Shilphata Ganesh Ghol Mandir | शिळफाटा जवळील गणेश घोळ मंदिर

Shilphata Ganesh Ghol Mandir

Shilphata Ganesh Ghol Mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

Shilphata Ganesh Ghol Mandir: मुंबई हुन २९ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याहून १३३ किलोमीटर अंतरावर असणारे गुप्त गणपती मंदिर तर कोणी स्वयंभू घोळ गणेश मंदिर या नांवाने ओळखलं जाणारे ठाणे जिल्यामधील नवी-मुंबई आणि कल्याण या रस्त्यानं जोडणाऱ्या शिळफाटा पाईपलाईन रोड वरील हे गणपती बाप्पाचं मंदिर.

Shilphata Ganesh Mandir
Shilphata Road Ganesh Temple
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

खाली दिलेले सर्व फोटो नक्की पहा, हे मंदिर सुंदर आहेच आहे त्याच बरोबर थोडी माहिती दिली आहे. हे ठिकाण शांत व सुंदर होत परिवारासोबत किंवा मित्र मैत्रिणी सोबत इथे भेट देऊ शकता. हे मंदिर कल्याण शिळफाटा जवळ असलेल्या एका डोंगरावर आहे मंदिरपर्यंत पोहोचण्याकरिता २०० पायऱ्या आहेत यासाठी १० ते १५ मिनिट लागतात.

Shilphata Ganesh Mandir
Ganesh Temple Shilphata

निसर्गाच्या सौंदर्यामध्ये हे Shilphata Ganesh Mandir श्री गणेश घोळ मंदिर आहे, तिथे वेग-वेगळ्या प्रकारचे मंदिर आहे देवीची छोटी मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे, या मंदिराला संयंभू श्री गणेश मंदिर सुद्धा असं बोल जाते. जर तुम्ही कल्याणहून शिळफाटा मार्गे पाईपलाईन रोड ने महापे ला किंवा नवी मुंबई जात असाल तर शिळफाटा जवळ डोंगरावर हे गणेश मंदिर बघायला मिळेल.

Shilphata Ganesh Ghol Mandir Video

Shilphata Ganesh Mandir

मंदिरपर्यंत पोहोचण्यासाठी २०० पायऱ्या आहेत, पायऱ्या सुस्थित आहेत. असं बोल जातंय अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हे श्री गणेश घोळ मंदिर शहराच्या मधोमद हे सुंदर ठिकाण आहे, व आजूबाजूला गर्द हिरवीगार उंच उंच झाडे आहेत सर्वत्र विलक्षण असं दृश्य दिसत. तसेच तिथं कोणीही नसते. अफाट शांतात असते.

Shilphata Ganesh Mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

शिळफाटा पाईपलाईन ने जात असाल तर तुम्हाला हे गणेश मंदिरचे प्रवेशद्वार पाहायला मिळते. तसेच तिथहून पायऱ्या सुरवात होते खाली गाडी पार्किंग करण्यासाठी मोठी जागा आहे. आजूबाजूला चांगले दृश्य होते व उंच उंच झाडे होती. प्रवेशद्वाराजवळ मंदिरात पूजेसाठी लागणारे फुले, हार, अगरबत्ती खरेदी करण्यासाठी लहान स्टॉल बघायला मिळतो.

shilphata ganesh ghol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

मंदिरात जाण्याची उत्सुकता होती कारण समोरच्या रोड ने गेल्या ७-८ वर्ष प्रवास करतो पण कधी या मंदिराला भेट देता अली नव्हती. मंदिरच्या पहिल्या परिणीवर पाय ठेवताच नमस्कार केला, थोडं वरती गेलो उंच उंच झाडे दिसली व मागे पाहता थोडं उंचावर आल्याचं लक्ष्यात आलं व शिळफाटा परिसराच संपूर्ण दृश्य पाहायला मिळालं.

Ganesh Ghol Mandir Shilphata

वर मंदिरात काय काय बघायला मिळेल हे बघायचं होत मंदिर कसे आहे ते अनुभवच होत व गणपती बाप्पाचा दर्शन घायच होत म्हणून या शिळफाटा जवळील गणपती मंदिराला भेट देयची होती. खूप दिवसापासून इच्छा होत होती ती आज खरी होत होती. जाण्याअगोदर कोणत्याही प्रकारची इथली माहिती घेतली नव्हती. हे मंदिर जवळ असल्याकारणाने कधीही आपण इथे भेत देऊ शकतो असं वाटायचं.

Ganesh Ghol Mandir Shilphata
Shilphata Ganesh Ghol Mandir

थोड्या पायऱ्या चढून झाल्यावर खूप शांतात जाणवत होती. ५ मिनिटा अगोदर कानावर गाड्यचे हॉर्न ऐकू येत होते. मंदिराजवळ थोड्या अंतरावर सर्व अचानक बंद झाले व भयाण शांतात जाणवली. सर्वत्र हिरवीगार झाडे पाहायला मिळाली व विलक्षण मनात शांतात पसरली. थकवटीच्या दुनियेत थोडा ब्रेक मिळाला असं वाटत होत. पण थोड्या वेळाने दर्शन घेऊन ऑफिस ला कामावर जायचं होतं.

shhilphata ganesh mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

१०-१५ मिनटात मी मंदिरच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ पोहोचलो, सभोवताली वडाची झाडं बघायला मिळाली त्याच्या फांद्या लांब पर्यंत खाली लोळत होत्या. कर्द अशी झाडे मंदिरच्या बाजूला असल्यामुळे शहरातील गजबजपणा ऐकू येत नव्हता व खूप शांतता वाटत होती. मी वर जाताना कोणीही दिसत नव्हतं थोडी भीती वाटत होती पण मंदिर शहराच्या मध्य भागी असल्यामुळे थोडं ठीक वाटत होतं.

shilphata ganpati mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

प्रवेश द्वारातून पुढे जाताच खूप दगडे पाहायला मिळाली, दगडांवर राम राम लिहले होते म्हणून आपलेपणा वाटलं, मंदिर छान होत. आत शिरताच समोर एक झाड पाहायला मिळाले व त्यावर एक घर होते. पावसाचे दिवस असल्यामुळे छान वाटत होत, सकाळच अल्लादयी वातावरण थोडा अगरबत्तीचा धूर मंदिर परिसर छान वाटू लागला.

shilphata ganesh ghol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

Shilphata Ganesh Ghol Mandir View

पुढे पुढे जाताच समोर पाण्याचा नळ दिसला हात-पाय स्वच्छ धुऊन घेतले. तसेच माझा युट्युब साठी विडिओ देखील चालू होता सर्व आपल्या कॅमेरा मध्ये कैद करत होतो. पाय धुऊन झाल्यावर देवीची छान छोटी मूर्ती पाहायला मिळाली. व मंदिरासमोर बाबा राहत असणारे घर व घरच्या बाहेर बाबा तेथील महाराज (बाबा) बसलेले दिसतात आणि दोन-चार बाकडे बसण्यासाठी दिसतात.

Shilphata Ganesh Ghol Mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

समोर गणपतीचं मंदिर आहे मंदिराच्या बाहेर मस्त फुलांनी सजावट केलेला दरवाजा त्या बाजूला मोठा दगड आणि त्या खाली शंकरची पिंड आणि शंकरची मूर्ती बघायला मिळते व महाराजच्या (बाबाच्या) मागे देवतांची फोटो पाह्यला मिळते तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजचा फोटू देखील पाह्यला मिळतो. तसेच मंदिरच्या परिसरात साऊंड सिस्टिम असल्यामुळे मंत्र कानावर पडत होते.

shilphata ganesh ghol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

मंदिरच्या बाहेरच्या देवी-देवतांचं दर्शन झाल्यावर डावीकडे महाराज दिसतात बसलेले आणि समोरच शंकर च्या पिंडीचे दर्शन घेतले व श्री गणेश घोळ मंदिरआत जात होतो जाताना दरवाजा मस्त फुलांनी सजवलेला मंदिरात प्रवेश केला भल्या मोठ्या दगडातून गणपती आकारलेला दिसला आणि त्याच बाजूला गणपती बप्पाची नवीन मूर्ती बसवण्यात आलेली ती पाहिली, मंदिरात एकूण तीन गणपतीच्या मुर्त्या दिसल्या त्यातील एक दगडाला पैसे चिपकून ठेवलेले तो गणपती दिसतो आणि ३ मुर्त्या पैकी १ छोटीशी मूर्ती आणि २ नवीन मूर्ती दिसता.

ganesh ghol shilphata mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

भल्या मोठ्या दगडातून छोटा कोपरा त्यावर गणेश मंदिर बनवलं आहे त्याच बाजूला अजून काही नवीन गणपतीच्या मुर्त्या पाहायला भेटतात, या दगडाला गणपतीचं स्वरूप असून शेंदूर लावून पैसे चिपकलेले दिसतात. दोन्ही बाजूला नवीन आणि जुनी अश्या दोन्ही गणपतीच्या मूर्ती आहेत मंदिर चांगल्या प्रकारे बनवलं आहे आणि एकदम स्वच्छ साफ सूंदर होत.

gansh gjol murti shilphata
Shilphata Ganesh Ghol Mandir

मंदिराच्या बाहेर आल्यास समोर बाबा महाराजांची बसायची जागा आहे ते उघड आहे, इथे काही पुस्तके एक छोटासा TV पाह्यला भेटतो, त्यात असे समजते हा संपूर्ण एरिया CCTV कॅमेरा कैद आहे. त्या tv च्याबाजूला काही देव देवतांची फोटो पाहायला मिळतात, बाहेर बघताच तिथे हनुमानाचा रामाचा आणि शिव छत्रपती महाराजांचा फोटो पहायला भेटतो, आणि त्या आजूबाजूला बघतातच सर्वत्र शांती आणि थंड वातावरण पाहायला भेटते तिथंच महाराज पुजारी बसतात, आणि त्याच्या पाया पडून तिथून आपण पुढे आलो.

shilphata ganesh ghol mandiir
Shilphata Ganesh Ghol Mandir

गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यावर थोडा वेळ बसून मी तसाच श्री गणेश घोळ मंदिराच्या मागे पोहोचलो, मंदिरच्या मागून वरती जाणाऱ्या शिड्या दिसत होत्या, इथे waterfall आहे असं बोल जात पण बघताना काहीच अस दिसलं नाही, वेळेअभावी तिथं गेलो नाही, तिथे वॉटरफॉल आहे का ते बघायचं होत पण नाही बघता आलं. पण या ठिकाणावरून मंदिरच्या आजूबाजूच दृश्य दिसत होतं, महाराजचं ते झाडावरचं छोटस घर आणि हे मंदिरच्या मागून वरती जात असलेली शिडी, दगडाला शेंदूर फासलेला भला मोठा दगड हे सर्व बघायला मिळाले.

shilphata ganpati mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

स्वयंभू घोळ गणेश मंदिरच्या मागे सांगितल्या प्रमाणे गो शाळा होती १०-१५ राहतील एवढी मोठी पत्र्याच शेड होत. त्यात २-४ गायी होत्या, त्यातही आतून रेडिओ चा आवाज येत होता छान जागा कव्हर करून ठेवलेली, व मंदिर देखी छान बनवलं आहे. आजूबाजूला शांत वातावरण होते. हिरवीगार गवत होते छान वाटत होत मनाला शांती भेटतं होती, थोडा गायीला चारा चारला. नाही तरी शहरामध्ये चारा चारण्यासाठी पैसे दयावे लागतात इथे तस काही नव्हतं मस्त वाटत होत.

shilphata ganesh ghol madir
Shilphata Ganesh Ghol Mandir

मी तसेच आता निघत होतो मला तिथून ऑफिस ला सुद्धा जायचं होत म्हणून इथे एक भेट देण्यासाठी आलेलो. बरं सर्व झालं पुढे पुढे निघालो पुन्हा एकदा सर्वीकडे बघितलं विडिओ घेतला आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो. इथे एक आश्चर्यकारक गोष्ट झाली खाली निघालो जिथे पाय-हात धुतले बाजूला चप्पल होती ती घालून निघत होतो तेवड्यात ३-४ फुटाचा साप जाताना दिसला तो क्षण मोबाइलला मध्ये टिपताना साप पुढे-पुढे गेट जवळ पोहोचला, थोडा का होईना तो क्षण विडिओ मध्ये कैद झाला.

shilphata ganesh ghhol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

नंतर विचार केला जेव्हा मी आत मध्ये प्रवेश करत होतो तेव्हा का नाही दिसला मला, नंतर मी मोबाइल मधून सुरवाती पासून विडिओ चालूच होते ते सर्व विडिओ बघितले आणि त्यात सुरवातीच्या व्हिडीओ मध्ये साप दिसला, विडिओ काढताना माझं लक्ष गेलं नव्हते ते बोलतात ना मनात नसेल काही तर ते तुम्हाला नाही समजणार जेव्हा प्रत्येक्षात समोर दिसणार तेव्हा मन ला खरं वाटणार तस झालं, सुरवातीचा विडिओ बघताना मला त्यात दिसला, जिथून दगडामधून पाणी पडत होत त्या बाजूने साप खाली जाताना दिसत होता.

shilphata ganesh mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

गणपती घोळ मंदिर शिळफाटा हे थोड्याश्या उंच डोंगरावर एक शांत आणि सुंदर मंदिर आहे, आजूबाजूला शहर आहेत पण इथे आल्यावर तुम्ही ते हि विसरून जाल, असं हे ठिकाण १०० पायऱ्या असणार आहे आणि त्याच बरोबर मंदिरात येताना रस्त्यात आजूबाजूला छान हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. हे मंदिर अगदी जून आहे या बद्धल माहिती नाही हे कधी आणि कस बनलं, पण मला जेव्हा पासून माहित तेव्हा पासून मंदिर तिथेच आहे म्हणजे मला १५ वर्ष झाले पाहत आलोय हे मंदिर ते तसेच आहे खूप जून आहे.

shilphata ganesh ghol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

कल्याण हे शहर ट्रॅफिक आणि खराब रस्ते यामुळे ओळखतात आजकल, पण या पेक्षा कल्याण जवळ आणि कल्याण मधील खूप अश्या चांगल्या जागा आहेत ज्या तुम्ही भेट देऊ शकता, आणि याहून कल्याण मध्ये काही काही चांगले पण परिसर आहेत, जिथे चांगले रस्ते आणि व्यवस्थित राहणीमान असणारे लोक आणि परिसर आहे. तसेच या शिळफाटा गणेश मंदिरच्या समोरच खूप खड्डे देखील आहेत.

shilphata ganesh ghol mandir
Shilphata Ganesh Ghol Mandir

Shilphata Ganesh Mandir: शिळफाटा गणेश मंदिर हे कल्याण पासून १६ किलोमीटर अंतरावर आहे, हे मंदिर नवी मुंबई मध्ये मोडते, नवी मुंबई हुन महापे आणि तिथून पाईपलाईन रोड, शिळफाटा आणि ट्रॅफिक हे समीकर जोडलेलं आहे, आता सध्या शिळफाटा हा गजबजलेला क्षेत्र आहे इथून पनवेल, मुंब्रा ठाणे, कल्याण आणि नवीमुंबई अश्या चौघांना शहरांना जोडणारा चौक आहे.

श्री गणेश घोळ मंदिर शिळफाटा जवळच आहे खूप छान आणि जून मंदिर असल्या कारणाने जरूर एकदा तरी आपल्या परिवार सोबत भेट देऊ शकता. त्या नंतर त्यातून पुढे गेल्यावर गवळी देव मंदिर आणि धबधबा हे सुद्धा पाहायला भेटतो, त्याच अंतर लांब आहे, पण जर गूगल मॅप वर गवळी देव टाकल्यास जवळच आहे असं दिसते.

shilphata ganesh temple
Shilphata Ganesh Ghol Mandir

निष्कर्ष

तर मित्रांनो, कसा वाटलं हा Shilphata Ganesh Ghol Mandir लेख जर तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट करून सांगा व जास्तीत जास्त आपल्या व्यक्तीला व्हाट्सअप किंवा फेसबुक वर शेअर करा, तसेच जर माझे शब्द वर खाली झाल्यास क्षमा असावी, या शिळफाटा जवळील गणेश मंदिरची माहिती मला मराठी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवायची होती म्हणून ब्लॉग लिहत आहे, व कोणाला काही या मंदिरबद्धल अधिक माहित असल्यास खाली कंमेंट करू शकता.

धन्यवाद.

1 thought on “Shilphata Ganesh Ghol Mandir | शिळफाटा जवळील गणेश घोळ मंदिर”

Leave a Comment