Ayushman Card Apply Online: आयुष्मान कार्ड हे केंद्र सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जारी केले जाते. प्रत्येक आयुष्मान कार्डद्वारे दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार हे केले जातात. आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया ही राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे अधिक सुलभ आणि सोपी केली गेली आहे.
देशातील सर्व नागरिक आयुष्मान भारतच्या ऑफिशियल वेबसाइटद्वारे आयुष्मान कार्डसाठी घरबसल्या सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्हाला देखील तुमचे आयुष्मान कार्ड बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही आजच्या या लेखात दिल्या गेलेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज करू शकता. तर याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आयुष्मान कार्ड म्हणजे काय? | What is Ayushman Card Apply Online?
आयुष्मान कार्ड हे एक अतिशय महत्वाचे कार्ड आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुठल्याही खाजगी रुग्णालयामधे जाऊन ₹500,000 पर्यंत मोफत उपचार घेऊ शकणार आहात. देशातील कुठल्याही अश्या व्यक्ती ज्यांना आपले आयुष्मान कार्ड बनवायचे आहे ते अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे. केंद्र सरकार द्वारे आयुष्मान लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येते, आणि ज्या लाभार्थ्यांची नावे या यादीमधे असतील त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत च्या मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.
आयुष्मान कार्डसाठी पात्रता | Eliigibility for Ayushman Card Apply Online
व्यक्ती भारताचा रहिवासी असणे हे अतिशय आवश्यक असणार आहे.
या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब लोक घेऊ शकणार आहेत.
या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेअंतर्गत पात्र कुटुंबेही घेऊ शकणार आहेत.
आयुष्मान कार्डसाठी महत्वाची कागदपत्रे | Important Documents for Ayushman Card Apply Online
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शिधापत्रिका क्रमांक
आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी पात्रता कशी तपासायची? | How to check Eligibility for Ayushman Card Apply Online
1) आपली पात्रता तपासण्यासाठी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) होम पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यांनतर OTP च्या पर्यायावर क्लिक करा.
3) यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, हा OTP तुम्हाला पेजवर टाईप करावा लागेल आणि त्यांनतर OTP व्हेरिफकेशन करून तुम्ही पोर्टलवर लॉग इन करू शकता.
4) पुढे लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या राज्यातील जिल्ह्याचे नाव निवडावे लागणार आहे.
5) त्यांनतर तुम्हाला तुमच्या शहराचे नाव निवडायचे आहे आणि search या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
6) आता तुमच्या समोर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी येईल.
7) जर तुमचे नाव या यादीमधे असेल तर तुम्ही देखील या आयुष्मान कार्डचा लाभ घेऊ शकणार आहात.
हे देखील वाचू शकता: BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 1846 जागांवर भरती… 25 ते 80,000/- पगार… ही आहे अर्जाची शेवटची तारीख…
◆ यासाठी तुम्हाला सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
◆ यानंतर आम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे तुमची पात्रता तपासून पहा.
◆ आता तुमच्या नावासमोरील KYC या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
◆ आता तुमचा जो फोन नंबर आधारशी लिंक केलेला असेल त्या नंबरवर एक OTP येईल, तो तुम्हाला वेरिफाय करावा लागणार आहे.
◆ OTP व्हेरिफकेशन पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागणार आहे.
◆ तुमचे केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड जारी करण्यात येईल.
◆ आता तुम्ही तुमचं आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकणार आहात. Ayushman Card Apply Online
आयुष्यमान कार्ड महत्वाच्या लिंक्स
• • •
ऑनलाइन अर्ज करा 👉 इथे क्लिक करा
• • •
निष्कर्ष:
तर मित्रांनो आशा करतो “Ayushman Card Apply कसे करायचे?” ह्या बाबत माहिती समजली असेल, तसेच ही माहिती आपल्या परिवारामधील सदस्यांना जरूर शेअर करा आणि अश्या प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन करा व इतर मित्रांना सुद्धा जॉईन करा.
2 thoughts on “Ayushman Card Apply Online: घरबसल्या फक्त 5 मिनिटात मिळवा मोफत आयुष्मान कार्ड…😀 फॉलो करा या सोप्या स्टेप्स…!!!”