नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुंबई जवळ असणाऱ्या अंबरनाथ या शहरामधीलअसणारा Taavli Hidden Waterfall Ambernath या बद्धल माहिती वाचणार आहोत, आज मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, हा धबधबा नक्की कुठे, कसा आहे, त्याच्या आजूबाजूला अजून कोणती ठिकाण आहे, तसेच मित्रांनो हि माहिती आवडल्यास आपल्या मित्राबरोबर शेअर करू शकता.
Taavli Hidden Waterfall Ambernath
Taavli waterfall ambernath, secret waterfall in ambernath, best safe waterfall in ambernath, hidden waterfall in ambernath, तावली धबधबा बोहोनोली गाव, beautiful and safe waterfall in ambernath अश्या काही नावांनी हा धबधबा प्रसिद्ध आहे त्यातच मी एक माझ्या युट्युब चॅनेल वर Before Go Taavli Waterfall Ambernath ह्या नावाने व्हिडिओ अपलोड केला आहे तो जरूर पहा तर चला खालील माहिती वाचूया.
तावली धबधबा आहे कसा ?
ऑगस्ट २०२२ : तावली धबधबा हा एक छोटासा पण सुंदर असा धबधबा आहे, अंबरनाथ या शहराला निसर्गाचा वारसा लाभला आहे तसेच बदलापूर ला हि निसर्गसंपन्न सौंदर्य लाभलं आहे. हे मुंबई जवळ ठिकाण असल्यामुळे मुंबई किंवा इतर शहरातले पर्यटक आवर्जून पावसाळ्यात अंबरनाथ बदलापूर या शहरातील पावसाळी ठिकाणांना भेट देत असतात, आपल्या ताणतणावाच्या जीवनातून एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा शोध घेत असतात.
लोक शनिवार-रविवार आला कि मुंबई जवळील ठिकाण शोधत असतात त्यातील न माहित असणारे व कमी गर्दी असणाऱ्या पर्यटन स्थळं जास्त करून भेट देत असतात, काही लोक best monsoon getaways from mumbai असे शोधत असतात, या पूर्वी मी मुंबई जवळील पावसाळ्यात भेट देण्याकरता चांगले ठिकाणं या वर ब्लॉग लिहला आहे तो तुम्ही पाहू शकता, खरं तर हि वेबसाईट मुंबई जवळील ठिकाण व इतर विषय साठी चालू केली आहे आणि आपल्या मराठी बंधु ना मराठी मध्ये माहिती पोहोचवत आहोत.
Taavli Waterfall चा रस्ता !
मित्रांनो हा एक best monsoon getaways from mumbai आहे, मुंबई किंवा इतर शहरातून यायचं असल्यास अंबरनाथ या रेल्वे स्टेशन ला उतरून Ambernath MIDC हे ठिकाण सांगून रिक्षा घेऊ शकता भाडे माहित नाही पण लगबग ५० ते १०० रुपये असू शकते, त्यापेक्षा सोपे मित्रांनो स्वतःच्या गाडी ने इथे जाऊ शकता, हवी ती एन्जोयमेंट करू शकता तिथं पार्किंग सुद्धा आहे म्हणजे दुचाकी गाडी पार्क करू शकतो अशी जागा आहे, अंबरनाथ बदलापूर हायवे हुन सुदामा (कृष्णा) हॉटेल पासून डावीकडे रास्ता आहे तुम्ही गूगल मॅप वर मिळेलच अगदी १५ मिनिटाच्या अंतरावर आहे, फक्त इथे येताना लवकर जावा.
तावली धबधबा नक्की ते कुठे?
Taavli Waterfall एक छोटासा छान असा वॉटरफॉल आहे, तो मलंग गड डोंगर रांगेतून वाहत खाली येतो मधेच खडकाळ प्रदेश असा आहे त्यातून हा पाण्याचा झरा वाहत येतो, जेमतेम ५ ते १० फूट उंच असेल असा अंदाज आहे, तावली धबधबा साठी बोहोनोली गाव तुन सुद्धा रस्ता आहे, बाजूला निसर्गरम्य ठिकाण आहे, तसेच हा वॉटरफॉल एन्जॉय करून झाल्यास Adventure In Taavli Waterfall म्हणून जरा पुढे ताहुली पीक सुद्धा ट्रेक करू शकता, वरती जाऊ शकता वरती डोंगरावरून जो नजारा दिसतो तो अफलातून आहे.
तुम्ही गुगल मॅप मध्ये Taavli Waterfall टाकून जरी शोधलं तरी हे ठिकाण तुम्हाला मिळून जाईल. तिथून ४० ते ५० मिनिटाचा ट्रेक आहे जे चालत वॉटरफॉल पर्यंत जावं लागते, पण जाताना जो अनुभव मिळतो तो कुठेच नाही, सर्वत्र हिरवीगार झाडे, मलंग गड व ताहुली चा विहंगमय नजारा, चालताना छोट्या वाटा बाजूला फुल त्याच बरोबर खळखणारा पाण्याचा आवाज, पक्ष्याचा आवाज सर्वत्र शांती waterfall trek near mumbai जर पाहत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे.
माझा Taavli Waterfall चा अनुभव
मित्रांनो खाली तुमच्यासाठी मॅप दिला आहे, पण त्या पूर्वी मी माझा अनुभव सांगणार आहे, जर तुम्ही Taavli Waterfall चा प्लॅन करत असाल तर सकाळी १० ते ११ वाजल्यापासून करू शकता, गूगल मॅप ने रस्त्याची चुकामुक होऊ शकते, शेवटचा चौक येईल birsa munda चौक तिथंच तुम्ही धबधब्याची विचारपूस करू शकता, सरळ येऊन डावी कडे वळायचं आहे तिथं Taavli Waterfall ला जाण्यासाठी रस्ता आहे पण तिथे कोणाला Taavli Waterfall विचारलं तर कोणी सांगणार नाही, जवळील धबधबा विचारा बरोबर सांगतील.
Taavli Waterfall जाण्याकरिता DiGiChem industries कंपनी पर्यंत चांगला सिमेंट रोड आहे, तिथून offbeat road रोड आहे, तसेच पुढे जसा चालत राहू तस सुंदर निसर्गाचं रूप पाहायला मिळेल, मित्रांनो हे ठिकाण पावसाळ्यात छान वाटते, तिथून किमान ४० ते ५० मिनिटांचा ट्रेक आहे पण चालताना निसर्गाचा मन प्रसन्न करणारा देखावा पाहायला मिळतो व सर्वत्र शांती खळखळणर्या पाण्याचा आवाज आजूबाजूला चिमण्यांचा आवाज असं काही सखान अनुभवायला मिळतात.
लोक one day trip near mumbai in monsoon आणि इतर पर्यटन स्थळं शोधत असतात, या अगोदर आपण आपल्या ब्लॉग्स वर भरपूर ठिकाणं बद्धल माहिती दिली आहे, त्याच बरोबर व्हिडिओस सुद्धा youtube वर टाकत असतो, तसेच मित्रांनो तावली धबधबा याचा देखील विडिओ शेअर केला आहे तो खाली दिला आहे तो तुम्ही पाहू शकता, मी कल्याण हुन असच फिरण्यासाठी youtube वर जवळच ठिकाण पाहत असताना Taavli Waterfall चा विडिओ समोर आला व मी प्लॅन केला.
मी व माझा मित्र सुनील या ठिकाणी भेट देण्यास निघालो google map द्वारे अंबरनाथ midc पर्यंत व शेवटच्या चौका पर्यंत व्यवस्थित पोहोचलो, तिथून डावी कडे रास्ता दाखवत एका गावा मध्ये पोहोचवला पण तिथून चांगला रास्ता नव्हता, तिथंच गावातल्या पोरांना Taavli Waterfall Ambernath विचारले असता त्यांनी DiGiChem industries समोरून जाण्याचा सल्ला दिला तिथून ते ठिकाण जवळ आहे असे सांगितले, तसेच आम्ही एक चु^&% विडिओ पाहत होतो पण त्यात त्याने व्यवस्थित असा रस्ता सांगितला नाही.
आम्ही तिथे पोहोचणारच होतो पण वेळे अभावी आम्हाला परतीचा प्रवास करावं लागला, कारण आम्हाला तावली धबधब्याचा रस्ता शोधण्यासाठी १ ते १.३० तास लागला, म्हणूनच भरपूर वेळ आमचा वाया गेला, व ट्रेक अर्धवट झाला. पण पुढे कधी तरी नक्कीच मी हा वॉटरफ़ॉल एक्सपोलर करेलच, पण त्या दिवशी जो मी अनुभव घेतला तो अप्रतिम व न विसरणारा होता, Taavli Waterfall चा छोटासा रस्ता त्याच बरोबर बाजूला छोटासा ओढा होता व सर्वत्र गर्द हिरवीगार झाडे.
तसेच मित्रांनो आता मी Taavli Waterfall जवळील काही ठिकाणांची नावे खाली दिली आहे. त्यांना देखील तुम्ही भेट देऊ शकता, या वेबसाईट वर तुम्हाला अंबरनाथ मधील काही ठिकाण हि तुम्हाला माहित पडतीलच असतील, त्याच बरोबर अजून काही ठिकाण बद्धल माहित आपण घेत आहोत ती हि तुमच्या सोबत शेअर करेलच. बाकी मित्रांनो भरपूर माहिती मी या तावली धबधब्या बद्धल घेतली व तुमच्या बरोबर शेयर केली, छान धबधबा आहे आजूबाजूला छान निसर्गसोंदर्य दिसते बाकी अजून काय.
या अगोदर हि आपल्या या ब्लॉग्स वर बदलापूर मधील काही ठिकाणं व तेथील छान फोटो शेअर केले आहेत, आणि त्या ब्लॉग पोस्ट ला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील येतोय, जसे बदलापूर मधील बारवी धरण त्याच बद्धल माहिती दिलेली, आणि बदलापूर मधील कोंडेश्वर मंदिर तेथील निसर्गाचं रूप चांगला व वाईट अनुभव देखील मी शेअर केला आहे, तसेच मित्रांनो चिखलोली धरण तिथले फोटो माहिती देखील दिली, दिवसाला त्या ब्लॉग पोस्ट वर वाचण्याची संख्या वाढत आहे आणि आपली माहित गुगलच्या जो कोणी शोधत असेल त्याला पहिल्या परिणाम (1st page of google) मध्ये दिसते.
जाणून घेऊया Taavli Waterfall जवळील ठिकाण
- perrigo waterfall
- Ambernath MIDC waterfall
- Chikhloli River RH point
- Tahuli Peak
- Waghoba mandir ambernath
- Zebra Waterfall, Badlapur
- kondeshwar temple badlapur
निष्कर्ष
तर मित्रानो आपण या ब्लॉग मध्ये Taavli hidden waterfall ambernath बद्धल माहिती दिली आहे, आशा करतो हि माहिती तुम्हाला आवडली असेल कंमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा व अन्य काही सूचना विचार विनमय असतील ते देखील शेयर करू शकता, तसेच आपल्या मुंबई जवळील अंबरनाथ बदलापूर शहर कसे आहे हे देखील माहित झाले असेल, तसेच जर हि माहिती जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांशी शेयर करा तर ह्या ब्लॉग मध्ये एवढंच पुढच्या ब्लॉग साठी subscribe करा.
Before You Go Taavli Hidden Waterfall Ambernath Watch This Video
विडिओ संपूर्ण पहा आणि जरूर लाईक करा मराठी चॅनेल ला प्रोत्साहन द्या तुमचा एक लाईक अजून मराठी मध्ये कन्टेन्ट बनवण्याची टाकत देतो तर मित्रांनो लाईक करा कंमेंट करा आणि चॅनेल ला subscribe करा.
पर्यटकांसाठी विशेष सूचना आहे
खराब वातावरण अतिवृष्टीचा इशारा असल्यास या ठिकाण जाणे टाळावे, तसेच पर्यटनासाठी निघण्यापूर्वी स्थानिक प्रश्नाच्या किंवा ग्रामस्थांच्या काही सूचना असल्यास त्याचे पालन करावे, त्याच बरोबर एक अश्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना सोबत घेऊन जाणारे खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटल्या व इतर काही, इत्रत फेकून न देता सोबत घेऊन यावे ज्याने करून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही व निसर्ग सौदर्य देखील अबाधीत राहील.
धन्यवाद
अनिल शिंदे ✍