Irshalgad Trek । इरशाळगड ट्रेक
हा भारतातील महाराष्ट्रातील कर्जत माथेरान आणि पनवेल दरम्यान एक किल्ला आहे. प्रबलगड हा एक शेजारी किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ मोठे नाही परंतु गडावर खडकातून अनेक पाण्याचे टाके आहेत मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावरच्या नेढ्यावर बसून पश्चिमेला पनवेल शहर तर पूर्वेला सह्याद्रीची अथांग डोंगररांग बघता येते. सर्वात जवळचे गाव इरशाळवाडी आहे.
नमस्कार मी अनिल शिंदे इर्शाळगड ची (irshalgad in marathi) जीवढी माहिती आहे तेव्हढी मी तुम्हापर्यंत पुरवत आहे जर काही राहील असेल व चुकली असेल तर क्षमा असावी तुम्हाला काही माहिती असल्यास आपल्या खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता.
इरशाळगड ट्रेक बद्धल आमचा अनुभव :-
इरशाळगड (irshalgad trek distance) चौक रेल्वेस्टेशन पासून ५.५ कि.मी अंतरावर आहे इरसाळगडापर्यंत जाताना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचता दमछाक होतो म्हणून सोबत energy ड्रिंक आणि पुरेपूर पाण्याची बाटली वैगरे ठेवा इरशाळगड ट्रेक हा नानिवली गावातून सुरु होतो इर्शाळगड शिखर हा मध्यम प्रकारचा किल्ला आहे जे चढण्यास २ तास लागतात आणि खाली उतरण्यास १ तास लागतो.
इरशाळगड irshalgad ला जाताना मधेच एक डोंगर लागतो आणि त्या डोंगरावर इरसाळवाडी हे गाव व वस्ती ही बोलू शकतो आपण, वस्ती पर्यंत जाता जाता थोडं थकल्यासारखं वाटत तिथे पाणी घेऊन पुढचा प्रवास सुरु केला जो एक तासाचा होता, इरसाळवाडी मधून निघताच इरसालदेवीचं (irshaldevi ) छोटासा मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरु केला
इरसाळवाडी Irshalwadi पासून गडापर्यंत जाणारा रस्ता पहले येणारे trekkers ट्रेकर्स नेहमी चुकतात आमच्या बरोबर तसेच काहीस होणार होत पण नाही झालं व्यवस्थित रित्या आम्ही गाडा वर पोहोचलो, गडावर (irshalgad) जाण्यासाठी रस्त्या मध्ये खुणा केल्या आहेत तसेच चालत चालत चढत गडावर पोहोचायचं आहे.
जर तुम्ही तुमच्या कार ने किंवा ट्रॅव्हल्स ने येत असाल तर कर्जत पनवेल व मुंबई पुणे जुना रस्ता तिथून चौक ह्या रेल्वे स्टेशन पासून आत मध्ये नानिवली गावात पार्किंग आहेआणि तिथूनच ट्रेक ला सुरवात होतो चौक हे एक रेल्वेस्टेशन आहे पुणे – भुसावळ ट्रेन अश्या काही गाड्या थांबतात आणि तिथून जातात चौक पासून नानिवली गाव आणि तिथून सुरवात irshalgad trek ट्रेक ला.
Irshalgad trek ट्रेक ला सुरवात करताना सर्व गोष्टीची काळजी घ्या उन्हामध्ये ट्रेक करू नका जर स्वतः जवळ शक्ती किंवा आत्मविश्वास असेल तर इर्शाळगड ट्रेक करू शकता नानिवली पासून डोंगरापर्यंत १० मिन लागतात नंतर चालत चालत एक भाला मोठा डोंगर लागेल तो ओलांडून इरशाळगड च्या पायथया पर्यंत इरशाळवाडी हि वस्ती लागेल तिथं पर्यंत पोहोचता पोहोचता २. ५ तास किंवा त्या हुन जास्त वेळ लागतो.
तो किल्ला डोंगरावर वसलेला आहे, इरशाळगड irshalgad height किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३७०० फूट उंच आहे, किल्ल्याचा ट्रेक ग्रेड अवघड आहे, जिथून ट्रेक सुरू होतो तेथून बेस गाव इरशाळवाडी, किल्ल्यावर जाण्यासाठी इरशाळवाडी गावातून एक तासाचा कालावधी लागेल. निवासस्थानाची सुविधा गडाच्या माथ्यावर उपलब्ध नाही, इरशाळवाडी येथून भोजन सुविधेची व्यवस्था केली जाऊ शकते. ट्रेक दरम्यान पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.
इरशाळगड ट्रेक (Irshalgad Trek)
हा किल्ला महाराष्ट्रातील कर्जत माथेरान ते पनवेल दरम्यान आहे. prabalgad, chanderi fort हे शेजारी किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ मोठे नाही परंतु खडकातून अनेक पाण्याच्या टाकीचे तुकडे आहेत. इर्शल पठार ते शिखर या मार्गावर पाण्याची टाकी आहे पाणी पिण्यायोग्य नाही शिखराच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कृत्रिम रॉक क्लाइम्बिंग उपकरणे असणे आवश्यक आहे. वरुन, आपण प्रबलगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा आणि माणिकगड किल्ले पाहू शकता.
इरशाळगड किल्ला कसे पोहोचेल (irshalgad fort how to reach)
रेल्वेमार्गाजवळ रेल्वे स्थानक कर्जत आहे. खासगी वाहनातून बेस गावाजवळ पनवेल एसटी बस किंवा खाजगी वाहन चौक फाटा पर्यंत उपलब्ध आहे, मुंबईहून रस्त्याचे अंतर ८० कि.मी. आहे आणि नवी मुंबई 45 कि.मी. व पुण्यात ११6 कि.मी. आहे.
इरशाळगड ट्रेकवर पहाण्यासारख्या गोष्टी (Things to See on Irshalgad Trek)
१. नैसर्गिक नेढे
२. मोरबे धरणाचे दृश्य
३. 3 पाण्याच्या टाक्या
४. इर्शाल्देवी देवीचे छोटे मंदिर
५. प्रबलगड आणि कर्नाळा किल्ल्याचे दृश्य
६. माथेरान पर्वत श्रेणीचे दृश्य
इर्शाळगड जवळ भेट देण्याची ठिकाणे:
१ . प्रबलगड किल्ला
२. कर्नाळा किल्ला
३. माथेरान
४.चंदेरी किल्ला
५. माणिकगड
६. मलंगगड
तर मित्रांनो इरशाळगड ट्रेक बद्धल (irshalgad in marathi) माहिती कशी वाटली नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कळवा काही चुकलं असल्यास क्षमा असावी जेवढी माहिती भेटतेय ती पोहोचवतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला माहित असावं म्हणून हे बीज पेरतोय गडकिल्ले आणि काही नवीन जागा ज्या आपल्याला माहित नाही ते दाखवतोय तर मित्रांनो इरशाळगड ट्रेक हा दमछाक करतो सुरवात असेल तर जवळ मुबलक पाणी ठेवा.
संपूर्ण माहिती साठी हा इरशाळगड ट्रेक (IRSHALGAD TREK) व्हिडिओ जरूर बघा लाईक करा चॅनेल subscribeकरा
|| धन्यवाद ||
#mianilshinde #irshalgadtrek #irshalgadinmarathi
Pune bhusaval, Bhusaval Pune train la chouk station var official stop nahi. Jar crossing asel tarach train yethe thambate nahitar stop nahi.