TSM Admin Job in Marathi | Earning From This Job

TSM admin job in marathi ही माहिती आपल्या मराठी मित्रांना करिता आहे जे ह्या क्षेत्रात करिअर करायचं बघू इच्छित आहे अथवा नुकतेच काम करत आहे. सध्या IT SECTOR मध्ये Earning From This Job तसेच हा जॉब कसा मिळू शकतो या बद्धल सर्व माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर ब्लॉग संपूर्ण वाचा. 

TSM admin job in marathi
अनुभव मराठीमध्ये
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

TSM ADMIN JOB IN MARATHI

TSM Admin Job In Marathi हि एक आयटी सेक्टर मधील कामाबद्धलची माहिती आहे, हि माहिती आणि हा अनुभव त्या व्यक्ती साठी लिहत आहे जे या क्षेत्रात काम करत आहे. या कक्षेत्राबद्धलचा अनुभव स्वतः अनुभवत असून माझ्या मराठी मित्राकरिता शेअर करत आहे ज्याने करून या क्षेत्रात कॅरिअर करायचा विचार करत असाल तर हि माहिती अनुभव संपूर्ण वाचा.

Tsm Job Description In Marathi

TSM म्हणजे काय ?

वर्ष २०२३ TSM administrator, backup admin याला आताच्या घडीला IBM Spectrum protect अस म्हंटल जाते, ह्या क्षेत्रात काम करत असणार्यां सर्वाना माहीत आहे, बाकी ज्यांना माहीत नाही त्याच्या साठी ही माहिती मी मराठी मधून आपल्या मराठी मित्रांसाठी देत आहे. TSM admin हा TSM नावाच्या सॉफ्टवेअर वर काम करत असणारा व्यक्ती आहे TSM administrator म्हणून ओळखला जातो, TSM बद्धल थोडी फार माहिती पुढे मिळेलच, त्याच्या काम बद्धल सांगितलं तर सर्व माहिती आपल्याला इंटरनेट वर आहेच पण मराठी मधून आपल्या मित्रकारिता ही माहिती देत आहे.

TSM admin चा फुल फॉर्म

TSM admin चा फुल फॉर्म Tivoli Storage Manager असा होतो, हा एक backup software आहे, या लेखात तुम्हला TSM बद्धल basic माहिती देणार आहे, TSM हा एक सॉफ्टवेअर असून मोठ्या मोठ्या IT company’s आपल्या critical backup साठी वापरतात ज्याने करून काही storage ची अडचण झाल्यास, आहे तसा डेटा रिकव्हर करू शकतो. डेटा LTO टेप मध्ये घेणे, ह्या सोफ्टवेअर ला दररोज मॉनिटर करून त्यावर व्यवस्थित काम करणं TSM बद्धल अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इंटरनेट वर मिळतील.

Earning From This Job

TSM म्हणजेच IBM spectrum protect सध्या 8.1.x ते 8.1.17 ह्या version पर्यंत आहे, ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मित्रांना माहीत असेल ह्या क्षेत्रात किती काम असत माझं वयक्तिक मत सांगितलं तर खूप प्रमाणात आपण या मध्ये करिअर करून पैसे कमवू शकतो, पण हो DBA admin किंवा Linux admin एवढा नाही. ह्या क्षेत्रात L1,L2,L3 पद्धतीने काम होत असतात, उदाहरणाथ  L1 च काम दररोज TSM server health monitoring आणि backup schedule चेक करणं बॅकअप पुन्हा घेणे, अन्य काही छोटी मोठी काम L1 ह्या लेव्हल मध्ये आहे.

 
L2 ह्या लेवल मध्ये नवीन नवीन बॅकअप configuration installation restoration backup related troubleshooting करतात, तसेच L3 मध्ये मोठी कामे जसे की TSM implementation Policy defin करणं सर्व TSM बद्धल ज्ञान असणारा, कोणतीही गोष्ट माहीत नाही असं नसणार, सर्व कामाचा TSM अनुभव असणारा, inshort TSM सर्व्हर्स चा करता धरता, ह्या क्षेत्रात पैसे पगार, करिअर ग्रोथ बद्धल बोलाल तर वर सांगितल्या प्रमाणे, मी सुद्धा ह्या क्षेत्रात कार्यरत आहे सर्वात आगोदर मला एक IT कंपनी मध्ये ह्या TSM बद्धल माहिती मिळाली जिथे हा सॉफ्टवेअर वापरला जात असे, ही कंपनी बँक साठी काम करत असे ह्या सॉफ्टवेअर चा वापर बँक सर्वर चे बॅकअप घेण्याकरिता होत असत. हा सॉफ्टवेअर मोठे मोठे IT कंपनी वापरत असत.
 

IBM spectrum protect tsm server up gradation 8.1.13 to 8.1.13. fix 100

मोठे सर्व्हर्स तसेच महत्त्वाचा डेटा याचा स्टोर करण्याकरिता TSM (IBM spectrum protect) चा वापर होत असे, ह्या बद्धल जेवढी माहिती देऊ तेवढी कमी आहे, गेल्या १० वर्षं पासून मी या सॉफ्टवेअर वर काम करत आहे, ह्यात माझं ज्ञान थोडस वाढलंय, म्हणूनच मी ही माहिती आपल्या मराठी मित्रांसाठी देतोय, ह्या क्षेत्रात नवीन असणारे मुलं खूप इच्छुक असतात जसे की पुढे काय करू शकतो ह्याचा आपल्याला काय फायदा होईल ह्यात कॅररिअर आहे का ह्या बद्धल स्पष्टता म्हणून ही पोस्ट लिहत आहे.

TSM JOB बद्धल चा माझा अनुभव  

मी सुरवातीला TSM operator म्हणून काम केलंय त्या नंतर थोड्या वर्षांनी त्याच कंपनी मध्ये मध्ये TSM admin म्हणून काम करायला मिळालं नशिबाने साथ व मेहनतीच्या जोरावर थोडास करिअर मध्ये वरचढ करून तसेच पूर्वी पासून आवड ती नंतर मोठी झाली, IT कंपनी मध्ये काम त्यात हा जबरदस्त प्लॅटफॉर्म व आजू बाजूचे मित्र यांनी खूप साथ दिली, ह्याच TSM वर जॉब करून मी आता दुसऱ्या कंपनी मध्ये लागलो व एका गव्हर्नमेंट च्या प्रोजेक्ट वर आता सध्या काम करत आहे ते ही TSM admin (IBM spectrum protect) म्हणूनच.
 
TSM server, Library, LTO tapes ह्या बद्धल माहिती तुम्हाला तुम्ही ह्या क्षेत्रांत लागल्यावर माहिती पडेल, ज्यांना ह्या क्षेत्रात कस यायचं माहीत नसेल तर सांगतो, तुम्ही IBM spectrum protect certification करून गूगल वर ह्या बद्धल माहिती घेऊन कंपन्या मध्ये जॉब बघू शकता, शिक्षण IT मधून हवं, मला माहित आहे खूप अवघड आहे पण मित्रानो IT सेक्टर मध्ये जॉब करणं एवढ पण अवघड नाही, जर तुम्ही एक जागी एका कंपनी मध्ये कोणत्याही क्षेत्रात असाल आणि तिथं थांबून तांडगा अनुभव घेऊन, बाहेर कंपन्या मध्ये जाल तेव्हा समजेल आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते.
 

TSM admin job बरोबर L1 ला जाल तर at list TSM monitoring च काम सुरवातीला भेटलं तरी चांगलाच आहे, मी सुद्धा सुरवातीला backup मध्ये काम करत होतो as tsm operator फक्त backup manually लावून ते मॉनिटर सुद्धा करायचं, मला माहिती आहे ज्यांना TSM म्हणजे काय माहित नाही, त्यांना काही ह्या पोस्ट मध्ये समजत नसेल, पण ही माहिती त्या लोकांसाठी आहे जे लोक TSM admin job ह्या बद्धल माहिती घेत असेल आणि ह्या बद्धल जाणून घेऊ इच्छितात. तसच मित्रांनो मी TSM मध्ये येणारे अनुभव मी या वेबसाईट वर शेअर करत असतो ते देखील तुम्ही वाचू शकता.

Conclusion:-

तर TSM administrator बद्धल सांगण्यासारखं तर खूप आहे पण कमी शब्दात सांगायचं झालं तर IT मध्ये काम करायचं झालं तर सुरवात छोट्या गोष्टी ने करा मेहनत करा ठिकून राहा थांबून शिका वेळ गेला तरी चालेल, कधी तुमची वेळ बदलेल सांगता येत नाही ह्या क्षेत्रात चांगलं करिअर आहे मुबलक पैसे कमवू शकता, चांगलं जीवन घालू शकता, पैसे कमवायचे तर वेळ लागणार जस काम असेल तस करावं लागेल नंतर चांगलं शिकून एक चांगल्या ठिकाणी थांबून रेटाइरमेन्ट घेतली तरी चालेल 😀