IBPS PO Recruitment 2024: तब्बल 3955 रिक्त जागांवर भरती… पगार 52 ते 55,000/-… वाचा सविस्तर…

IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Recruitment 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे भारतभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी, प्रोबेशनरी ऑफिसरची नियुक्ती करण्यासाठी दरवर्षी IBPS PO परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची सुरुवात 2011 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून यावर्षीची 2024 ची ही परीक्षा 14 वी परीक्षा असणार आहे. IBPS CRP PO/MT CRPF-XIV 2024 चे उद्दिष्ट सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांमधील रिक्त पदे भरणे हे आहे. IBPS PO भर्ती 2024 साठी निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यात होते: प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. IBPS PO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IBPS PO Recruitment 2024 साठी, रिक्त पदांची संख्या ही मागील 4455 वरून आता 3955 केली गेली असल्याचं दिसून येत आहे. IBPS PO 2024 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे आणि 28 ऑगस्ट 2024 रोजी अर्जाची मुदत संपणार आहे. परीक्षेबद्दल अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही, www.ibps.in वर उपलब्ध जाहिरात पाहू शकता. IBPS PO 2024 परीक्षा भारतातील विविध ठिकाणी ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे.

  • संस्थेचे नाव: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसरचे
  • रिक्त पदांची संख्या: 3,955
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
  • अर्ज करण्याचा कालावधी: 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024
  • परीक्षा मोड: ऑनलाइन
  • निवड प्रक्रिया: प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत
  • शैक्षणिक आवश्यकता: पदवीधर
  • वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे
  • वेतन श्रेणी: ₹52,000 ते ₹55,000
  • ऑफिशियल वेबसाइट: www.ibps.in

शैक्षणिक पात्रता | IBPS PO Recruitment 2024 Eligibility Criteria

पदवी: IBPS CRP परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य क्षेत्रातील डिग्री सह पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

अर्जदारांनी अर्ज करताना त्यांच्या पदवी संबंधित सर्व कागदपत्र जसे की मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

कॉम्प्युटर स्किल्स: नोकरीसाठी आणि ऑनलाइन आयोजित IBPS PO परीक्षेसाठी कॉम्प्युटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचू शकता: Wow!!! Thane Recruitment 2024: ठाण्यात नोकरीची सुवर्णसंधी… या पदांसाठी होणार भरती…!!!

आवश्यक वयोमर्यादा | IBPS PO Recruitment 2024 Age Limit

IBPS PO परीक्षेसाठी अर्ज करताना अर्जदारांचे वय हे 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. विशेषतः, उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 ते ऑगस्ट 1, 2004 (सर्वसमावेशक) दरम्यान झालेला असावा.

वयोमर्यादेमधील सूट ही खालीलप्रमाणे श्रेणीनुसार देण्यात येणार आहे:

वयातील सूट | IBPS PO Recruitment 2024

  • 5 वर्षे सूट: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)
  • 3 वर्षे सूट: इतर मागासवर्गीय (ओबीसी नॉन-क्रिमी लेयर)
  • 10 वर्षे सूट: अपंग व्यक्ती (PWD)
  • 5 वर्षे सूट: माजी सैनिक (लष्कर कर्मचारी)
  • 9 वर्षे: विधवा/घटस्फोटित महिला
  • 5 वर्षे सूट: जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या व्यक्ती (1980-1989)
  • 5 वर्षे सूट: 1984 च्या दंगलीत बाधित झालेल्या व्यक्तींना
  • 5 वर्षे सूट: युनियन कार्बाइड कारखाना, भोपाळ (फक्त मध्य प्रदेश राज्यासाठी) चे नियमित कर्मचारी

महत्त्वाच्या तारखा | IBPS PO Recruitment 2024 Important Dates

  • अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 ला सुरू झाली आहे.
  • 28 ऑगस्ट 2024 या तारखे पर्यंतच अर्ज करता येणार आहे.
  • 28 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज फी भरू शकणार आहात.
  • IBPS PO प्रिलिम्स परीक्षा प्रशिक्षण हे सप्टेंबर 2024 मधे होईल.
  • IBPS PO 2024 प्रिलिम्स परीक्षेची तारीख ही 19-20 ऑक्टोबर 2024 असणार आहे
  • IBPS PO मुख्य परीक्षेची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 अशी आहे.

निवड प्रक्रिया | IBPS PO Recruitment 2024 Selection Process

  1. ऑनलाइन प्राथमिक परीक्षा
    IBPS प्रत्येक श्रेणीतील काही उमेदवारांची निवड ही ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या आवश्यकतांनुसार करेल.
  2. ऑनलाइन मुख्य परीक्षा
    उमेदवारांनी मुख्य परीक्षेत विभागवार आणि कट-ऑफ गुण मिळवणे हे मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असणार आहे.
  3. मुलाखत
    मुलाखती ह्या सहभागी संस्थांद्वारे घेतल्या जाणार असून IBPS च्या समन्वयाखाली प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात नोडल बँकेद्वारे मॅनेज केल्या जातील.
  4. अंतिम निकाल
    अंतिम निकाल हा उमेदवारांच्या, IBPS PO मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील कामगिरीचे मूल्यमापन करून निश्चित केला जाईल.
  5. प्रोविजनल अल्लॉटमेंट
    पात्र उमेदवारांना प्रोविजनल अल्लॉटमेंट बद्दलची माहिती ऑफिशियल वेबसाइटवर सांगितली जाईल. IBPS बँकांमधील हे प्रोविजनल अल्लॉटमेंट ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान देण्यात आलेल्या प्राधान्य क्रमांकावर आधारित असणार आहे. IBPS PO Recruitment 2024

तर मित्रांनो आशा करतो हि जॉब अपडेट आवडली असेल, अश्या प्रकारच्या दररोज जॉब अपडेट मिळवण्याकरिता व्हाट्सअप गग्रुप ला आताच जॉईन करा.

Job whatsapp group anilblogs

Leave a Comment