कल्याण पासून बदलापूर Fishing Spot BARVI DAM Badlapur 🎣असा काही प्रवास केलेला अनुभव व अस्नोली गावात केलेली मासे मारी व तेथील निसर्गरम्य ठिकाण, अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-मुरबाड रस्त्यावर असलेले बारवी डॅम आपल्या ठाण्या जिल्ह्याची तहान भागवते, बारवी धरण हे बदलापूर मधील असणाऱ्या लोकांना चांगलंच माहीत आहे पण तिथे आपल्याला मासे मारी कशी करता येईल, ती जागा कशी आहे, कुठे आहे या बद्दल माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे.
Fishing Spot BARVI DAM Badlapur
Badlapur to barvi dam distance
मुंबई पासून ६७ किमी अंतरवावर व कल्याण पासून २८ किमी अंतरावर असणाऱ्या बदलापूर बारवी धरण व तेथील अस्नोली गावातून जाणारी बारवी नदी जवळ फिशिंग तसेच तेथील नयनरम्य सोबत सूर्यास्त बरोबर मित्र व सर्वत्र हिरवळ या बद्धल चा अनुभव मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, कल्याण अंबरनाथ आणि बदलापूर मधील पर्यटकांना जर मासे मारी तसेच निसर्गात बागडायचं व मनमुरात निसर्गाचा आनंद घायचा असेल तर बारवी धरण व आजूबाजूच्या परिसराला भेट देऊ शकता.
रोजच्या धकाधकीच्या कामातून दिलासा मिळावा म्हणून बारवी जंगल सफारी व बारवी धरण पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी असते. बारवी धरणातून सुटणाऱ्या पाण्यात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असतात, हे ठिकाण पावसाळ्यात भयंकर मानले जाते तसेच बारवी धरणाच्या बाजूला असणाऱ्या अस्नोली, पिंपळोली, चांदप, पाटीलपाडा, पादीरपाडा, वाकड्याचीवाडी, कारंद , मोऱ्याचापाडा, फणसवाडी, आघाणवाडी, चोण, रहाटोली, आपटी, रायते या गावांना सतर्कतेचा इशारा देतात, तिथे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात visit करू शकता पावसाळ्याच्या सुरवातीला सुद्धा खूप छान दृश्य तिथे पाहायला मिळतात.
Barvi dam road
बदलापूर मधील बारवी धरण व त्याच्या आजूबाजूचा मनमोहक नजारा हा सर्वाना माहित आहे ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो, बारवी धरणाला जात असताना छान रोड लागतो तसेच आजूबाजूला गर्द उंच हिरवीगार झाडे नजरेस पडतात, तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजेलच नक्की तुम्हाला कुठे जायचं. हे ठिकाण नवी मुंबई – मुंबई मधल्या पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच पुणे या शहरातून देखील पर्यटक इथे पर्यटन साठी येतात, पुणे ते बारवी धरण अंतर १४० किमी व लागणार वेळ ३ ते ३० तास असा आहे.
Barvi dam information
१९७३ साली सुरवात करण्यात आलेल्या बारवी धारणाच पाणी आपल्या ठाणे जिल्याला जाते, मित्रांनो तिथे Barvi dam badlapur मध्ये accident पण भरपूर होतात, त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घ्यावा, हल्लीच आम्ही छोटीशी Barvi Dam Ride केलेली, जाताना थोडा कच्चा रोड लागला पण पुढे छान असा नजर बाजूला हिरवीगार झाडे पाहायला मिळाली, बारवी धरणाजवळ भरपूर hidden places आहेत, ज्या जवळ असणाऱ्या तिथे जवळ पास राहणाऱ्या लोकांना माहित असतात, मी अगोदर सुद्धा बारवी धरणाबद्धल माहिती दिली आहे म्हणून या ब्लॉग मध्ये कमी शब्धात वर्णन करतो.
दोन मोठ्या डोंगरामध्ये वसलेल्या बारवी धरणाचे दरवाजा उघडल्यानंतर अतिशय आकर्षक असे रूप पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावत असतात, मित्रांनो अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता, तसेच खाली दिलेला विडिओ पाहू शकता तो कसा वाटला ते सांगू शकता व आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेयर करू शकता, मित्रांनो बारवी धरण बदलापूर माहिती आणि त्या बद्धल अधिक माहितीमी अगोदर हि दिलेली ती सुद्धा पाहू शकता.
Farmhouse near barvi dam badlapur
बारवी डॅम ला फिरायला येत असाल किंवा farmhouse near barvi dam badlapur शोधत असाल तर बारवी डॅमच्या जवळपास खूप सारे farmhouse आहेत जिथे तुम्ही राहू शकता शिवाय बारवी धरणं जवळ फिशिंग करू शकता मित्र मंडळी फॅमिली बरोबर चिल करू शकता आणि चांगला वेळ जवळच्या माणसाबरोबर घालवू शकता.
- Ayush Farm Badlapur
- Nisargaramya Farmstays Badlapur
- More’s Farmhouse Badlapur
- Nandanvan Farmhouse Badlapur
- Sarovar Farmhouse Badlapur
- Janai Farms Badlapur
- Green View Resort Badlapur
- River Village Resort Badlapur
- Maharaja The Royal Resort Badlapur
——————————————————————
Watch the barvi dam video and keep supporting me, show some love in the form of likes and you have any suggestion please comment down below so that I can improve in my next upcoming vlog in a better way or you can DM me on my Instagram/Facebook.
Follow me on 🤗
Instagram :- https://www.instagram.com/MiAnilShinde/
Facebook :- https://www.facebook.com/MiAnilShinde
Twitter :- https://twitter.com/MiAnilShinde
Telegram :- https://t.me/anilblogs
————————————————————————
Conclusion :
मित्रांनो Fishing Spot BARVI DAM Badlapur बारवी धरण बदलापूर या ब्लॉग मध्ये बस एवढंच मी आशा करतो तुम्हाला हि माहिती आणि फोटो तसेच विडिओ आवडला असेल, जर तुम्हाला आवडला असेल तसेच तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर हि माहिती आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका जास्तीत जास्त हि माहिती शेयर करा तसेच आपल्या मराठी चॅनेल ला Subscribe करा.
धन्यवाद 😀
thanks for reading🐟🌊
#mianilshinde #fishingspotbarvidam #daminmaharashtra #barvidam #barvidamvideo #placetovisitinbadlapur #fishingvideo #maharashtradam #fishing #placenearmumbai #thanecity #kalyancity #ambernath #badlapur