रात्रीची वेळ कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक

नमस्कार मित्रांनो मी आज रात्री ११ ते १२ च्या सुमारास होतो कल्याण रेल्वे स्टेशन च्या परिसरात, काय चाललंय तिथे आज आपण आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत त्याच बरोबर विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत….

छोटे छोटे विडिओ क्लिप्स दाखवले आहेत की कश्याप्रकारे परिस्तिथी सध्या आहे कल्याण रेल्वे आणि बस स्थानकावर आहे, आपला या लेखाच्या माध्यमातून कोणाची मने दुखवण्याचा हेतू बिलकुल नाही पण कश्या प्रकारे परिस्तिथी सध्या आहे हे ह्या छोट्या छोट्या विडिओ च्या क्लिप द्वारे समजेल.
तर मित्रांनो मला काय म्हणायचं आहे हे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर समजून घ्या, त्या साठी विडिओ आणि माहिती संपूर्ण वाचा काही कमेंट्स असतील तर खाली करू शकता, एवढ्या चांगल्या ठिकाणी असे होत असेल काहीच सुधारणा नसेल तर काय फायदा असल्या कल्याण शहराचा!
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

 

हे आहे कल्याणचा बस स्थानक रात्रीचे ११ वाजल्यापासून हे बंद राहते इथे फक्त आणि फक्त गांजा आणि सिगारेट चा दुर्गंध येतो, बाजूलाच रेल्वे स्थानक आहे हाजरो लाखो प्रवाशी चाकरमानी कामावरून थकून येत असतात रिक्षा शोधतात खाण्यापिण्याची शोधतात पण ना बस स्थानकावर सरकारी खाण्यापिण्याची सोया ना रेल्वे च्या परिसरात, फक्त अंडा बुरजी ते ही बाजूला गांचा चा वास आणि दळभद्री पोर, कोण याची जबादारी घेऊन सर्व ठीक करणार ? व्यवस्तीत प्रवाश्यांना खाण्यापिण्याची २४ तास चांगली सोय करून देणार चांगली security देणार?

 

हा जो दुसरा विडिओ बघाल तर या महापुरुषचा फोटो दिसेल, पण कधी स्वतः इथे मोठा ऑफिसर, नेता रात्रीच्या १२ सुमारास गेले का? गेले असाल तर इथे फक्त गांजा चा वास दरवळतो, इथे खाण्यापिण्याची नाश्ता ही मिळतो ते फक्त अंडा बुर्जी पण का सरकारी जेवण चांगल्या स्थितीत भेटत नाही? का रात्रीच्या वेळेस हा बंद असतो? , पण का अशी अवस्था झाली कल्याण ची? का इथे कोणच secure आहे असं भासवून देत नाही? कोणत्याच नेता असो की समाज सेवक कोणाचाच इथे लक्ष नाही. सर्वGत्र टपोरी पोर, कोणत्या परिवाराची रात्रीची बस असेल त्याच कस होईल, का काही चांगले पाऊल उचलून कोण सुधारणा करत नाही?

 

ह्या विडिओ मध्ये पाहू शकता रात्रीच्या वेळीस कसं असत ते , काय अवस्था आहे बस स्थानकाच्या दुमजली बिल्डिंग ची, हे बस स्थानक आहे का कोणाचा अड्डा हेच समजत नाही, महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात असो व दुसरं राज्य त्याची बस स्थानक बघा एकदम चकचकीत, कल्याणच्या बाबतीत अस का, रात्रीचा चहा, सिगरेट ची छोटी दुकान , कुठं कोपऱ्यात गांजाडी पोर… कस कोण दुसऱ्या राज्यच माणूस इथं येईल आणि राहिल.. दुसऱ्या राज्यच सोडा आपल्याच मुंबई मधलं one कोण कल्याण मध्ये येणार काहीच secure अस वाटत नाही कोण सुधरवणार हे सर्व?

 

हे आहे कल्याण बस स्थानकातील शौचालय, पाहू शकता अवस्था आहे, कोणाचा परिवार कसा इथे येऊन थांबू शकतो, बर इथे भरोसा पण नाही कधी चोरी होईल, काहीच security दिसत नाही , ना धड लाईट ना बस स्थानकाची चांगली अवस्था, बाजूलाच रेल्वे स्थानक हजारो पब्लिक इथे येतात तशीच गर्दी जाणवू शकता पण स्टेशन बाहेर अंडा भुर्जी या शिवाय काहीच दिसत नाही, कोणती बस कुठे चालली हे ही समजत नाही, मी एक कल्याणकर म्हणून जे वाटत ते लिहत आहे कृपया तुम्हाला जर माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल तर खाली कंमेंट करू शकता, पण अश्या अवस्थतेत कोणाची फॅमिली थांबायचं म्हणून कस थांबेल असल्या ठिकाणी?

 

वर्षानुवर्षे न सुटलेला कल्याणचा प्रश्न तो म्हणजे कल्याणची ट्राफिक, ह्या विडिओ मध्ये पाहू शकता किती कल्याण बस स्थानक, कल्याण रेल्वे स्टेशन च्या बाजूला ट्रॅफिक, अक्षरशः नवीन माणसाला वेड लागेल, कस कल्याण शहराचं पर्यटन वाढेल?, मुंबई चे लोक तर अजून कल्याण ला एक गावच्या नजरेने बघतील,ना लाईन मध्ये रिक्षा, हॉर्नचा आवाज, छोटे छोटे दुकानं, त्यावर १८ वर्षाखालील मुलं, रात्रीच्या १२ चा हे दृश्य आहे , कस आपलं कल्याण सुधारणार, कधी लोकांना सुख सोय मिळणार देव जाणे.
वेळ होती रात्रीची खाण्यासाठी काहीच मिळत नव्हतं, सर्वत्र अंधार दिसत होता विडिओ मध्ये पाहू शकता कल्याण रेल्वे स्थानक kalyan platform no 1 च्या बाजूच दृश्य आहे , विडिओ मध्ये पाहत असा एक हॉटेल,  कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर भरपूर बसणारी लोक आहेत, पण या व्यतिरिक्त मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं जे नाही आवडत ते ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या समोर हे सर्व मांडतोय, रात्रीच्या ११:०० व १२:०० ह्या दरम्यान अगदी सामसूम भाग होता, ह्या हॉटेल शिवाय चांगलं जेवण कुठे भेटेल शंका होती.
बाकी सर्व ठीक आहे फक्त कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक थोडे व्यवस्तीत असायला हवे, ठीक ठाक जेवणाची व्यवस्था हवी, लाईट्स हाव्यत, या पैकी त्या भगत काहीच नाही, कल्याण एक गावप्रमाणेच, सर्वत्र ट्रॅफिक, रिक्षा, त्याच बरोबर रात्रीचं कोणती ही स्त्री स्वतःला कल्याण रेल्वे आणि बस स्थानक secure समजणार नाही , त्या साठी अश्या ठिकाणांना चांगली सुव्यवस्था हवी बस एवढंच.
आशा करतो सर्व ठीक होईल कसा वाटला हा ब्लॉग नक्की कंमेंट करा आणि काही सुजाव असेल तर नक्की कळवा.
धन्यवाद.

Leave a Comment