Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांवर शिक्षक भरती प्रक्रिया सन 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी सुरू झाली आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवण्यासाठी पात्र, निरोगी आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही संधी महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याची अनमोल संधी मिळू शकते. समाज कल्याण विभागाने ही भरती प्रक्रिया सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करून अर्ज करावा.
भरती विभाग: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदांचे नाव: पदांची माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये पाहावी.
शैक्षणिक पात्रता | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria
विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या गरजेनुसार आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक ठरणार आहे.
PDF जाहिरात व अधिक माहिती: संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.
PDF स्वरूपातील जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत: या भरती अंतर्गत सर्व अर्ज हे ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
निवड प्रक्रिया | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Selection Process
अर्जदारांची निवड मुलाखतीच्या आधारावर होणार आहे.
भरती कालावधी: ही भरती केवळ ११ महिन्यांसाठी घड्याळी तासिकाधारित स्वरूपात केली जाणार आहे.
शिक्षक पदांसाठी आवश्यक पात्रता | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria
इयत्ता 9वी ते 10वी: विज्ञान शिक्षक – B.Sc./M.Sc. B.Ed.
इयत्ता 9वी ते 10वी: हिंदी शिक्षक – B.A./M.A. B.Ed.
इयत्ता 9वी ते 10वी: समाजशास्त्र शिक्षक – B.A. M.A. B.Ed.
इयत्ता 9वी ते 10वी: गणित, विज्ञान शिक्षक – B.Sc. M.Sc. B.Ed./D.Ed
इयत्ता 6वी ते 10वी: कला शिक्षक – कलेतील पदवी/पदव्युत्तर शिक्षण किंवा A.T.D.
इयत्ता 6वी ते 10वी: संगीत शिक्षक – M.A. संगीत वाद्यांचा अनुभव आवश्यक.
इयत्ता 6वी ते 10वी: संगणक शिक्षक – M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)
हे देखील वाचू शकता: Konkan Railway Recruitment 2024: 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू… पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करा!
रिक्त पदे: एकूण 10 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण: नागपूर या ठिकाणी ही नोकरी असणार आहे.
वेतन: शासनाच्या नियमानुसार मानधन दिले जाणार आहे, मात्र आर्थिक मंजुरी मिळाल्यावरच ते लागू करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुलाखतीची तारीख आणि ठिकाण | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Interview Date and place
मुलाखतीचे आयोजन 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर B विंग, पहिला मजला, खोली क्रमांक 101, येथे होणार आहे.
मुलाखतीच्या वेळी सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, आणि वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्रे सोबत घेऊन येणे अत्यावश्यक आहे.
महत्त्वाची टीप | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Important Note
या भरती प्रक्रियेत कोणत्याही गैरप्रकारात सहभागी झाल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. तसेच, या भरतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी हक्क मिळणार नाही, आणि अशा उमेदवारांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रिया करण्यात येणार नाही. Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
1 thought on “Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभाग अंतर्गत या पदांच्या भरतीला सुरुवात… आकर्षक पगाराच्या नोकरीची संधी..”