IT Company Madhla 9 to 5 job

 
 
 

मुद्दामून टायटल इंग्लिशमध्ये लिहिलंय, कारण खरंच मित्रांनो मुंबईत किंवा कुठेही IT मधला जॉब काही साधा नसतो. ‘9 to 5 job in Mumbai’ किंवा ‘Day in the Life of an IT Professional in India’ म्हणतो तेवढ्यात ते काम संपत नाही.

आज या ब्लॉगमध्ये मी IT क्षेत्रातील माझा अनुभव, इथल्या चांगल्या-वाईट गोष्टी, दडपण, संधी, आणि या क्षेत्रात खरंच काय चालतं ते साध्या भाषेत सांगणार आहे. IT हा क्षेत्र चांगला आहे का वाईट? कोणासाठी योग्य आहे, कोणासाठी नाही?  हे सगळं आपण या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

नमस्कार मित्रांनो, मी अनिल शिंदे! माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत
 
मनापासून स्वागत माझ्या या ब्लॉगमध्ये आणि या वेबसाईटवर. या ठिकाणी मी तरतमवार विविध विषयांवर ब्लॉग लिहिले आहेत. या ब्लॉगवर तुम्हाला मिळतील
 
  • मराठी ब्लॉग कसा सुरू करावा आणि त्यातून पैसे कसे कमवावे

  • मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर खास ठिकाणांची माहिती

  • सोशल नेटवर्कवरील ट्रेंडिंग विषय आणि चर्चेतले मुद्दे

  • आणि माझे पर्सनल अनुभव, IT क्षेत्रातील प्रवास, तसेच Backup/TSM/Spectrum Protect बद्दलची माहिती

या सर्व गोष्टी साध्या मराठीत, माझ्या अनुभवातून आणि जमेल तितक्या सोप्या भाषेत तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे.

आपल्या या वेबसाईटवर आपण मराठीतून विविध विषयांवर माहिती शेअर करतो. आमची ही वेबसाईट Google AdSense Approved आहे आणि इथे तुम्हाला Travel, Tech, Trending Topics, IT Career, Backup/TSM Experience आणि माझे वैयक्तिक अनुभव वाचायला मिळतील.
या ब्लॉगला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.

माझी नोकरी आणि IT क्षेत्रातील अनुभव !

मी मुंबईतील बेलापूर (Navi Mumbai) येथे IDBI Intech IT Company मध्ये काम करतो. ही कंपनी IDBI Bank ला तांत्रिक सपोर्ट करते. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की IDBI Intech मध्ये नोकरी म्हणजे IDBI Bank मध्येच काम.
तसं नसतं. ही एक IT कंपनी आहे आणि इथे विविध IT roles, support work, development आणि banking projects वर काम केलं जातं.

मुंबईत IT नोकरी म्हणजे फक्त 9 to 5 job नाही

– कधी 2 शिफ्ट
– कधी रात्रीचं काम
– कधी सणाला सुट्टी नाही
– कधी 2-2 दिवस ऑफिसमध्येच troubleshooting

माझा प्रवासाचा वेळच साधारण 2 तास, जाऊन बसतो. पैसा मिळतो, पण work-life balance कमी असतो. हाच IT चा कटू आणि खरा अनुभव.

IT मध्ये काय शिकायला मिळतं?

  • अनुभव असेल तर चांगला पगार मिळतो
  • नियम पाळावे लागतात, जबाबदारी घ्यावी लागते
  • ताणतणाव असतो पण स्वतःला मजबूत बनवत जातो
  • हार मानली तर काही मिळत नाही; टिकून राहिलं तर मार्ग नक्की सापडतो

मी या क्षेत्रात 9+ वर्षे आहे. सण-वार, सुट्टी, कौटुंबिक वेळ कधी हातातून निसटतो, पण करिअर घडवायचं असेल तर प्रयत्न करावेच लागतात.

कालचा अनुभव – एक खरी घटना?

काल मी विचार केला सुट्टी घ्यावी, थोडा आराम करावा. बॉसला फोन केला तर तोही आजारी होता पण म्हणाला,
“अरे माझी पण तब्यत नाही ठीक सांभाळून घे,.”

ऑफिसमध्ये गेलो तर स्टाफ नव्हता, सर्व काम एकट्यावर. तेवढ्यात production server issue! दोन-तीन servers connect होत नव्हते. संपूर्ण दिवस troubleshooting, logs, commands, आणि शेवटी रात्री उशिरा issue resolve.

IT मध्ये असं असतं?

  • Issue resolve होईपर्यंत झोप नाही
  • Server down असेल तर स्वतःची तब्यत विसरावी लागते
  • Company पेक्षा client’s environment जास्त priority

सत्य आयुष्य: पैसे vs वेळ?

  • पैसा आहे… पण वेळ नाही
  • EMI, Loan, Expenses… थांबत नाहीत
  • शरीर-मन थकतात, पण जबाबदारी थांबत नाही
  • IT मध्ये work-life balance जिव्हारी लागतो

ज्याला हे balance जमलं – तोच खरा विजेता.

जर तुम्ही IT नोकरी शोधत असाल?

जर तुम्ही IT jobs in Mumbai / Freshers Walk-ins शोधत असाल आणि:
– BSc-IT / BCA / BE / BTech / MCA केले असाल
– IT Support / Networking / Backup / Data Center / Cloud मध्ये अनुभव असेल
– किंवा मार्गदर्शन हवं असेल तर खाली कमेंट करा. मी मार्गदर्शन करीन, शक्य तितकं.

शेवटचं एक वाक्य

IT field cool आहे… पण सर्वांसाठी नाही.
ज्याच्यात धैर्य, संयम, आणि शिकायची तयारी आहे,
त्याच्यासाठी आजही हे क्षेत्र सुवर्णसंधी आहे.

Thank you for reading!
Best of luck & happy troubleshooting!🙏
#9to5jobs #worklifebalance #ITjobs #Mumbai #DatacenterLife #TSM #SpectrumProtect

Leave a Comment