गोष्ट एका रात्रीची होती, navi mumbai theft बद्दल समोर घडलेला अनुभवाबद्धल आज आपण या ब्लॉग द्वारे मी आपल्या समोर सांगणार आहे, ज्याने करून तुम्हाला सुद्धा कळेल आणि त्या गोष्टी पासून बोध घ्याल.
मित्रांनो आपण कधी कठीण काळात असाल तेव्हा काय करायचं काय नाही करायचं ते समजत नाही, गोष्ट खूप लांबची नाही कालचीच आहे, या पूर्वी असा अनुभव कधीच नव्हता घडला जो काळ आमच्या बरोबर घडला आहे, हा ब्लॉग माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे जेवढा तुमच्यासाठी, ह्या ब्लॉग मधून सांगणार आहे, जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा कोणी ही आपली मदत करत नाही.
काल सकाळी ऑफिस ला निघालो पूर्णदिवस काम केलं छान असा दिवस गेला, usually सकाळचा मी स्वतःच्या wagnar ने ऑफिस साठी प्रवास करतो, कल्याण हुन ३४-३५ किलोमीटर रोजचा प्रवास असतो जो नवी मुंबई मधील बेलापूर पर्यंत असतो, सकाळी ११ ला निघतो, रात्री ११-११:३० होतात घरी परत येण्यासाठी, स्वतःची गाडी असल्यावर काही टेंशन नाही म्हणून आपल्या वेळेत जातो आणि येतो.
पूर्ण दिवस काम केल्यानंतर रात्री थोडी पार्टी वैगरे झाली नंतर त्यातच एका मित्राला जास्त झाल्या कारणाने त्याने रस्त्याच्या मधेच गाडी थांबवण्यास सांगितले, मला माहित होतं या ठिकाणी गाडी थांबवणं खूप खतरनाक ठरू शकत, रात्रीचे १२ वाजून गेलेले नवी मुंबई मधून निघालो, मित्राला थोडी जास्तच झाली कारण येता येता गाडीच्या मागच्या सीट वर तो आडवा झोपून होता, त्यामुळे त्याला कसं तरी होत असेल हे मी समजून घेत गाडी ५-१० मिनिटांसाठी थांबवली
नवी मुंबई मधून तुर्भे MIDC मार्गे महापे रोड वर पोहोचलो L&T Mhape जवळ रात्री २ ला ब्रिज उलांडून तिथे गाडी पोहोचली आणि मित्राने गाडी थांबवण्यास सांगितले, गाडी उभी केली बंद केली, मी ५-१० मिनिट थांबून निघेल असा विचार केला, १०मिनिटे झाली मी गाडी चालू केली तेवड्यात मित्र पुन्हा बोला थांब थांब इथंच थांबू मी त्याला विरोध केला, महापेचा L&T जवळील ब्रिज उतरून पेट्रोल पंप च्या पलीकडील बाजूस गाडी लावली.
थोड्या वेळाने मी आजू बाजूला पाहिले, कोणी दिसलं नाही मोठं मोठ्या गाड्या धावत होत्या ,रात्रीचे २:३० झाले मला घरी जायचं होतं पण ह्या मित्रा ला कस सोडायच, बर थोडी गाडी चालू केली पुढे घेतली तरी सुद्धा याला कस तरी होत होतं, मला वाटलं थोडयावेळ थांबून निघेल पण तसं काही झाले नाही, इथेच थांबण्याचा आग्रह त्याने केला, मला गाडी पुढे घेऊन दिली नाही त्याला शुद्ध नसल्या कारणाने मी समजून घेऊन गाडी बंद करत तिथेच थांबवली.
खूप वेळ झालेला रात्रीचे ३ वाजले घरी कसं जायचं, पण मला किती ही वेळ झाला तरी घरीच जाऊ वाटते, आणि या पूर्वी कधीच अस रस्त्याच्या बाजूला गाडी लावून झोपलो नव्हतो ते मला काल करावं लागलं, रात्रीचे ३ वाजले महापे रोड असल्यामुळे तिथे ट्रक जास्त असतात बाकी रात्री एवढ्या गाड्या नसतात, तसच बघत बघत मला ही डोळा लागला आणि मी सुद्धा झोपून घेतलं , गरम होत असल्यामुळे गाडी चालू करून AC चालू केली थोड्यावेळाने AC पुन्हा बंद केली आणि झोपून घेतले.
Navi mumbai theft incident |
सकाळी ५:३० वाजता अचानक गाडीच्या पाठीमागून मित्राचा आवाज आला, अज्ञान १ व्यक्ती दिसला, गाडीचा दरवाजा उगडा दिसला, मित्राचा मोबाईल तो काढून घेऊन, बाजूला एक अजून बाईक वर व्यक्ती होता, त्याच्या कडे माझी नजर गेली दुसरा व्यक्ती मी काय करतोय हे पाहत होता मी त्याला पाहिलं पण थोडासा काळोख असल्या मुळे स्पष्ट दिसले नाही, ते दोघे अज्ञान चोर बाईकवर बसले मित्राला गाडीचा दरवाजा बंद करायला सांगितले तसेच त्याच्या मागे गाडी पहिल्या घेअर मध्ये काढली पळवली त्याचा पाठलाग केला पण हाती काहीच लागलं नाही.
माझं अस मत होतं की त्यांना आपण काहीच करू शकत नाही कारण त्याच्याकडे काही न काही हतीयार शस्त्र वैगरे असतीलच त्यापेक्षा त्यांना गाडीवरूनच पाठलाग करून, त्याच्या गाडीला टेकून त्यांना पाडून पकडायचं असच माझं होत म्हणून गाडी पळवली, पुढेच थोड्या अंतरावर turbhe midc पोलीस स्टेशन होते मात्र ते काहीच कामच नव्हतं, त्यांनी आमची मदत करायचं सोडून वेळ घालवला असता म्हणून त्या चोराच्या मागे गेलो, त्याची बाईक पुढे दिसेनाशि झाली, हा रोड मुब्रा जातो म्हणून आम्ही समजून गेलो हे चोर मुंब्राचेच असतील.
थोड्या अंतरावर गाडी थांबवली, दोघे बाहेर निघालो, वेळ होती सकाळी ६ ची थोडा उजेड होत होता, मी माझा मोबाईल बघितला मला वाटलं माझा मोबाइल देखील त्याने लंपास केला, गाडीत शोधल्यावर माझा मोबाईल मला भेटला व मित्राच्या मोबाइलवर फोन करू लागले असता मोबाइलला चोरांनी flight mood ला टाकलेला समजलं, नंतर तिथून गपचूप आपलं घरी आलो, मित्राला घरापर्यंत पोहचवल्यावर त्याने आपल्या पँटीच्या पुढच्या एक खिश्याकडे बघितल्यावर ब्लेड मारल्याचा त्याला समजलं.
मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणत्याही रोड वर रात्रीच्या वेळेस बिलकुल थांबू नये, भले कोणताही रोड आपल्या ओळखीचा असो वा नसो, रोजचा रस्ता असो किंवा नसो पण रात्रीचा कधीच रोड वर थांबू नये ना अज्ञान व्यक्ती शी बोलू नये ना त्याच्या करिता थांबू नये, आजकाल चोरांचा प्रमाण वाढले आहे, अश्या प्रसंगात काहीच समजत नसते चोरांकडे धारधार शस्त्र असतात, त्यांना ते चालवताना काहीही वाटत नाही, म्हणून रोड वर बाईक असो किंवा मोठी गाडी बिलकुल थांबू नये.
तर मित्रानो आशा करतो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचला असाल आणि या ब्लॉग मधून काही तरी शिकायला मिळालं असेल, जर आवडल्यास बोध घ्या जागरूक राहावा, मित्राचा मोबाईल तर गेला पण असा वाईट अनुभव आमच्याबरोबर झाला तोच तुमच्या बरोबर नको होवू म्हणूनच हा ब्लॉग लिहला, नवी मुंबई मध्ये महापे रोड वर पाईपलाईन रोड किंवा मुब्रा रोड कुठे ही थांबू नये, तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या सोबत पण असं काही झालं का नक्की कळवा, मित्रांनो भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तूर्तास काळजी घ्या.
धन्यवाद….