हुरडा पार्टी म्हंटल की गाव आणि गाव म्हंटल की गावातील रानमेवा, ज्वारीचे कावळे दाणे ज्वारीचे कणीस लागल्यावर साधारण 30-40 दिवसातील दाणे कोवळे समजले जातात, रंगाने हिरवे आणि रसदार त्याचा बरोबर हिवाळ्यातीळ हुरडा पार्टी निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून गरम गरम दाणे खाणे म्हणजे सुख, व्हिडीओ मध्ये दाखवलं आहे संध्याकाळी मळ्यात निखार्यावर ज्वारीचा हुरडा आणि हरभरा भाजलेला.
हुरडा म्हणजे काय?
हुरडा हा शब्द सर्वाना माहीत असेल असे नाही, शहरात राहणाऱ्या लोकांना हा शब्द नवीन असेल, त्याच बरोबर मराठवाड्याच्या बाहेर लोकांना सुद्धा नवीन शब्द आहे.डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यंतरी हुरडा पार्टी होते.ज्यांना हुरडा बद्धल माहीत आहे ते याची वाट बघत असतात ज्वारीलवल्यास 30-40 दिवसांनी हुरडा खायला गावाला येतात. 180 ते 200 रुपये किलो असणारा हुरडा, शेतात कोवळा चटणीच्या चिमूटभर जिभेवर हुरडा खात खाणं वाह क्या बात खूप छान टेस्ट लागते.
हुरडा पार्टी वैगरे वैगरे तर बोलतच पण हे असं अचानक मध्ये झालं त्याच बरोबर माझा आवडता कोवळा हरभरा खायला मिळाला, असच एकत्र फॅमिली सोबत बसून असे क्षण घालवणं कदाचित कोणाला आता मिळत असतील.
गावाला 2-3 दिवसासाठी आलेलो काम असल्याने पण इकडे भरपूर दिवसाची ठिकाण या अश्यायाप्रकारे कमी होणार होती हे माहीत नव्हतं almost फेब्रुवारी महिना संपला आता गर्मीचे दिवस त्यात हुरडा मिळेल असा बिलकुल वाटलं नव्हतं, हा हुरडा आम्ही करमाळा जवळील केम शहरापासून 8-10 किलोमीटर वर असलेल्या गोटी या गावी केलेली.
थोडं लेट पण थेट कोवळा ज्वारचा हुरडा मात्र भेटला शेतीतून हिवाळा होऊन गेलाय आता उन्हाळा आला तरी मात्र अस वाटलं नव्हतं कोवळा हुरडा आणि हरभरा अश्या प्रकारे छान बसून संध्याकाळी भाजून खायला मिळेल.
बर त्याच बरोबर मित्रांनो हुरडा चे फायदे तुम्हाला माहित आहेत का ? या अँटी ऑक्सिडंट्सअसल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणून होतो, गहू प्रमाणे यात ग्लूटेन नसते हुरडा मध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्व आणि लोह मिळून शरीराची पचन सुधारण्याचा काम करतात.
हुरडा हा आपल्याया महाराष्ट्र राज्यात खूप प्रसिद्ध आहे, ज्यांना काही मिळत नाही ते लोक पुण्यामध्ये किंवा आजूबाजूला एक दिवस पिकनिक मानून फार्म हाऊस किंवा हॉटेल्स निवडतात व एक दिवस सुट्टीचा परिवारासोबत घालवतात, पण नशीब वाण असतात ते लोक ज्यांना स्वतःच्या शेतात बसून शेकोटी करून हुरडा खाण्यास मिळतो.
ह्या वेळेस हुरडा आणि हरभरा खाण्यासाठी मिळालें, मस्त शेतात संध्याकाळी छान अश्या वातावरणात आपल्या आई वडिलां आणि परिवारासोबत, हरबरा आणि हुरडा निखारीवर ठेवून गरमागरम खाण्यात मज्या काही वेगळीच होती, एवढं मात्र लक्ष्यात राहील खायचं तर गरमागरमच नाहीतर नाही.
कोवळा हुरडा आणि हरभरा मिळेल वाटलं नव्हतं पण मिळालं आम्ही शेतात असल्याने फक्त हुरडाच खायला मिळेल असा वाटत होते पण त्या सोबत तुम्हाला माहित आहे का तिखट चटणी असेल तर खूप भारी लागतो कोवळा हुरडा.
मित्रांनो hurda party near pune आजकाल खूप search होतंय गुगल ला म्हंटल त्याच पण उत्तर आपल्या ह्याच ब्लॉग मध्ये देऊन टाकू तर मित्रांनो kalpataru agro tourism, nature nestt agro tourism, Mahadik (fram) agro tourism krushi parytan असे अनेक agro tourism आहेत जिथे हुरडा पार्टी होते.
तर मित्रांनो काशी वाटली ही माहिती जरूर शेअर करा मित्रांसोबत आणि परिवारमध्ये त्याचबरोबर तुम्ही केलीत का अशी धमाल जर केली असल्यास कंमेंट करा आणि अनुभव सांगा.