आई
हि खरी कथा आहे एका मित्राची त्याच्यावर खूप संकट आली ४ जाणंच कुटुंब त्यात छोटा भाऊ पहिलाच हिरावला गेला होता आणि आता कोरोनाने आई 🙁
हा शब्द किती शक्तिशाली आहे याचा अंदाज ही नसेल कोणाला आज झालेली घटना तुमच्या समोर मांडतो,
सांगण्यास अत्यंत दुःख होतंय पण सांगणं खूप गरजेचं आहे माझा एक मित्र आहे हल्ली २-३ वर्षे झाले मैत्री जमली तशी मैत्री लांबीचीच पण कस असताना समोरच्याला बघून आपलेपणा कळालाकी मैत्री आपोआप होते आणि घट्ट हो होते
आपुलकी आणि थोडं शिव्या वैगरे बिंदास बोलणं होत त्या भावाचं मनाने दिलदार आम्ही आताच लास्ट इयर ला नाशिक ट्रिप मारली भरपूर मज्जा मस्ती केली त्याच्या फॅमिली मध्ये ते दोन भाऊ आई वडील होते परिस्थिती नॉर्मल होती थोड्या वर्षांपूर्वी भावाचा अपघाती मृत्यु झाला त्या दुःखाला तुन त्याला आणि परिवाराला बाहेर निघायला वेळ लागला
खूप छान होत सर्व भावाच्या मृत्यु नंतर कसे बसे ते सावरले त्याच्या वडलांची नौकरी ही गेली होती आधीच नंतर ते त्याच्या घरातल्या बिजनेस कडे लक्ष देऊन होते आणि हा mba ची entrance परिक्षा देऊन चांगल्या मार्क्स पास ही झाला आता त्याला फॉर्म भरून mba ला ऍडमिशन घायचे होते govt कॉलेज मध्ये त्याने स्वतःच्या कमाईतून शिक्षण घेतले
घरा मध्ये आई वडील आणि तो खूप खुश होते आता मधेच करोना रोग ज्याने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे अजून त्यावर लस सुद्धा भेटली नाही 6 महिने होत आले त्या नंतर महाराष्ट्रात सुद्धा चांगलाच वाढत चालला प्रादुर्भाव बघता लॉक डाउन सुरू झाले त्याला mba साठी ऍडमिशन घायचे होते लॉक डाउन असल्यामुळे त्याचा एरिया सील करण्यात आला कारण करोना प्रादुर्भाव वाढत होता
त्याच्या इथे नंतर आता थोड्या दिवसापूर्वी लॉक डाउन शिथिल करण्यात आला थोडे दुकान सुरवात झाले तरी माझं आणि त्याच एवढं संभाषण न्हवते होत हालचाल कधी कधी विचारायचो माघील आठवड्या मध्ये विचारपूस झाली सर्व ठीक आहे हे ते झालं नंतर आता दोन दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला संगितले अरे त्याच्या आई आणि वडील याना ऍडमिट केलं आहे
अचानक थोडा धक्का बसला कारण करोनाची भीती ही मनात होतीच आणि नंतर त्याची ही अवस्था बघवत नव्हती दोन दिवस झालेले ऍडमिट होते आणि हा घरी एकटा कसा राहत असेल काय खात असेल मुलाचं आई आणि वडीलाशिवाय घर हे घर वाटतचं नाही बघा ना काय वेळ आहे ही स्वतःच्या आई आणि वडिलांना ही भेटता नाही कसा बस तो डब्बा वैगरे बनवून हॉस्पिटल ला दयाला जायचा
पहिली तर गोष्ट मला नंतर कळाली जेव्हा त्यांना ऍडमिट करायचं होतं एका ही हॉस्पिटल मध्ये घेतलं नाही नंतर ओळखीने त्यांना ऍडमिट करून घेतले दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये वाईट म्हणजे आई ला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि बाबा ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अस वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागलं चेकअप झाले रिपोर्ट्स ४-५ दिवसांनी येणार अस मानून ऍडमिट होते वडिलांची तबियातीत सुधार होत होता
पण आई च नव्हते होत काही, वडलांच्या अंगाला हात लावला तर ते सुद्धा गरम होते आई ने संध्याकाळी म्हणजे काळ संध्याकाळी त्याला फोन करून सांगितले अरे कधी आणशील जेवण त्याला कसबस येत होतं तसच त्याने दोन्ही डब्बे दोघांना पोहोचवले आणि या वेळेत आपल्या या वेळेत
कोण म्हणजे कोणीही येत नाही मदतीला कोण कोणाचं नसत तसच या वर पाली होती वडील ठीक होते थोडे त्याला आईची खूप काळजी वाटू लागली डब्बा पोहोचल्यानंतर त्याला बाहेर थांबवलं आईची तबियत अचानक खराब होत होती आईला डोळे ही उघडता येत नव्हतं जेवण ही जात नव्हते नंतर आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं तो पर्यंत तो तिथेच होता
त्याच्या बरोबर कोणच नव्हते तो घाबरला होता अंगावर काटे आले आम्ही कॉल करून विचारात होतो अगदी संध्याकाळचे रात्र होयला आली रात्री मी त्याला मॅसेज टाकले होते काळजी नको करू तू सर्व ठीक होईल बहुतेक त्याच मोबाईल च नेट बंद होते कॉल वर चालू केलं बोलणं रडत होता खूप आई डोळे नाही उगडत icu मध्ये घेऊन गेले हे बोला आम्ही खूप प्रार्थना केल्या रात्रभर झोप नाही ३ वाजले मित्राचा व्हाट्सएप वर मॅसेज आला त्याची आई ……. 😭
नंतर त्याला हॉस्पिटल मधून घरी पाठवले अजूनही वडलांपर्यंत खबर गेली नाही वाईट गोष्ट अशी की त्याच्या डोळ्या समोर त्याच्या आईच्या देह ला गुंडाळून पॅक करत होते 😭 या करोना पासून कोणच नाही वाचवू शकत मित्रांनो आपणच आपली काळजी घ्यावी अजून ही रिपोर्ट्स आले नाहीत जर रिपोर्ट्स positive आले तर त्याला ही isolated करावे लागेल 😢
असशील तशी जवळ ये ना गं आई
तुझ्या पदराखाली झाक ना गं आई
मग दिसणार नाही अंधार मला
काही काळ तरी
तेवढीच जगेल क्षणभर
ये ना गं आई ।।