शिवराज्याभिषेक सोहळा६ जून २०२२ | shivrajyabhishek sohala raigad

आताच्या माहिती नुसार या वर्षी ६ जून २०२२ (shivrajyabhishek sohala date 2022)  दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजेंनी दिली महत्वपुर्ण माहीती.

Shivrajybhishek sohala
Shivrajyabhishek Sohla Raigad 

Shivrajyabhishek Sohla Raigad

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. 

 

लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या रायगडवर यावर्षी होणाऱ्या सोहळ्याच्या (raigad shivrajybhishek 2022)चांगलाच आराखडा आखला आहे ज्याने करून आपल्या शिवभक्तांची गैरसोय होऊं नये म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांनी दखल घेत आपल्या शिवभक्तांची ६ जून २०२२ ला शिवराज्याभिषेक साठी येणाऱ्यासाठी चांगली सुखसोयी सर्व प्रकारची ५ व ६ जूनला होणाऱ्या सोहळ्यासाठी, गडावर कस येणं, कस खाली उतरणं व पार्किंग सर्व प्रकारची माहिती दिली आहे.

 

shivrajybhishek sohla

 

छत्रपती संभाजीराजे महाराज (Chatrapati Sambhaji Raje Maharaj) यांनी आपल्या सोशल नेट्ववर्कच्या माध्यमातून खाली दिलेल्या फोटो द्वारे महत्त्वपूर्ण माहिती रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी दिली आहे, महाराष्ट्रातील, भारतातील, जगातील सर्व शिव भक्त रायगडवर येत असतो त्याकरीता पार्किंग, राहण्याची सोय, गडावर जायचं कस, यायचं कसं ही संपूर्ण माहिती दिली आहे.


संभाजी महाराज यांनी सोशल नेटवर्किंगवर अशी माहिती दिली आहे – दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने  प्रत्येक शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी #दि५जून व #दि६जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा,  गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, अन्नछत्र, स्वच्छतागृह, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, महिलांच्या साठी करण्यात आलेली स्वंतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळ, पायथ्याचे अन्नछत्र, याची सर्व माहीती, नकाशे, #QR कोड च्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 

20220604 024019

 

अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांसाठी येण्यासाठी आणि जाण्यासाठी मार्गदर्शन, वाहन तळ, गडावर जाण्याचा व उतरण्याचा मार्ग, गडावर विविध सुविधा स्थळांचा नकाशा, लिंक वर उपलब्ध करून दिला आहे. तसेच या लिंक चा QR Code  पण उपलब्ध आहे, याचा वापर करू शकता.

 

FB IMG 1653830327227

 

वरील फोटोत पाहू शकता रायगड भवती पार्किंग स्पॉट दिले आहेत ज्याने करून योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या गाड्या पार्किंग करू शकता, कोझर गाव जवळ पार्किंग स्पॉट आहे , दुसरीकडे पाचाड गावात पार्किंग स्पॉट आहे, जेवढ लवकर येऊन दर्शन करून जाल तेवढ चांगलं, आपल्या गाड्या व्यवस्थित लावून लॉक कराव्यात.

 

FB IMG 1653830332097

 

वरील फोटो मध्ये पाहू शकता रायगड वरील ठिकाण नकाशा मध्ये दिला आहे, रायगडावर जाण्यासाठी मार्ग , रायगडावरील दरवाजे, रायगड रोपवे , रायगड पार्किंग स्पॉट, रायगड छावणी, रायगडवर पिण्याच्या पाण्याची सोय, रायगड मंडप, रायगड वर शौचालंय , अंघोळ व्यवस्था , औषध व्यवस्था अश्या सर्व सोयी रायगडवर शिवराज्यभिषेक साठी केल्या आहेत.

 

FB IMG 1653830334339
 

वरील फोटो मध्ये रायगडाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे जे माणगाव मार्गे रायगडावर येत असेल त्याच्या साठी काय कुठुन रस्ता आहे हे सांगितले आहे , आणि दुसरीकडे महाड मार्गे रायगड कडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे.मुंबई किंवा पुण्यातुन निघत असाल किंवा कोणत्याही ठिकाणं हुन निघत असाल तर प्रयत्न करा जेवढा लवकरात लवकर निघत येईल तेवढं.

महाराष्ट्रातून देशातील सर्व भागातून या शिवराज्यभिषेक सोहळ्यात सामील होण्या करतील लाखो शिवभक्तांची गर्दी रायगडवर ६ जून ला बघयला भेटते, वेगवेगळे खेळ, मर्दानी खेळ, ढोल, ताशाच्या आवाजात हा सोहळा पार पडला जातो, त्यावेळी वेगळ्याच आनंद असतो, छान वाटत जेव्हा आपली सर्व मराठी मुलं एकत्र येऊन हा सोहळ्यात सहभागी होतात, यातच दिसून येते मराठयांच्या हातात तलवारी ढोल तासाच्या गजरात रायगडवर आनंदाचं वातावरण असत. सकाळ सकाळी गड फिरायला सर्व ठिकाणं बघायला खूप छान वाटतं, त्यातच वेगवेगळे पोशाख घालून तिथे खेळ आणि बरच आनंदच वातावरण पाहायला मिळते.

आम्ही सुद्धा ऑफिस मधून भरपूर जण या सोहळ्यासाठी जात असतो, भरपूर मुलांचा ग्रुप मुंबईहून रायगड कडे जात असतात, ५ जून ला निघून रात्री पायथ्याशी पोहोचत नंतर गडावर चढतात, गडावर जाण्यासाठी ३-४ तास लागतात नाव नवीन लोकांना काही लोक २-२:३० तासात गड सर करतात आणि लवकरात लवकर फ्रेश होऊन सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहत गड फिरतात नंतर मर्दानी खेळ ढोल ताश्याच्या आवाजात गडावर दरवाज्या जवळ नंग्या तलवारी नाचावल्या जात दृश्य पाहून खूप आनंद होतो, त्या काळी जेव्हा महराजचं शिवराज्यभिषेक होत होता तेव्हा काय वातावरण असेल तेच त्या दिवशी म्हणजेच ६ जून ला पाहायला भेटत.

तर मित्रांनो कशी वाटली ही Shivrajybhishek Sohla माहिती नक्की कंमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, २०२२ शिवराज्याभिषेक चिरायू होऊ, ६ जून ला जात असाल तर योग्य ती काळजी घ्या गडावर अयोग्य होईल असं वागू नये, गडावर पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असाल तर तश्याच खाली सुद्धा घेऊन या , झाल्यास रायगड साफसफाई करा, रायगडावर कचरा होता कामा नये.

धन्यवाद ।।

Leave a Comment