२०२२ मधील मला आवडलेली गणपती बाप्पाची छायाचित्रे

     नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये या वर्षीचे २०२२ मधील गणपती बाप्पाची छायाचित्रे पाहणार आहोत जी अतिशय सुंदर आहे, कोणी काढले काय या बद्दल माहिती नाही पण ही छायाचित्रे खूप छान पद्धतीने कॅमेरात टिपलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now


    २०२२ मधील गणपती बाप्पाच आगमन एकदम धुमधडाक्यात झालंय सर्वत्र आनंदमयी वातावरण झालं त्यातच असे काही २०२२ मधील मला आवडलेले गणपती बाप्पाची छायाचित्रे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत त्याच बरोबर मित्रांनो तुम्ही तुमचे या वर्षीचे अनुभव खाली कंमेंट करू सांगू शकता.


    २०२२ मधील गणपती बाप्पा कधी आले कधी जाणार हे समजलं सुद्धा नाही पण जो या वर्षीचा जल्लोष होता तो अतिशय आनंदायी होता व धम्माल होता, मुंबई असो की पुणे शहर पूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला ते पण, आनंदात धुमधडाक्यात, आगमनाची तयारी या वर्षी जोरात होतीच त्या बरोबर २ वर्षांनी निर्बंध मुक्त सण साजरा करतोय याचा आनंद वेगळाच.


    मी हे फोटो माझ्या मोबाइल मध्ये save करून तो मोबाईलवर रोज वॉलपेपर फोटो म्हणून ठेवतो, फोटो बघताच क्षणी मन आनंदी होत व शांती मिळते, आजकाल च्या धकाधकीच्या जीवनात शांती व मन प्रसन्न असणं आवश्यक आहे, म्हणूनच देव दर्शन आणि देवाच्या प्रति भावना असाव्यात तेंव्हाच जीवन सार्थक आहे आणि आनंदी आहे.


    हे छायाचित्रे माहीत नाही कोणाचे पण ज्याने काढले त्याला सलाम २०२२ मधील गणपती बाप्पाचे छायाचित्रे हा टॅग ह्या फोटो ना जावो, छान मस्त दिसतात एडिटिंग असो किंवा अन्य पण दिसायला छान वाटतात आणि एकदम क्लिअर सुद्धा, मुंबई मधील काही ठिकाणची आहे एवढं समजतंय पण कुठले नक्की नाही समजत.

ऑफिस मधून वेळ मिळत नसल्या मुळे मला असे फोटो काढता येत नाही त्याहून मुंबई मधील गणपती ही पाहायलामिळाले नाहीत या वर्षी सर्व काही मोबाईल वरच पाहतोय टीव्ही वर पाहतोय छान वाटतंय सर्व आनंद होतोय जरूर या वर्षी लालबाग च दर्शन सुद्धा घायचंय बघूया कधी होतंय स्वप्न पूर्ण, लहानपणी मित्रांबरोबर विठ्ठलवाडी ते करीरोड करत लालबागच्या राजा च दर्शन घेऊन वरली समुद्रकिनार्यवार रात्र काढायची काही वेगळीच मजा होती, उगाच मोठे झालो अस वाटतं लहानपणच मस्त होत.


बाकी मित्रांनो मी वाचलंय खाली दिलेली गणपती बाप्पाची १२ नावे वाचल्यास जपल्यास अडथळे दूर होतात…माहीत नाही खरं की खोटं तरी पण मित्रांनो तस पण देवाचं नामस्मरण चांगलेच असतं, चांगलाच आहे आपल्याला अस काही नावे तरी माहीत बोलायला मिळतात.


१)सुमुख
२)एकदंत
३)कपिल
४)गजकर्णक
५)लंबोदर
६)विकट
७)विघ्ननाशक
८)विनायक
९)धुम्रकेतू
१०)गणाध्यक्ष
११)भालचंद्र
१२)गजानन

anilblogs2

 

anilblogs1
anilblogs4
anilblogs6

 

तर मित्रांनो कसा वाटला हा छोटासा मराठी ब्लॉग, मला आवडलेली गणपती बाप्पाची छायाचित्रे हा लेख व छायाचित्रे आवडल्यास खाली कंमेंट करून सांगा व हा लेख आपल्या जवळच्या मित्र – परिवार सोबत शेयर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment