अनाथ,निराधार,रोडवरील निर्धार गरीब लोकांसाठी २४ तास सेवा देणारा व मनोरुग्णचा कैवारी जुन्नर शहरामधील तरुण अक्षय मोहन बोऱ्हाडे बद्धल थोडी माहिती आपल्या ब्लॉग वर लिहत आहे.
अक्षय मोहन बोऱ्हाडे माहिती
अक्षय मोहन बोऱ्हाडे (कविकलश) वय (१७ मार्च १९९४) २६ वर्षे राहणार शिरोली बुद्रुक जुन्नर तालुका, शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हि संस्था त्याची त्या साठी काम करतात शासना कडून एक पैसा न घेता स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या मेहनती ने काम करतो त्याच्या मते या निराधार आणि गरजू व्यक्ती ना पैश्याची ना कश्याची गरज त्यांना गरज असते प्रेमाची आपुलकीची , आज पर्यंत त्याने १५२ मनोरुग्णांना बरे करून ३२ रुग्णाची काळजी घेतोय दिवसानुदिवस त्याच्या कडेच्या मानुरुग्णामध्ये वाढ होत चाललीये , घरात आई ,वडील, चुलत भाऊ , भाऊ, वाहिनी ,बायको सर्व जण त्याला साथ देतात.
अक्षय मोहन बोऱ्हाडे काम
अक्षय ने आज पर्यंत भरपूर रुग्ण काळजी घेत बरे केलेत, गरीब गरजू निराधार लोकांसाठी तो एकमेव व्यक्ती २४/७ झटतो , त्याला अनाथांचा कैवारी सुद्धा म्हणतात, अक्षय ची महाराजांबद्धल खूप निष्ठा त्यातूनच त्याला शक्ती आणि प्रेरणा भेटते आणि काम करण्यासाठी ऊर्जा भेटते, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य, बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे पालन करणा-या जुन्नर तालुक्यातील अक्षय गेल्या २ वर्ष पासून मनोरुग्णाची काळजी घेतोय , वेगवेगळ्या शहरातून गावातून तो मनोरुग्णांना स्वतः घरी घेऊन येतो आणि काळजी घेतो योग्य ती उपचार कारण अंघोळ घालणे , कपडे जेवण हे तो स्वतःच करत असतो , तस या व्यक्ती बद्धल कोणतेही ओळख नाहीये पण याच कार्य काम बघून या बद्धल लिहावंसं वाटलं अवघ्या २६ व्या वर्षी तो एवढे काम करतो कोणत्या शासना ला व सरकार ला हि जमणार नाही सामाजिक बांधिलकी जपत तो काम करत होता पण या १ -२ दिवसात-
अक्षय बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला
व या विरुद्ध आजच युवराज शंभाजीराजे छत्रपती त्याच्या मदतीस धावून आलेत त्यांनी त्याच्या फेसबुक च्या माध्यमातून जनतेस संवाद साधत आणि अक्षयच्या पाठी उभे राहिले आहेत आणि त्यात त्यांनी म्हंटले आहे – अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी वेदना देऊन गेली. शिवराय, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. अश्या प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे. पोलीस प्रशासनाने या घटने कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, याची तजवीज करण्यात यावी. कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? अक्षय बोऱ्हाडे च्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो. आता छत्रपती संभाजी महाराज स्वतः या रीगणात अक्षय बरोबर आहेत अक्षय भाऊ आता तुला घाबरायची गरज नाही तू तुझं कार्य पुढे असच चालू ठेव आणि दोषी वर कडक कारवाई हो पुन्हा कधी कोणत्याही सामाजिक आणि अक्षय भाऊ सारखे कार्यकारणाऱ्या कोणत्याही व्यक्ती बरोबर असे होऊ नये हीच देव चरनी प्रार्थना .