कळलं तिला गाणं गायला खूप आवडत म्हणून तिला गाणं गायला सांगितले आणि तिने उत्तम रित्या ते गाणं बोली तिचा आवाज ही छान होता आणि ते गाणं सुद्धा, जाताना एक छान हॉटेल लागले छान देखावा होता हॉटेल मध्ये मस्त वाटत होते
Screenshot 2020 07 14 00 01 50 57

 

Screenshot 2020 07 14 00 03 12 98

 

Screenshot 2020 07 14 00 03 42 15
असा देखावा मी पहिल्यांदा पाहिलेला अप्रतिम होता तो क्षण. थोडं फिरलो नाशिक मध्ये नंतर संध्याकाळचे 6 वाजले थोडा उशीर होत होता तसेच नाशिक च्या मैत्रिणीला अलविदा घेत आम्ही कल्याण कडे निघालो संध्याकाळ होत होती सूर्य ही मावळा होता रात्र होत चालली तशी तशी आमची गाडी पुढे पुढे जात होती नंतर थोडा थांबून जेवन वैगरे केले येताना काही त्रास झाला नाही शांतपणे १०-११ वाजता आम्ही कल्याण ला पोहोचलो
    आणि सर्व च्या डोळ्यावर झोप दिसत होती तसे सर्वाना अप आपल्या घरी पोहोचवले आणि आम्ही सुद्धा घरी व्यवस्तीत घरी पोहोचलो हा असा दिवस होता आमचा एका दिवसाचा प्लॅन म्हणून कल्याण ते नाशिक असा आमचा प्रवास आणि मज्जा नवीन अनुभव सुला वाइन बद्धल थोडे मनोगत व्यक्त केले ।
तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि फोल्लोव करा आपल्या भावाला
।। धन्यवाद ।।
  

Leave a Comment