नमस्कार मित्रांनो, मी या मराठी ब्लॉगिंग च्या क्षेत्रात गेल्या ८-९ वर्ष कार्यरत आहे, तुमच्या साठी वेगवेगळ्या माहिती, नोकरी विषय माहिती, टेक, नवीन ठिकाण, महाराष्ट्रातील माहिती आपल्या मराठी भाषेत देत असतो, मी आज कोणत्याही विषयवार ज्ञान देण्यासाठी लिहत नाही तर मला या ब्लॉगिंग बद्धल आलेला अनुभव, मनोगत मी इथे सांगत आहे. तसेच मला कोणत्याही गोष्टीचं regrate feel नाही होत. वरून मला वाटतं, जे होती ते चांगल्या साठी आणि यातून मला काहीतरी तरी कळलं.
या अगोदर मी या मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत असताना कोणत्याही पोस्ट (मिक्स कन्टेन्ट) पोस्ट करत होतो, नंतर समजलं कोणतं तरी एक कन्टेन्ट पकडून त्यावर काम करूया, अजून मनात उत्सुकता होती आज नाही तर उद्या आपल्या यश मिळेल हि आशा मनात धरून मराठी ब्लॉगिंग मध्ये मी या वेबसाईट वर काम करत राहिलो, डोमेन खरेदी करणे होस्टिंग खरेदी करण सर्व खरेदी केलं या साठी आता पर्यंत ३० हजारून जास्त पैसे टाकले, व या anilblogs.in वेबसाईट वर काम केलं वेळोवेळी माझी कमाई या वेबसाईटवर पोस्ट द्वारे शेयर केली.
वेबसाइट वर काम करत गेलो वर्षनुवर्षं केली पण यश न्हवत येत, म्हंटले अरे माझ्या नंतरचे ब्लॉगर ब्लॉग वर काम करून महिन्याला १०० डॉलर कमवतात मला १ डॉलर कमवायला येत नाही, मग मी एका व्यक्तीचा ब्लॉगिंग कोर्स कार्यच ठरवलं, म्हंटल बघूया ब्लॉगिंग मध्ये आपलं कुठं चुकतंय, समोरच्या माणसाचं सर्व बरोबर होत, एक दिवसात पाच पोस्ट करा, वेळ द्या, माहिती वाचकाला द्या. हे तर मी आधी पासून जाणून होतो, यात पण माझे कोर्स करीत ७,५०० रुपये गेले. फक्त जाणून घेण्यासाठी कि माझं कुठं चुकतंय.
नंतर कोर्स मध्ये सांगितल्या प्रकारे काम करत गेलो, मी एक नोकरदार असून सोबत जॉब हि करत आहे, या मुले दररोज २ तरी पोस्ट टाकत गेलो अश्या माझ्या २०० हुन जास्त पोस्ट झाल्या नंतर मी एक मराठी कन्टेन्ट writer शोधला व त्याला सांगितल्या प्रमाणे काम करून घेतले दररोज दोन पोस्ट देण्यास सांगितले, प्रत्येकी पोस्ट ५० रुपये असं मला वाटले, माझा गैरसमज झाला व्हाट्सअप ग्रुप वर बोलताना मला वाटलं ५० रुपये फिक्स झाले पण नंतर १०० पोस्ट केल्या नंतर कळले प्रत्येकी १५० रुपये ठरलेलं, तिथं सुद्धा १५००० हजार रुपये गेले.
आता तुम्हीच बघा आणि सांगा, या वेबसाईट मागे माझे किती पैसे खर्च झाले? फक्त एवढ्यासाठी कि आज यश मिळेल उद्या यश मिळेल. पण मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही ब्लॉगिंग वर काम करा पण जर वेळ देता येत असेल तरच करा माहिती काहीही फायदा नाही कोणाचं नशीब चांगले असेल तर लवकर यश मिळेल नाहीतर माझ्या सारखं पैसे तर पैसे वेळ हि जातो. हो पण मी यातून खूप शिकलो म्हणूनच मी माझ्या ब्लॉग वर काही ना कधी तर मनोगत सांगत राहतो, मराठी ब्लॉगिंग तशी चांगलीच आहे पण वेळ देता आलं पाहिजे.