मित्रांची दुनिया आणि दुनियादारी | Friendship | mianilshinde

मित्रांची दुनिया आणि दुनियादारी

मित्र हा शब्द खूप मोठा शब्द आहे आणि तो मी समोर व्यक्त नाही करू शकत पण २-४ शब्द लिहतो मित्रासाठी आणि या फोटो बद्धल चे मनोगत आणि आम्ही काय काय आठवणी साठवल्या तश्या तर खूप आठवणी आहेत पण ऑफिस मधील अवलिया ची मज्जा जरा वेगळी होती.

 

२०१८ मधील हा फोटो आहे, आम्ही सर्व मित्र बेलापूर येथे कामाला असून सोबत २०१३ पासून आहोत,  एकूण ७ वर्षे पूर्ण झाले खूप साऱ्या ट्रिप केल्या, पावसात उन्हात मूवी साठी गेलो, हि ट्रिप जरा मजेदार होती, जुन्याकाळी लोकांकडे गाड्या नव्हत्या आता आहेत तसेच आम्ही १५ ते २० जणांनी पावसात ट्रिप काढली आणि जायचं कुठे हा विचार पडला कोणी कल्याण चा कोणी पनवेल कोणी चेंबूर तर कोणी नवीमुंबई चा,  सर्व एकत्र येऊन ३ जुलै २०२० ला ट्रिपला जायचं ठरवलं.

 

mitra

जायचं होत कर्जत साईड ला धबधब्यावर तो कोणता होता आता आठवत नाही पण हो खूप छान होता आत मध्ये होता तिथे खूप प्रसिद्ध  होता अरे हा पळसधरी waterfall  होता तो खूप प्रसिद्ध आहे तो खूप लोक जातात दर वर्षी जातात आम्ही हि ट्रिप निघालेली खूप आनंदाचे क्षण घालवले खूप आठवणी जमा केल्या एका दोघांच्या कार होत्या म्हणून सर्व एकत्र येऊ शकले आणि हि ट्रिप  शक्य झाली.

तेथील वातावरण खूप मनाला भावले खूपच छान होते खूप पाऊस होता मित्र, हॉटेल, भज्या, वडापाव आणि चहा.  असे दिवस कधी येतील परत माहित नाही पण येतील नक्कीच कारण अजून पण हे अवलिय सोबत आहेत ऑफिस मध्ये एकही अजून ऑफिस सोडून गेला नाही सर्व जण असेच राहिले म्हणजे मित्रञत्वाची जाणीव असणारे एकमेकांसाठी उणीव असणारे काळजी करणारे खूपच कमी भेटतात .

  पळसधरी धबदबा अगदी हाकेच्या अंतरावर 🙂 मस्करी करतोय एवढं पण जवळ नाहीये पण तस जवळच जर स्वतःची गाडी वैगरे असेल तर किंवा मित्राकडे कोणाकडे गाडी असेल तर छान आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही जात असाल तर सोबत जे मित्र आहेत ते कधी पण विश्वासू असायला हवा तरच मज्जा नाहीतर तुम्हाला सांगायची गरज नाही आजकाल भावनो कोणावर विश्वास नाहीये.

तुम्ही या ठिकाणी रेल्वे ने सुद्धा येऊ शकता आणि  स्वतःच्या गाडी ने सुद्धा रेल्वे ने येत असाल तर कर्जत खोपोली ट्रेन,  कल्याण किंवा कुठून येत असतात तिथून म्हणजे सेंट्रल लाईन वरून कर्जत खोपोली ट्रेन पकडून पळसधरी स्टेशन वर उतरू शकता व तिथून माहित नाही पण तुम्ही रिक्षा किंवा चालत येऊ शकता खूप जण या धबधब्यवर येतात कोणाला विचारलं तरी ते सांगतील

तर मित्रांनो कसा वाटलं लेख नक्की कळवा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया जरूर द्या

।। धन्यवाद ।।

#mianilshinde

Leave a Comment