ब्लॉगर वर मराठी पोस्ट ला view नाही मिळत | Marathi Post No View on Blogger
भरपूर दिवस झाले मी पोस्ट करतोय ते ही दर दिवशी न चुकता
काय कारण असू शकेल कोणी बघत नाही view येत नाही ?
Reason बघूया काय असू शकतील।
मित्रांनो जस की माहीतच आहे ब्लॉग ब्लॉग्स वर पोस्ट करणे ब्लॉग्स कश्या प्रकारे लिहायचा असतो काय विषय निवडायचे असतात अश्या भरपूर माहिती YouTube वर आहे.
माझ्या या ब्लॉग्स ची सुरवात २०१२ साली झाली होती मी हे ब्लॉग्स असच वेळ घालवण्यासाठी आणि मला फोटोग्राफी चा छंद असल्यामुळे सुरू केलेला असच गूगल वर आपली माहिती कुठे साठवू शकतो आपले photos मला share करायला खूप आवडायचे ।
अचानक असे झाले तुमचा भरोसा नाही होणार माझे फोटोस गूगल वर माझ्या नावाने येऊ लागले म्हणझे गूगल वर अनिल शिंदे शोधलं तरी माझे फोटो येऊ लागले मग मी या ब्लॉगर वर आजून फोटोस काही ते ही माझेच स्वतःचाच टाकू लागलो, मला काहीच माहीत नव्हते ब्लॉगर काय आहे यांनी काय होत पैसे कमवू शकतो काहीच माहीत नव्हते।
ब्लॉग्स वर खूप फोटोस टाकत गेलो टाकत गेलो तसे माझे फोटो गूगल वर रँक होत गेले अगदी २०१२ ला सुरवात करत मी २०१८ पर्यंत फोटो टाकत होतो आणि काही मला आवडणाऱ्या पोस्ट मी माझ्या ब्लॉग्स वर टाकत होतो मराठी SMS, मुंबई विषय माहिती असे वेगवेगळे पोस्ट करत होतो।
२०२० साली मे महिन्यात मी पुन्हा ब्लॉग्स वर सुरवात केली मात्र आता कळायला लागले की ब्लॉग्स वरून आपण पैसे ही कमवू शकतो YouTube वर खूप विडिओ पाहिले बोध घेत मे महिण्यापासून मी दर रोज एक एक नवीन आणि स्वतःचा लिहून पोस्ट करत गेलो मी ही विचार करत गेलो माझ्या नशिबाची कळी केव्हा तरी खिलेल ।
मनात विचार आले आपण मराठी मधून पोस्ट करत जाऊया करण जेवढे ब्लॉग्स बद्दल गूगल बद्दल विडिओ पाहिले त्यात सर्व हेच बोलत होते की तुम्ही तुमच्या मातृभाषेत ब्लॉग्स लिहू शकता आणि याला खूप स्कोप आहे गरज आहे इंग्लिश ब्लॉग्स तर सर्व लिहत हिंदी सुद्धा लिहितात ।
मग मी एक डोमेन खरेदी केला GoDaddy varun आणि ब्लॉग्स च नाव सुचत नव्हते म्हणून anilblogs.in अस डोमेन ने सुरवात केली नंतर स्वतःच्या canon 700d मधून काढलेले फोटो अपलोड करत गेलो आणि त्या बद्धल थोडी थोडक्यात माहिती देत आलो माझा मोटो हाच होता की मला माझ्या मराठी बांधव पर्यंत पोहोचायचं आणि आपली माहिती मराठी मधून दयची ।
नंतर मी गूगल AdSense साठी सुद्धा apply केलं मात्र ते पेंडिंग मधेच आहे काही मास्टर लोक गूगल ब्लॉग्स चालू करून १ किंवा २ वर्ष्यातच चांगले सेट झाले पण मी २०१२ पासून ब्लॉग्स वर पोस्ट करत आलो आणि आता दररोज काही न काही जे मला वाटते माझा अनुभव सांगत असतो माझ्या स्वतःच्या गोष्टी सांगत असतो latest फोटोस व्हिडिओस टाकत असतो तरी सुद्धा या ब्लॉग्स वर view येत नाही .
का मराठी लोकांनी ब्लॉग्स चालू करू नयेत का हिंदी इंग्लिश मधेच सर्व करायचं का हिंदी इंग्लिश ब्लॉग्स ला कसे प्राधान्य भेटते आणि शिवाय कोण असा ब्लॉगर् पण भेटत नाहीये जो चांगली दिशा दाखवेल खूप कठीण आहे मित्रांनो ब्लॉगिंग मराठी मध्ये कस वाढवू अजून काय नवीन करू जे हवे ते मे केलं ।
आता लागतात मी चाळीस दिवसाहुन जास्त झाले दाररोज पोस्ट करतोय आता view मात्र खूपच म्हणझे खूप अगदी पाच बोटा मुजने इतके येतात मे ब्लॉगिंग सोडून दयावी का मी हा विचार करून ब्लॉग सुरू केलेला की आपल्या मराठी लोकांना मराठी मधून काही नवीन माहिती किंवा महाराष्ट्र मधील काही फोटो आनंदी कसे राहायचे माझे अनुभव देऊन त्यातून तुम्ही चांगले बोध घ्यावे ।
माझे दररोज एक ना एक पोस्ट असतेच असते पण view मात्र काहीच नाही पण जेव्हा मला ब्लॉगिंग बद्धल थोडं फार माहीत पडलं तेव्हा माझे viewers वेगवेगळ्या देशातून होते म म्हणून मी एक डोमेन घेऊन चांगले चांगले पोस्ट करून नंतर मी सुद्धा गूगल अडसेन्स साठी माझा ब्लॉग्स पाठवला मात्र तो अजून approved नाही झाला होणार ही नाही आणि मला माहिती आहे माझं तेवढ नशीब नाही तरी सुद्धा मी असेच पोस्ट करत असतो लोक ४-५ गूगल अडसेन्स घेऊन येतात मात्र मराठी लोकांना समजणार असा एक ही ब्लॉग नाही 😞