Source – facebook page |
ऑस्ट्रेलिया रविवारी दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ म्हणजेच आज झालेली टी२० वर्ल्डकप आधील पहिली मॅच, इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हा भारताने ४ विकेट ने जिंकला.
विराट कोहलीची ५३ बॉल मध्ये ८२ रन्स च्या मदतीने हा सामना जिंकता आला तसेच हार्दिक पांड्य सोबत ११३ रन्स च्या कडक पार्टनरशिप मुळे हा सामना जिंकता आला, भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ही धमेकदार असते त्यात वर्ल्ड कप म्हंटल तर काय बात.
Source – Facebook Page |
भारताने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यातच पाकिस्तान ने १५९-८ असे रन्स पाहिले केले, सुरवातीचे त्याचे सलामीवर लवकर बाद झाले नंतर मधले कार्यकर्ते खेळले म्हणून हा १५९ चा आकडा झाला, त्यात भुवनेश्वर कुमार ने १ विकेट, अर्षदीप ने ३ विकेट, सामी ने १ विकेट, व हार्दिक पांड्या ने ३ विकेट काढले, व भारताला १६० चा टार्गेट दिला.
१६० चा पाठलाग करत भारताने राहुल व रोहित शर्मा याचा विकेट १० रन्स असताना घालवला, तसेच २६ रन्स वर सूर्य कुमार व ३१ रन्स वर axar पटेल याचा चौथा विकेट पडला, नंतर जे हार्दिक आणि विराट कोहली ने मॅच सांभाळी व हार्दिक चा १४४ रन्स वर विकेट पडला तसेच दोघानी मॅच जिंकवली.
Source – Facebook Page |
भारताचा पाकिस्तान वर विराट विजय मिळवत अखेरच्या चेंडूपर्यंत रोमाचंक सामन्यात भारताने ४ विकेट राखून हा विजय मिळवला आणि पाकिस्तनाला ऑस्ट्रेलिया मध्ये चालू असलेल्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तनाला पहिल्या सामन्यात पराभूत केले, भारतीय टीम ने भारतीय लोकांना दिवाळी गिफ्ट दिलं व आनंदाचे क्षण दिले तसेच शानदार पदार्पण केले.
अश्विनच्या शेवच्या बॉल वर एक एक धाव घेऊन हा सामना जिंकला, विराटने पुन्हा एकदा दाखवून दिलं त्याला किंग कोहली का म्हणतात, खूप धमाल मॅच झाली रविवार त्यात दिवाळी चा सण आणि india pakistan cricket match वाह क्या बात, ही मॅच जरूर सर्वांच्या मनात राहील, तसेच आता पुढचे सामने बघण्यात मज्जा असणार आहे व हा वर्ल्ड कप पुन्हा आपण जिंकुच.
Source – Facebook Page |
मॅच नंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणलं एकदा ते वाचा – ” माझ्या कडे शब्दच नाहीयेत या सगळ्याच वर्णन करायला. पण अश्या प्रकारच्या मोठ्या सामन्यांमध्ये असा खेळ अपेक्षितच असतो. शक्य तितका शेवटपर्यंत सामना नेणं हाच एकमेव मेसेज होता. विराट ची भारतासाठी खेळलेली ही सर्वोत्तम खेळी होती”
त्यावर हार्दिक पांड्या ही बोला – ” आज पप्पा असते तर त्यांनी पळत येऊन मिठी मारली असती ही खेळी त्यांना समर्पित” अजून खूप जणांचे चांगले चांगले ट्विटर ट्विट बघायला वाचायला मिळतात त्याच बरोबर मेम्स तर काय बोलणार फुल धुमाकूळ झालाय भारतात, मी एक क्रिकेट प्रेमी आहे आणि मला भारताची कोणतंही ही क्रिकेट मॅच असू जिंकल्यावर आनंद होतोच व आवर्जून पाहतो, तसेच हा ब्लॉग माझ्या व माझ्या सारख्या मित्रांसाठी आपण जेव्हा म्हातारी होऊ तेव्हा ह्या पोस्ट या असल्या माहित्या वाजून वेळ घालवू आणि म्हणू काय क्षण होते आमच्या वेळेस मानूनच हा ब्लॉग.
Source – Facebook Page |
तर मित्रानो कसा वाटला हा ब्लॉग जरूर खाली कॉमेंट करा तसेच माझं यूट्यूब चॅनेल सुद्धा आहे ते सुध्दा subscribe करा , धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदित राहावा तुम्हला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या आनंदची व ही दिवाळी भरभराटीची जावो तुमच्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होवू हीच प्रार्थना🙏❤️