AWES Recruitment 2024: आर्मी स्कूलमध्ये मेगा भरती, या पदांवर भरती सुरू…, त्वरित अर्ज करा..

AWES Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये मेगा भरती सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे. नोकरीची ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका, कारण अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या पदासाठी त्वरीत अर्ज करा आणि नोकरी मिळवण्याचं स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!

AWES Recruitment 2024

AWES Recruitment 2024
AWES Recruitment 2024

या भरती कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे? | AWES Recruitment 2024 Post name

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे. यात पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, प्राथमिक शिक्षक, फिटनेस ट्रेनर आणि लेखापाल यांसारखी पदे भरली जात आहेत. ह्या सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता लागू आहे. त्यामुळे तुमचं शिक्षण, कौशल्य आणि अनुभव यांच्यानुसार तुमच्या योग्यतेचं पद निवडून त्यासाठी अर्ज करण्याची ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका.

महत्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया | AWES Recruitment 2024 Important dates and Application Process

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर करून स्वतः या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्यासाठी आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाइटला (awesindia.com) भेट द्या आणि तिथे दिलेल्या सूचनांनुसार या भरतीसाठी अर्ज भरा.

परीक्षा आणि निवड प्रक्रिया | AWES Recruitment 2024 Selection Proccess

भरती प्रक्रियेतील परीक्षेची तारीख ठरली आहे. ऑनलाइन चाचणी 23 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. 12 नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना परीक्षेचं प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, आणि अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना अर्ज करताना 385 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

हे देखील वाचू शकता: CISF BHARTI 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 01130 पदांवर भरती… 12वी पास उमेदवारांना मोठी संधी…

अर्ज करण्याआधी उमेदवारांनी सगळ्या सूचना नीट वाचून घेतल्या पाहिजेत आणि त्यांनतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावं. अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या सुवर्णसंधीपासून दूर करू शकते.

AWES Recruitment 2024 ही भरती प्रक्रिया तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे वेळ न दवडता आत्ताच अर्ज करा आणि तुमच्या यशस्वी भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू करा.

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

image
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment