Anganwadi Bharti 2024: कर्जत प्रकल्पांतर्गत अंगणवाडी पदांवर भरती, फक्त याच महिला करू शकणार अर्ज…!!!

Anganwadi Bharti 2024
Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024: कर्जत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत कर्जत बालविकास एकात्मिक सेवा योजनेच्या अंगणवाडी स्वयंसेविका व बाल विकास प्रकल्प अधिकारी या रिक्त पदासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना हा अर्ज सप्टेंबर 19, 2024 पर्यंत करता येणार आहे. या पदांवरील भरती ही कर्जत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत जारी करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या भरती अंतर्गत सहकारनगर, माळवेवस्ती, सोलनकरवस्ती, टेंभेवस्ती, खातगाव, भिताडेवस्ती, बाभुळगाव दुमाला, गव्हाणेवस्ती, जाधववस्ती, भोपाळबेट फिरंगाईनगर, तोडकरवाडी दत्तमंदिर, झणझणेवस्ती, जगदाळेवस्ती, जेबेवस्ती, बाडोहववस्ती, नलगेवस्ती, नाथाचा पत्रा, फरताडेवस्ती, मुंगुसवाडा,टकलेवस्ती, गोयकरवाडा, निंबाळेवस्ती, पिराची वस्ती, हंडाळवस्ती, शिंदेवस्ती, आनंदवाडी, वाळुंजकरवस्ती, नवसरवाडी-२, धुमकाईफाटा, जगतापवस्ती, माळेवस्ती, सस्तेवस्ती, थोरातवस्ती, मथेवस्ती, तांबे शितोळे वस्ती आणि पाटीलवस्ती या सर्व केंद्रावर अंगणवाडी मदतनीसाची पदे भरण्यात येणार आहेत. Anganwadi Bharti 2024

अंगणवाडी सेविका व सहाय्यका या मानधनी पदासाठी त्याच महिला पात्र असणार आहेत ज्या त्या गावातील मूळ रहिवासी असतील. 17 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे(Anganwadi Bharti 2024). विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षांची ठेवण्यात आली आहे. अर्जदाराला 2 पेक्षा जास्त मुले नसणे आवश्यक आहे.

Anganwadi Bharti 2024

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणार आहे. उमेदवाराने अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असणार आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा अतिशय आवश्यक असावे. अर्जासोबत एकल/लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अनिवार्यपणे जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यांनतर प्रथम यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी प्रसिद्ध केल्या नंतर 10 दिवसांत कार्यालयात हरकत नोंदणी करता येईल. आलेल्या सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांनतर लगेचच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

प्रकल्प अधिकारी, बाल विकास, पी.व्ही. मिटकरी यांनी असे आवाहन केले आहे की विहित नमुन्यात अर्ज आणि अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, बाल विकास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कर्जत यांच्याशी संपर्क साधावा. Anganwadi Bharti 2024

एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प, कर्जतसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 19 सप्टेंबर 2024 पर्यंतच असणार आहे.
सप्टेंबर 19, 2024 या अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

मंडळी, अश्या प्रकारच्या नोकरी विषय माहिती साठी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा दररोज नवनवीन जॉब नोटिफिकेशन तसेच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारातील सदस्यांना ही माहिती पाठवा व त्यांना ग्रुप मध्ये जॉईन करा.. धन्यवाद

heydude52 twilightwap.com 1
20240220 2028304526101735548947611

हे देखील वाचू शकता: Ayushman Card Apply Online: घरबसल्या फक्त 5 मिनिटात मिळवा मोफत आयुष्मान कार्ड…😀 फॉलो करा या सोप्या स्टेप्स…!!!

1 thought on “Anganwadi Bharti 2024: कर्जत प्रकल्पांतर्गत अंगणवाडी पदांवर भरती, फक्त याच महिला करू शकणार अर्ज…!!!”

Leave a Comment