My First Youtube Thousand Subscribers || माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर || MIANILSHINDE

My First Youtube Thousand Subscribers || माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर

My First Youtube Thousand Subscribers
MiAnilShinde Youtube Channel

 

1k subscribers यूट्यूब चॅनेल चा प्रवास 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

My First Youtube Thousand Subscribers: एप्रिल २०२० ला सुरु केलेला यूट्यूबचा चॅनेल MIANILSHINDE आज म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर झाले आहे, पहिले हजार सब्सक्राइबर झाल्यावर थोडा आनंद हि होतो आणि असच आपण आपलं काम करत राहू प्रेरणा मिळते, विचार केलेला हजार सब्सक्राइबर होतील ते कधीही होतील माहित होत पण त्याच बरोबर चार हजार तासांच काय? आजच्या  पोस्ट मध्ये मी माझा अनुभव सांगणार आहे youtube वर पहिले हजार सब्सक्राइबर कसे मिळवले. 

Youtube monetization rules साठी हजार सब्सक्राइबर तसेच सोबत चार हजार तास होणं हि अट असते व हे एक वर्ष्यात होणं हे गरजेचं असते, हा कठीण, अवघड टास्क असतो जो माझ्याकडून ऑफिसच काम करत करत होणं थोडं अवघड वाटतं होत पण अशक्य नाही. My first thousand subscribers तर झालेत याचा आनंद होतो कारण मी कोणाला बोलून किंवा कोणाचा मोबाईल घेऊन पूर्ण केले नाहीत, आजच्या घडीला निष्ठवंत सब्सक्राइबर मिळणे कठीण आहेत जे मला मिळाले. म्हणूनच माझ्या पहिल्या हजार युट्यूब सब्सक्राइबर सर्वाना माझा सलाम आणि मनापासून आभार. 

वाटलं होत first thousand subscribers होतील, माहित होत पण ते कधी होतील कसे होतील आणि होतीलच का हे माहित नव्हतं. पण मित्रांनो असच आपण निरंतर काम करत राहिलो तर कोणतीही गोष्ट यूटुबवर अशक्य नसते हे समजत. मी हा youtube चा चॅनेल अगोदर हिंदी भाषेत बनवलेला नंतर कालांतराने मराठी मध्ये बनवू लागलो, काय त्या हिंदी ला चाटायचं आपण आपले आयुष्यतील क्षण टिपून थोडं एडिट करून यूट्यूब वर ठेवायचं हे ठरवून यूट्यूब चॅनेल बनवलेला आणि तो असच २ वर्ष विडिओ अपलोड करत चालू ठेवला. 

आज या youtube चॅनेल वर निष्ठावंत माझे पहिले हजार सब्सक्राइबर झाले आहेत, सर्वांचे यूट्यूब चॅनेल वर भरभरून  सब्सक्राइबर असतात काही लोक याला नंबर समजतात त्याला मी आपला परिवार समजतो. ज्यांनी आपल्यावर भरोसा ठेवून आपल्या मराठी चॅनेल ला सब्सक्राइब केलं त्याचे आभार आपण व्यक्त केले पाहिजे म्हणूनच आजची हि पोस्ट त्याच्यासाठी लिहतोय. तसेच माझ्या आठवणी साठी माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर तर गाठले आता चार हजार तास कधी पूर्ण होतील हे सांगता येत नाही. 

Youtube वर हजार सब्सक्राइबर आणि चार हजार तास वॉच टाइम असं गरजेचं असते तेव्हा यूट्यूब चॅनेल मॉनिटाईझ होतो व त्यावर थोडे का होईना पण पैसे कामू शकतो. मित्रांनो असे कित्येक hindi youtube channel आहेत जे पैश्यासाठी आणि आपल्या परिवाराचा उदार्निर्वह होउदे म्हणून यूट्यूब वर मेहनत करून विडिओ बनवून त्याला चांगल्या प्रकारे गाणी टाकून एडिट करतात व सर्वासमोर प्रसिद्द करतात. तुम्ही कधी बिहारचे यूट्युबर पाहिलेत का जा बघा त्याची मेहनत बघा आज ते Youtube वर पैसे कमावून परिवार चालवतात. 

हे देखील वाचू शकता 

20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय, Blogging Topics In Marathi

माझा आवडता मराठी युट्युबर | Marathi Youtuber

आपल्या महाराष्ट्रात मराठी Youtuber आहेत ते हि मेहनत करतात रात्र रात्र भर विडिओ बनवतात एडिट करतात पण त्याच्या व्हिडिओस वर खूप कमी प्रमाणात व्हिएव येतात याची खंत वाटते तसेच लाज वाटते हिंदी चॅनेल चा गाजावाजा करतात आणि प्रसिद्ध करतात याची. जाऊदे तो विषय वेगळा आहे ह्यावर बोलत बसलो तर हि पोस्ट वाचता बाउन्स रेट वाढून जाईल. पण खरंच मित्रांनो marathi youtube channel  वर काम करण खूप अवघड आणि धेर्याचं काम आहे, खायपीएची गोष्ट नाही आणि विडिओ वायरल करणं हि सुद्धा. 

अनेक संकट आली माझ्या ह्या marathi youtube channel वर पण मी मागर घेतला नाही, विचार केलेला आज नाहीतर उद्या पण होईल नक्की. तसेच विचार करत अजूनही त्यावरच काम करतोय कधी कोणता विडिओ वायरल होईल सांगता येत नाही, यूट्यूबच्या अटनुसार एक काय चार पाच हजार सब्सक्राइबर होतील न एक दिवसात चार हजार तास तसाच हा टप्पा हि ओलंडला जाऊ शकतो. म्हणून धेर्य ठेवून youtube वर काम करावं लागते म्हणूनच मी अजूनही याच आणि शेवट पर्यंत याच youtube चॅनेलवर विडिओ अपलोड करत राहील. 

काही लोक YouTube वर 1000 सदस्य कसे मिळवायचे ह्या बद्धल खूप व्हिडिओस पाहतात जस जस सांगतात तस तस सुरवातीला करतात नंतर कंटाळून चॅनेल बंद करतात, पण मित्रानो अनुभवाने सांगतो गेल्या ७-८ वर्ष झाले यूट्यूब वर ज्ञान घेतोय तसेच ३-४ वर्ष झाले यावर अभ्यास करतो, सर्व विषय शांततेने हाताळायची सवय आहे कोणी कितीही नाव  ठेवू शांतीत क्रांती झालीच पाहिजे त्याच पद्धतीने काम करत असतो. त्याचबरोबर हि आपली anilblogs.in मराठी वेबसाईट सुद्धा सुरु केलेली, या वर काम करून ३ वर्षे झाली तसेच गुगल ऍडसेन्स अप्रोव्ह करून या वर गूगल अड्स चालू केल्या त्यानुसार थोडं थोडं इनकम वेबसाईट द्वारे होते. 

youtube वर खडतर प्रवास करून, धेर्य ठेवून, खूप वेळ लागणार विचार करूनच youtube वर काम केलेलं. तसेच मी पुढेही करत राहणार आहे. अजून तर हजार सदस्य झालेत चार हजार वॉच टाइम कधी पूर्ण होईल सांगता येत नाही ते हि लवकरच पूर्ण होईल. कधी कधी वाटत होत youtube सोडून द्यावं काही यश हाताला मिळत नाही, आहेत तेवढ्या आठवणी खूप आहेत, कधी वेळ मिळेल तर विडिओ बनवून अपलोड करेल, जस जस यश मिळत जाईल तस तस काम करत राहील  हेच आता ठरवलं आहे बाकी छान वाटलं आज, नोव्हेंबर २०२२ व येणार वर्ष माझ्या साठी चांगलं ठरेल अशी आशा बाळगतो.  

निष्कर्ष :-

तर मित्रांनो आणि त्या हजार जणांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी माझा youtube चॅनेल subscribe करून भरोसा दाखवल्या बद्धल मनापासून आभारी आहे. माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर होण्याचा वेगळाच आनंद असतो असाच आपला प्रवास चालत राहो अशी प्रर्थना करतो या पुढी हि वेळ मिळेल तसे तसे चांगले विडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल व प्रेरणादायी ठरला असेल जर हि माहिती आवडली तर शेयर करू शकता व माझ्या यूट्यूब चॅनेल ला सब्सक्राइब करू शकता तसेच मला सोसिअल नेटवर्क द्वारे फोल्लोव करू शकता. 

हे देखील वाचू शकता 

Youtube new update 2022 || यूट्यूब नवीन अपडेट

धन्यवाद. 🙏

 

 

1 thought on “My First Youtube Thousand Subscribers || माझे पहिले हजार युट्यूब सब्सक्राइबर || MIANILSHINDE”

Comments are closed.