Pandhari Sheth Phadke
Pandhari Sheth Phadke: २१ फेब्रुवारी दुपारच्या वेळेस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं हृदयविकार धक्याने निधन झाले आहे, पनवेल घरून ऑफिस ला जात असताना कार मध्ये पंढरीनाथ फडके याना हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखत निधन झाले. पनवेलच्या विहीघर मध्ये अखेरचा श्वास घेतला.
पंढरीनाथ शेठ फडके याना महाराष्ट्रात गोल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीकरिता झटणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला समस्त बैलगाडा प्रेमींसाठी ही दुःखाची बातमी आहे. त्याच नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, १०१० नंबरच्या गाडीच्या टपावर त्याचा प्रसिद्ध डान्स आणि त्याच्या बादल बैलाची क्रेझ हे चित्र समोर येत.
Pandharinath Phadke News
Pandhari Sheth Phadke News: त्याच्या या बातमीमुळे राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडके याना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा व मेंढा मिळायचा पण शर्यत जिंकण्याची मज्जा त्याच्या साठी वेगळी होती, त्याच्याकडे एकसोएक शर्यतीचे बैल होते, आतापर्यंत ४० ते ५०शर्यतीचे बैल त्यांनी राखून ठेवले होते.
Pandhari Sheth Phadke Pass Away
नेहमी बैलगाडा शर्यतीत जिंकणारा कोणताही बैल असो ते त्याला खरेदी करत असत. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरीनाथ फडके हे समीकरण होते. त्याच्याकडे असणारा महाराष्ट्रातील टॉप चा समजला जाणारा बैल बादल याने आतापर्यंत सुमते ११ लाखांची शर्यत जिंकली आहे. आज २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पंढरी शेठ फडके यांचं दुःखात निधन झाले तरी आपण सर्वांनी त्याच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून प्रार्थना करावी.
विहिघर वाला बिनजोड छकडेवाला…! Pandhari sheth phadke यांचं हेच ते गाणं, जे गावाखेड्यात तुफान वाजतंय गळ्यात किलोभर सोनं, ऑडी कार आणि खिशाला पिस्तुल घेऊन नेहमी मैदानात एन्ट्री करणारे पंढरी शेठ फडके हे नाव पनवेल जवळ राहणाऱ्या प्रत्येकाला माहीत, पंढरीनाथ ज्या बैलगाड्याच्या गाण्यामुळे प्रसिध्दीझोतात आले होते ते गाणं त्यांच्या निधनानंतर व्हायरल होत आहे.
तर मित्रांनो तुम्ही पण खाली कंमेंट द्वारे तुमच्या आठवणी व तसेच काही मॅसेज असतील तर खाली देऊ शकता व अश्या माहितीसाठी आपल्या या वेबसाईटवर दररोज भेट देऊ शकता धन्यवाद…
विहिघर वाला बिनजोड छकडेवाला..! श्री पांढरी शेठ फडके याना भावपूर्ण श्रद्धांजली🙏