नाशिक | कसारा घाट
आम्ही सर्व फॅमिली एकदा नाशिक ला चाललेलो आई संत निरंकारी बाबा त्यांना मानते त्यासाठी समागम भरतो त्या साठी गेलेलो, मी स्वतःचा कधी कसारा घाट हा दिवसात प्रकाशात नाही पहिला एकदा भरपूर वर्षे पूर्वी संध्याकाळी म्हणजे ७.३० वाजलेले तेव्हा पहिल्यांदा कसारा घाट कुठे आहे कसा आहे पहिल्यांदा पहिला तो पण धुक्या मध्ये पाहिलेला सह्याद्रीच्या पठारांवर वसलेला नाशिक रोड ला आहे तेव्हा माहित पडल कल्याण हुन १३६ किमी नाशिक मधेच कसारा घाट, आम्ही फॅमिली जाण्या अगोदर ठरवलेल सकाळी लवकर निघायचं सर्व तयारी करून ठेवलेली कारण फॅमिला ला तिथे २-३ दिवस राह्यचं होत सेवा करायची असते म्हणून सर्व लवकर झोपले रात्री आणि सकाळी खूप उशीर झाला अगदी दुपारी निघालो मला फक्त त्यांना नाशिक ला आणि समागम च्या जागेवर पोहोचवायचं होत आणि दुपारी प्रवास सुरु केला नाशिक साठी कल्याण हुन निघालो,
कल्याण हुन नाशिक ला जाण्यासाठी कल्याण शहरातून मूळ रस्ता आहे, त्या अगोदर शिवाजी महाराज चौक कल्याण नंतर पुढे दुर्गाडी किल्ले तिथून सरळ कल्याण फाटा रोड तिथून नाशिक रोड सरळ सरळ आहे वेळ दुपारची होती म्हणून पाणी सोबत जेवण सर्व घेतलं आई ला खूप आवडते मस्त असा प्रवास केल्यावर मध्ये कुठे थांबून झाडाखाली जेवण करणे हे सर्व आनंद तर आईला असं खूप आवडते म्हणून आम्ही सोबतीला महत्वाचे सर्व घेतल आता मला मी ड्राईव्ह करत असतो कुठे जायचं असत तर एक तर मोठ्या दादा ला येते ड्राईव्ह आणि मला, दादा न्हवता सो आम्ही फटाफट घाई करत निघालेलो एकतर उशीर झालेला आणि त्यात मला परत हि यायचं होत, निघालो मध्ये मस्त वाटेवर हिरवीगार झाडे मन शांत झालेले जरा रेफ्रेशमेंट वाटत होत ठरल्या प्रमाणे आम्ही मध्ये थांबलो झाड तर मी बघितलं नाही मला थोडा चहा घायचा होता म्हणून गाडी हॉटेल ला वळवली आणि मी माझा चहा आणि घरच्यांनी आणलेलं जेवण ते काढलं थोडं आणि हॉटेल मधून थोडं काय आहे अन्न वाया जात काम नये जेवण करताना हा फोट काढला ठिकाण होत कसारा घाट,
मी चहा घेतला बाकीजनाचं सुद्धा जेवण झालं नाशिक रोड हा रोड सुद्धा खूप छान होता वळणावळणाचा रास्ता घाट आजूबाजूचा सुंदर दृश्य आणि रोड वर खड्डे न्हवते पहिले म्हणून गाडी ड्राईव्ह करायला हि मज्जा येत होती कसारा घाट पाहण्यासाठी संध्याकाळ हि वेळ खूप छान मावळता सूर्य पाहण्यासाठी थांबतात नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आम्ही ७.३० वाजता पोहोचलो नाशिक ला नंतर ते ठिकाण शोधल घरच्यांना तिथे सोडवलं तिथून मी कल्याण साठी एकटा निघालो येताना गाडी नॉन स्टॉप आणल्यामुळे २ तासात पोहोचलो कारण रात्रीचा वेळ होता आणि पाहण्यासारखं हि काही न्हवत म्हणून लवकर कल्याण ला पोहोचलो आपल्या घरी तर हा होता आमचा नाशिक चा प्रवास हा प्रवास मी पहिल्यांदा त्या बाजूला केलेला पहिला प्रवास होता … कारण आमचं त्या बाजूला कोण नाही मी जातो तो मित्राबरोबर असच फिरायला खूप छान प्रवास होता हे शहर हि खूप छान आहे खूप काही पाहण्यासारखे सुद्धा आहे , नाशिक हे माझं गाव नाहीये पण मी २-३ वेळा जाऊन आलो मस्त अनुभव होता असच मी माझे अनुभव माझ्या काढलेल्या फोटो मधेय देत राही भेटूस्य पुढच्या पुढे.
धन्यवाद !