IT Sector Jobs: आयटी क्षेत्रात मेगा भरती! TCS, Infosys मध्ये फ्रेशर्सना मोठी संधी; पॅकेज 9 ते 11 लाख..

IT Sector Jobs
IT Sector Jobs

IT Sector Jobs: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमधील कोणीतरी आयटी क्षेत्रात नोकरी शोधत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ठरणार आहे. आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याची बातमी समोर येत आहे. Infosys आणि TCS ने नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

इन्फोसिस फ्रेशर्सना 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देत आहे आणि TCS फ्रेशर्सना 11 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देत आहे. एका अहवालानुसार, IT दिग्गज इन्फोसिसने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे एक नवीन पॉवर प्रोग्राम लॉन्च केला आहे. इन्फोसिस कंपनी साधारणपणे तीन ते साडेतीन लाखांचे वार्षिक पॅकेज देते. पण आता इथे तुम्हाला 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळेल.

पॉवर प्रोग्राम | IT Sector Jobs Power Program

कंपनी पॉवर प्रोग्राम अंतर्गत आता स्पेशलाइज्डसाठी निवड करणार आहे. उमेदवारांकडे जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडिंग आणि प्रोग्रामिंगमध्ये स्पेशलायझेशन असल्यास इन्फोसिस कंपनीद्वारे तुम्हाला 4 लाख ते 6.5 लाख रुपयांपासून 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले जाईल. हे वेतन उमेदवाराच्या स्पेशलायझेशनवर अवलंबून असणार आहे. टीसीएसच्या प्राईम प्रोग्रामला प्रतिसाद म्हणून इन्फोसिसद्वारे हा प्रोग्राम जाहीर केला गेला असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचू शकता: TSM Admin Job in Marathi | Earning From This Job

TCS ला 3 प्रकारच्या नवीन लोकांची गरज आहे | IT Sector Jobs Need of this Peoples

आपल्या प्राईम प्रोग्रामसाठी टाटा समूहाची कंपनी TCS आता 9 लाख ते 11 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर करत असल्याचे दिसून येत आहे. जनरेटिव्ह एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या देखील TCS प्राइम प्रोग्राम अंतर्गत येतात. TCS द्वारे आता 3 प्रकारच्या फ्रेशर्सची निवड केली जात आहे. पहिले पॅकेज 3.6 लाख रुपयाचे, तसेच दुसरे डिजिटल पॅकेज 7.5 लाख रुपयाचे आणि तिसरे प्राइम पॅकेज यामधे उपलब्ध केले गेले आहे.

फ्रेशर्ससाठी चांगली संधी | IT Sector Jobs Best Opportunity for Freshers

तुम्ही संबंधित क्षेत्रातील कौशल्य असलेले फ्रेशर्स असल्यास, तुम्हाला येथे चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाईल. Infosys आणि TCSS दोन्ही कुशल व्यावसायिकांना अधिकाधिक नोकऱ्या देऊ इच्छितात. हे सगळं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे घडत असल्याचं दिसून येत आहे. बदलत्या बाजार परिस्थिती लक्षात घेऊन इन्फोसिस 15,000 ते 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. TCS 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंगमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहे. IT Sector Jobs

Conclusion:

तर मित्रांनो, अश्या करतो ही छोटीशी जॉब अपडेट तुम्ही आवडली असेल, या पुढील जॉब अपडेट करिता आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा व रोज मिळवा नव-नवीन महाराष्ट्रातील जॉब अपडेट एक ठिकाणी.. धन्यवाद…

20240220 2028304526101735548947611

Leave a Comment