Diwali Wishes in marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Diwali wishes in marathi

Diwali Wishes in marathi
Diwali Wishes in marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

नमस्कार मित्रांनो,


सर्व प्रथम तुम्हांला व तुमच्या परिवाला आमच्याकडून दिवाळीच्या, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा, आपल्या या ब्लॉग मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मिळतील तसेच थोडी माहिती सुद्धा, आपल्या हिंदू सणांचा सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी ओळखला जातो, तसेच दिवाळी हिंदू सणांचा राजा मानला जातो, दिवाळीच्या या दिवसात एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, घरा घरात फराळ बनवलं जाते, मित्र मैत्रिणी एकमेकांच्या घरी जाऊन फराळ खाऊन आई वडिलांचा आशीर्वाद घेतात. 

दिवाळी म्हंटल कि सर्वत्र दिवा बत्ती, रोषणाई, रांगोळी, फटाके, नवीन कपडे, घरोघरी कंदील, घरोघरी लाइटिंग, भेटवस्तू , मिठाई असे काही दिवस दिवाळीत जातात व हा प्रकाशाचा सण आनंदाने आणि जोशात लोक साजरा करतात, या विशेष दिवसाबद्दल अभिनंदन करण्यासाठी, लोक त्यांच्या मित्र परिवाराला दिवाळी पाडवा संदेश, दिवाळी पाडवा शुभेच्छा बॅनर, दिवाळी पाडवा शुभेच्छापत्रे किंवा दिवाळी पाडवा एसएमएस पाठवतात.

 

हे देखील वाचू शकता :-

Raksha Bandhan info in marathi

Makar Sankrant Essay In Marathi 

 

लक्ष्मीपूजन साठी संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेश तसेच कुबेर देवाची पूजन होते ते कसं करतात काय करतात ते सर्व माहिती इंटरनेट वरमाहिती मिळते, संध्याकाळी पाऊणे सात पासून संध्याकाळी साडे आठ पर्यंत देवाची लक्ष्मीची पूजा केली जाते,  तसेच दिवाळीचा चौथा दिवस ‘दिवाळीचा पाडवा’ म्हणून साजरा करतात. पती-पत्नीच्या एकत्र येण्याचा आणि त्यांच्याद्वारे सामायिक केलेल्या प्रेमाचा हा उत्सव आहे. या प्रसंगी पत्नी आपल्या पतीचे ‘औक्षण’ करते आणि पती आपल्या जोडीदाराला एक खास भेट देतो.


मित्रांनो जर तुम्ही Diwali wishes in marathi पाहत असाल तर बरोबर ठिकाणी क्लीक केलात या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिवाळीच्या नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा असे मेसेज मिळतील ते तुम्ही एकमेकांना पाठवू शकता, दिवाळीच्या शुभेच्या पाठ्वण्याकरिता खाली दिवाळीचे अनेक मराठी फॉन्ट मध्ये मेसेज दिले आहेत ते तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता तसेच व्हाट्सअप फेसबुक ट्विटर वर शेयर करू शकता. 

Diwali Wishes in Marathi , दिवाळीच्या शुभेच्या :- 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ⚡️⭐️
 
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दिपावलीच्या
आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास
व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
 
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
 
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली
 
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
शुभ दीपावली!
 
माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!
 
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
 
तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.
 
आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.
 
देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.
 
जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.
 
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
 
उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
 
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
 
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
 
आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळीआप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळीसर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळीईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
 
आज वसुबारस,
दिवाळीचा पहिला दिवस,
हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य
द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
वसुबारसच्या तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना
हार्दिक शुभेच्छा
 
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली !
 
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
 
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
 
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
 
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
 
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
 
 
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.
 
मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali
 
तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.
 
त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.
 
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी
 
उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
 
जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर एक रॉकेट विकत घ्या, त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.
 

Narak Chaturdashi , नरक चतुर्दशी मराठी माहिती :- 

Narak Chaturdashi नरक चतुर्दशी मराठी माहिती माहित नसेल तर ती सुद्धा पाहू शकता, नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने यमाचे भय नाहीसे होते असे मानले जाते. अभ्यंगस्नान योग्य वेळी केले तर त्याचे विशेष पुण्य प्राप्त होते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी राक्षस नरकासुराचा वध केला. नरकासुराच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या सोळा हजार एकशे मुलींचीही त्यांनी सुटका केली होती.

दिवाळी सणाबाबत सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी सण धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होतो जो पाच दिवस चालतो. शेवटच्या दिवशी भाऊबीजेने त्याची सांगता होते. नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात, दिवाळी महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Narak Chaturdashi Wishes In Marathi, नरक चतुर्दशी मराठी शुभेच्छा :- 

आपण या ब्लॉग मध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी खालील मेसेज संदेश एकमेकांना पाठवू शकता. 
 
सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं
बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि 
नरक चतुर्दशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !🙏
 
ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!
 
पूजेने भरलेले ताट आहे,
आजूबाजूला आनंद आहे
चला हा दिवस एकत्र साजरा करूया
आज छोटी दिवाळी आहे.
तुम्ही आणि तुमचे कुटुंबाला
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
 
तुम्हाला सर्व वाईटांवर विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल
नरक चतुर्दशी शुभेच्छा !
 
जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा
नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून
दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
पुन्हा दिव्यांचा सण आला आहे,
म्हणून आनंदाने साजरा करा,
दुःख विसरा. ही नरक चतुर्दशी
तुम्हाला घरी भाग्य घेऊन येवो आणि 
तुमची पुन:पुन्हा भरभराट होत राहो.
 
भगवान गणेश तुम्हाला समृद्धी
देवो , माँ लक्ष्मी तुम्हाला संपत्ती घेऊन येवो.
ही छोटी दिवाळी तुमच्या
उत्तम आरोग्याचे कारण होवो
अशी प्रार्थना करतो.
नरक चतुर्दशी !!
 
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!

Bhaubeej Wishes in Marathi , भाऊबीज शुभेच्छा:- 

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.


भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहीणीच्या घरी तिला भेटण्यासाठी जातो. मात्र या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या लाडक्या बहीणीपासून दूर असाल तर तिला हे शुभेच्छा संदेश (bhaubij wishes in marathi) जरूर पाठवा. 

 
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती 
ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा… 
 
 माझ्या लाडक्या भावाला
 भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
 
फुलों का तारो का 
सबका कहना है 
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
 
दिव्यांचा लखलखाट घरी आला
आज माझा भाऊराया आला… 
भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
सण प्रेमाचा, सण मायेचा, 
सण भावाबहीणीच्या 
पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या शुभेच्छा… 
 
तुझ्या माझ्या नात्याला
कोणाचीच उपमा नाही.
ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो.
भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
माझ्या दादाला
उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना. 
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
 
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… 
तुझ्या  घरी हे तेज येवो 
आणि तुझे घर आनंदाने भरो, 
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
आईप्रमाणे काळजी घेतेस, 
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, 
सतत माझी पाठराखण करतेस, 
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा
 
तुझ्या मनातील 
सर्व इच्छा पूर्ण होवोत. 
भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत 
निस्वार्थ प्रेम करणारं 
कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. 
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
लक्ष दिव्यांना 
उजळू दे 
बहीण-भावाचे पवित्र नाते.
भाऊबीजेच्या  हार्दिक शुभेच्छा
 
जिव्हाळ्याचा आनंद
 द्विगुणित होऊन दे 
बहीण-भावाची साथ 
आयुष्यभर राहू दे. 
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा
 
जपावे नाते
निरामय भावनेने 
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.
भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
क्षणात भांडणार 
आणि क्षणात हसणार
भावा-बहीणीचे 
नाते असेच राहणार. 
भाऊबीजेच्या शुभेच्छा
 
प्रेमाने सजलेला 
हा दिवस भावा
तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हा सण…
लवकर ये भावा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
मनाची आहे हीच इच्छा
तुला मिळो सर्व काही 
जी आहे तुझी इच्छा. 
प्रिय ताई तुला भाऊबीज शुभेच्छा 
 
मी तुला सदैव मिस करते दादा, 
भाऊबीज शुभेच्छा 
 
भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे, 
मनात प्रेम आणि विश्वास आहे. 
माझ्या प्रिय छोट्या भावा तुला 
हॅपी भाऊबीज शुभेच्छा 
 
आठवण येते बालपणीची, 
तुझी गोड हाक 
तुझी सदैव असणारी सोबत, 
तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे, 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

 Diwali Padwa Wishes in Marathi , बलिप्रतिपदा पाडवा शुभेच्छा मराठी :- 

 

नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवाच्या लख्ख लख्ख शुभेच्छा..!
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाटा
दिवाळी पाडव्याच्या खास आपणास शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे पवित्र पाडवा
उत्तम दिनाचे महात्म्य आहे सुखद ठरो पाडवा!
त्यात असू दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे –
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा… आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!

 

तर मित्रांनो या संपूर्ण ब्लॉग बस एवढं आशा करतो हा संपूर्ण ब्लॉग तसेच  दिवाळीचे नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा, आपल्या हिंदू सणांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला दिवाळी सणा बद्धल छोटीशी माहिती व Diwali Wishes in marathi, मराठी फॉन्ट मध्ये दिवाळी मेसेज संदेश कसे वाटले खाली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्र मंडळी व आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर  तसेच आपल्या परिवारामध्ये शेअर करायला  विसरू नका, पुन्हा एकदा सर्वाना दिवाळीच्या शुभेच्या तुमच्या इच्छा आकांशा पूर्ण होऊ हीच प्रार्थना. 

धन्यवाद …. 

3 thoughts on “Diwali Wishes in marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Diwali wishes in marathi”

Comments are closed.