आजच्या या Travel Blog मध्ये आमचा हॉटेल ७/१२ (Hotel 7/12 Panvel) चा अनुभव सांगणार आहोत, प्लॅन होता अलिबाग नाहीतर लोणावळा जायचा पण या हॉटेल ७/१२ पनवेल मुळे आमचा अलिबाग प्लॅन झाला कॅन्सल. जेवण तर केलं या हॉटेल मध्ये पण आमच्या सोबत काय झालं ते पुढे वाचा, व ब्लॉग कसा वाटला तो नक्की एक कंमेंट करून सांगा.
Hotel 7/12 Panvel-Palaspe
Panvel शहरापासून ९-१० किलोमीटर अंतरावर हे हॉटेल ७/१२ आहे, इथे इतर दिवशी गर्दी बघायला मिळत नाही पण रविवारच्या दिवशी चांगलीच गर्दी पाहायला मिळते, हे Hotel 7/12 Panvel ठिकाण Mumbai-Goa Highway वर असून अलिबाग किंवा कोकण व इतर पर्यटन स्थळे जाताना इथे लोक आवर्जून जेवणासाठी थांबतात. या हॉटेल सातबाराच नाव चांगलाच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. Hotel Sat Bara Panvel Map – इथे क्लीक करा
काही लोक या हॉटेल सातबारा ला नाव ठेवतात काही छान आहे बोलतात, मूळ हे हॉटेल जेवणाची चव कोल्हापुरी असल्याचं सांगत व लोक या वर प्रतिक्रिया ही देतात या प्रतिक्रिया तुम्ही सोशल नेटवर्क वर पाहू शकता, या ब्लॉग मध्ये आम्ही आमचा पनवेलच्या हॉटेल ७/१२ चा अनुभव सांगणार आहोत. तसच आपण या वर विडिओ सुद्धा बनवला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता. हॉटेल ७/१२ कोल्हापूर येथे असून महाराष्ट्रात यांच्या अनेक ब्रँच आहेत.
Before Going To Hotel 7/12 Panvel
त्या दिवशी आम्ही अलिबाग किंवा लोणावळा जाण्याचा विचार करत होतो, घरातून निघाल्यावर ही आम्ही हाच विचार करत होतो जायचं कुठे तेवढ्यात आम्ही निर्णय घेतला आज आपण अलिबाग ला जाऊया, पनवेल पासून अलिबाग साधारण १:३० तासाच्या अंतरावर असल्यामुळे लवकर जाऊन तिथे संध्याकाळ अनुभवायची होती, तुम्ही जर या हॉटेल 7/12 ठिकाणी जात असेल तर आधी हा ब्लॉग वाचा.
कळंबोली सोडले की मुंबई गोवा हायवे पकडला व दुपारची वेळ असल्यामुळे थोडी भूक सुद्धा लागलेली, Hotel 7/12 हे बरोबर हायवेच्या बाजूला असल्यामुळे आम्ही गाडी वळवत त्या ठिकाणी पोहोचलो थोडा उशीर झालेला पण ठरवलेलं एक तासात जेवण आवरून लगेच पुढच्या दिशेने निघायचे. तसच आजची ट्रीट बायको कडून होती म्हंटल्यावर काय आपल्याला पण चालतं हॉटेल सातबारा चला किंवा हॉटेल साई ला चला.
पनवेलच्या हॉटेल ७/१२ ला आलो म्हंटल्यावर काय तरी स्पेशल घ्याचं ठरवलं म्हणून आम्ही हॉटेल ७/१२ ची ५३०/- रुपयांची स्पेशल मटण थाळी मागवली त्या बरोबर दुसरी पण मागवणार होतो पण म्हंटल एवढं जेवण दोघांना काय जाणार नाही म्हणून एक १५०/- रुपयांची रिकामी थाळी मागवली, रिकामी म्हणजे तशी रिकामी नाही यात 1 भाकरी, 1 तिकट रस्सा, 1 आळणी रस्सा आणि थोडा इंद्रायणी भात येतो तो घेतला.
स्पेशल मटण थाळीत इंद्रायणी भात, 3 भाकर, 2 रस्सा, कांदा, लिंबू, तसच आम्ही दोन सोलकडी ऑर्डर केल्या, दुपारचा वेळ असल्यामुळे चांगलीच भूक लागलेली, ऑर्डर यायला थोडा वेळ लागला पण थाळी आली जेवणावर ताव मारला त्यात मी ऑर्डर केलेली सोलकडी पिली व बायको ने तसच ठेवली, थोड्या वेळाने दोन्ही थाळी आल्या जेवणाला सुरवात केली तेवढ्यात बायकोची नजर तिला दिलेल्या सोलकडी कडे गेली बघते तर काय त्यात मेलेला मच्छर.
हॉटेल ७/१२ मध्ये अस काय घडलं आमच्या बरोबर!
सोलकडी मध्ये मेलेला मच्छर! आम्ही ते शूट नाही केलं पण एवढं तेवढं होत पण याचा असा अर्थ नाही की जेवण वाढताना न बघता वाढायच, तुम्ही एक चांगला नाव कमावलं आहे जेवणाबद्धल मी काही कंमेंट नाही करत, पण अश्या प्रकारे जर काही गोष्टी समोर आल्या तर.. बायको आवडीने ह्या ७/१२ हॉटेल मध्ये आलेली पण या पूढे कधी नाही येणार बोलायला लागली, भले त्यांनी ती सोलकडी बदली पण या मध्ये ही ती सोलकडी येण्यास वेळ सुद्धा लागला, मी बसल्या ठिकाणहुन पाहत होतो सोलकढी नक्की कुठून देतो.
मी बघितल्यावर त्याने गपचूप फ्रिज मधली सोलकडी आम्हाला पुन्हा दिली, बायको ने तर नकार दिलेला म्हंटली इ आता परत यात काय असेलतर म्हंटल आता काय नाही घे बिंदास. नंतर मला समजलं असल्या छोट्या छोट्या गोष्टी मुळे ह्या हॉटेल च नाव खराब होतंय, लोक का नाव ठेवतात हे प्रत्येक्षात बघायला मिळालं. दुपारची वेळ होती भूक व लागलेली म्हणून जेवण गेलं.
हॉटेल सातबारा कोल्हापुरी चवीचा उतारा म्हणून प्रसिद्ध हे हॉटेल ७/१२ याच्या टेस्ट बद्धल बोलायचं झालं तर मला स्वतःला तिखट खायला आवडत नाही म्हणून मला चव ठीक वाटली. बाकी इथलं ambenace चांगलं होत सर्व छान आहे फक्त व्यवस्था नीट हवी आपण कोणाला तरी जेवण वाढतोय ते बघून वाढावे, जर चांगलं जेवण दिलं जिव्हाळ्याने बोललात तर चांगलं नाव होईल लोक अधिक प्रमाणात प्रशंसा करतील आपलंच मराठी माणसाचा आहे अजून नाव वरती जाईल.
Hotel 7/12 Panvel-Palaspe Menu
खूप आहेत पण जास्त करून लोक यांची स्पेशल मटण थाळी घेतात, बाकी एकदम गावचा फील येण्याकरिता लोक इथे भेट देतात, हे हॉटेल महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आहे याचा मेनू भरपूर मोठा आहे विडिओ मध्ये पाहू शकता, यातच थोडं महाग आहे पण ठीक आहे, काही लोक यांच्या जेवणाला हळदीचा पाणी देतात म्हणून बोलतात तर काही चांगलं. ज्याची त्याची मर्जी पण मला जेवण थोडं चांगलं वाटलं.
ह्या हॉटेल मध्ये आम्हाला सात बारा स्पेशल मटण थाळी, काळा मटण थाळी, धनगरी मटण थाळी, खरडा मटण थाळी, आळणी मटण थाळी व रिकामी थाळी अश्या काही मटणाच्या थाळ्या मिळतात तसेच चिकन मध्ये सात बारा स्पेशल चिकन थाळी, काळा चिकन थाळी, धनगरी चिकन थाळी, खरडा चिकन थाळी, आळणी चिकन थाळी व अंडाकरी थाळी बघायला मिळाले, तसेच भाकरी व हे जेवण कुठे बनते ते ही बघायला मिळाले.
चुलीवरच्या नॉनव्हेज जेवण खाण्याची मज्जा जर वेगळीच असते त्यात भूक लागल्यावर भाकरी बराबर स्पेशल मटण थाळी बोल की जिभेवर पाणी जमा होत, मेनू मध्ये खूप काही आहेत, नवीन लोकांना हे हॉटेल आकर्षित करत जस आम्ही आकर्षित झालो, कोणाला पिचर आवडतो कोणाला नाही म्हणून फ्लॉप पिचर घोषित करतात तस याच झालाय मला हे हॉटेल चांगलं वाटलं फक्त ती वरती सांगितलेली गोष्ट सोडून.
Hotel 7/12 panvel-palaspe photos
हे ब्लॉग देखील वाचू शकता
Mumbai To Alibaug, Nayantara Water Taxi | ४० मिनिटांत मुंबई ते अलिबाग प्रवास पहिली वॉटर टॅक्सी
D-ADDA Badlapur Hotel, Visited at डी-अड्डा
निष्कर्ष:
हा माझा वयक्तिक ब्लॉग असून मला आलेला हॉटेल ७/१२ पनवेल चा अनुभव शेयर करत आहे, आशा करतो की हा Hotel 7/12 Panvel-Palaspe ब्लॉग या आवडला असेल, तसेच तुमचे अनुभव देखील काही असतील तर खाली कंमेंट मध्ये देऊ शकता व आपल्या मित्र मंडळींना हा ब्लॉग शेयर करू शकता धन्यवाद…