खूप वर्षांपासून वाट पहात होते तो दिवस आज आला ।
दिवस २३ जुलै २०२० हा दिवस छान ठरला कित्येक वर्षापासून आज असल्या दिवसाची वाट पहात होते ते स्वप्न आज पूर्ण झाले आणि भारतातला सूर्य मावळा ….!!!
आर्यन अनन्या आणि वहिनी शेवटी दुबई ला आज पोहोचतील या दिवसाची कित्येक वर्षे वाट पाहत होते पण बोलतात ना जे नशिबात असते ते होते तस भरपूर वर्षांपासून याना तिकडे जायचं होतं दादा तिकडे असल्यामुळे त्यांना जायचं होते या वर्षी आर्यन अनन्या चे शाळेचे ऍडमिशन ही झालेले पण करोनाने गोंधळ केला नाहीतर एप्रिल लाच जाणार होते आता शाळा चालू होऊन परीक्षा होऊन या महिन्यापासून सुट्ट्या ही लागल्या म्हणून तिकडे जायचं होतं अखेर लॉक डाउन नंतर आजचे विमान चे तिकीट भेटले सर्व डोकमेन्ट एकत्र करून व्यवस्थित घेऊन गेले ।
आज घर ही खाली खाली वाटू लागले मनात थोडं वाईट वाटत कारण आर्यन अनन्या समोर मोठे झाले किती प्रेमाने संभाळ खूप प्रेम दिले जे हवे ते केले आजते लोक गेले एअरपोर्ट ला थोडं रडू येत होतं पण नाही रडू शकलो मास्क घातल्यावर समजले नाही तोंड झाकल्या मुळे दिसत नव्हतं पण खूप रडू येत होतं अचानक असे लांब जातात थोडं वाईट वाटत होतं घर खाली होणार होत आज सर्वात जास्त आई रडली
कारण मुलाला तर पहिलेच दुबई ला पाठवले आता नातू ही चालला बोलतात ना ते बंधन असते चांगली बॉण्ड असते तसे आर्यानं अनन्या आणि आमच्या मध्ये होतें खूप काही केले पोरांसाठी, पण आता तर मधव्या भावाची छोटी परी सुद्धा आहे घरी पण ती लहान आहे आर्यन अनन्या होये तेव्हा परीला सोडत न्हवते सारखे खेळवत होते
आता जेव्हा एअरपोर्ट वरून घरी आलो तेव्हा परी ला बघून मनात विचार येत होते अगदी तसच झाले आई ने परी ला घेतले परी सुद्धा शांत होती जसे आईने आर्यन अनन्या अस नाव घेतले तशी परी हसत हुंदके देऊ लागली आणि खुश होऊ लागली दीदी दादा असा आवाज दिला तर परी वाकू वाकू बघू लागली आत मधल्या खोलीत ते दिसतात का म्हणून
नाहीतर ते आता असते तर परी ला खेळवत बसले असते खूप आनंदात होत सर्व पण बोलतात ना जे होयचं ये होतच आणि होण्याला कोणी नाही टाळू शकत तास झाले जर बार झाले चांगले झाले आई ‘पपा पण ठीक आहेत आईने ही २०-२५ वर्षे काढली वडील आर्मी मध्ये असताना पण आजकाल जुन्या काळातल्या मुली भेटणं कठीण न समजदार पण आणि ते आजकालच्या पिढीतल्या मुलींना नाही जमायचं
चला जे झाले ते झाले चांगले झाले माहीत नाही आर्यन अनन्या दुबई वरून जेव्हा केव्हा परत येतील तर ते आमचेच आताचे आर्यन अनन्या असेल का ! ओळखतील का आतासारखे प्रेम देतील का माहीत नाही पण ठीक आहे जे होते ते चांगले होते खुश राहा शिका मोठे व्हा । आम्ही तुम्हाला खूप मिस करतो
ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आज आला आणि शेवटी आर्यन अनन्या वहिनी दुबईला दादा कडे गेल्या ।