श्री मलंग गड व हाजीमलंग गड, कल्याण
मलंग गड बद्धल माहिती
ठाणे जिल्हयातील कल्याण पासून दक्षिणेस सुमारे 16 कि.मी. अंतरावर आणि बदलापुर-अंबरनाथ रोड पासून 10 कि. मी. अंतरावर आत मधे मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते.
मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे, तसेच कल्याण आणि ठाण्यामधील श्री मलंग गड आणि दुर्गाडी किल्ले जवळ आहेत ते तुम्ही पाहू शकता
किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. आजूबाजूला उंच उंच डोंगर रांगा आहेत बदलापूर मधील कोंडेश्वर मंदिर सुद्धा याच मागे आहे मलंग गड ला जाताना जो अंबरनाथ – बदलापूर रोड लागतो त्या मार्गावर चिखलोली डॅम , बारवी डॅम व कोंडेश्वर मंदिर आणि सरळ माथेरान सुद्धा लागते
कल्याण वरून सकाळ पासून दिवसभरात मलंगड साठी तर अर्धा ते एक तासाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या बस सेवा असतात ते थेट गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवतात आणि दुसरं म्हणजे पनवेल पासून वावंजे गावांकरिता बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे आणि कल्याण वरून सुद्धा रिक्षा सेवा भेटते , गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते. दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो.
तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते. तसेच श्री मलंगगडाच्या दक्षिणेच्या समोरील बाजूस पनवेल तालुक्यातील (शिरवली गाव) आहे त्या गावा समोर एक आदिवासी कोंडपवाडी आहे त्या ठिकाणाहून एक सोपी पायवाट आहे. पूर्वी रोजी रोटी साठी गावकरी गडावर याच वाटेतून जात असत गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.
मलंगडावर जाण्याअगोदर काही टीप
मलंगडाची माहिती तुम्ही बघितली असाल आता काही टीप बघा एकदम थोडक्यात खूप महत्वपूर्ण टीप आहे आवडल्यास मित्रांबरोबर जरूर शेर करा तिथे तुम्हाला राहण्याची सोय उपलब्ध आहे दुसरं म्हणजे जेवणाची सोय आहे तिथे छोटे मोठे हॉटेल आहेत व इतर दुकाने सुद्धा आहेत गडाच्या पायथ्यशी आणि तिथे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आहे जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे व गडावर जाण्यासाठी पूर्ण २ तास लागतात तर तशी काळजी घेऊन या सोबत पाण्याची बाटली ठेवा लेमन ची गोळी ठेवा पूर्ण कपडे घाला शोज घाला पावसाळ्यात काळजीपूर्वक गड सर करा व वरील दिलेल्या माहिती प्रमाणे सर्व काळजी घ्या.
Bhau che vlog khup chhan astat
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद 🤗🙏