Online Voter Registration कस करायचं | नवीन वोटर कार्ड, मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढावे ?

आज आपण वाचणार आहोत नवीन वोटर कार्ड,  मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढावे ? नमस्कार मित्रांनो मी अनिल आपल्या सर्वांचं या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

 

मित्रांनो नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर त्या साठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आज मी तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलोय. मोबाइल अप्लिकेशन च्या माध्यमातून तुम्ही मतदान कार्ड साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. नवीन Online Voter Registration कस करायचं हे सर्व या पोस्ट मध्ये समजणार आहे तर लेख पूर्ण वाचा आणि हो जवळच्या व्यक्तीशी शेअर करायला विसरू नका. 
 
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोर (google play store) वर यायचं आहे. google play store वर search  करायचं आहे वोटर हेल्पलाईन (voter helpline) हे अँलिकेशन मिळेल. 
image
हे अप्लिकेशन इन्स्टॉल करून open करायचं आहे. हे अप्लिकेशन इन्स्टॉल होऊन उघडायचं आहे. Disclaimer  येईल तिथे तुम्हाला I  agree  करायचं आहे आणि next करायचं आहे next केल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही खाली एक option आहे शेवटी तिथे SKIP LOGIN वर क्लिक करायचं आहे बस. 
 
त्या नंतर तुमच्या समोर मेन होम पेज उगडेल भारत निर्वाचन आयोग ( Election Commission of India), तिथं तुम्हाला पाहिलं option दिले आहे, वोटर रेजिस्ट्रेशन (VOTER  REGISTRATION) हे option दिले असेल या वर क्लिक करा, पुढे जा तर तुम्हाला new voter registration  (form 6) हे मिळेल त्या वर क्लिक करायचं आहे. 
 
 New  Voter  Registration  (form 6) वर क्लिक केल्या नंतर New  Voter  Registration (Residing in India ) वर क्लिक करा, New  Voter  Registration (Residing in India ) या option वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला let’s start  वर क्लिक करायचं त्या नंतर तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल तो टाकायचा नंतर OTP विचारला जाईल जो मोबाइल वर येईल तो OTP टाकल्यानंतर तो मोबाईल नंबर verify होईल. 
 
मोबाईल नंबर verify झाल्यानंतर दुसरा पेज येईल तिथे विचारलं जाईल “तुम्ही पहिल्यांदा apply करत आहात का “
जर तुम्ही पहिल्यादा फॉर्म भरत असाल तर yes वर क्लिक करायचं आहे, नसेल तर No . त्या नंतर पुढे जायचं आहे. पुढे तुम्हाला भारत देशाचे नागरिक आहेत का असे विचारले जाईल, Are  you citizen of India  याच उत्तर द्याचं त्या नंतर next करायचं आहे. 
 
सिटीझन माहिती दिल्यानंतर पुढे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल त्यात state निवडायचं date of birth (१८ वर्ष पूर्ण हवं), त्या नंतर Birth Documents  विचारले जाईल ते अपलोड करावे लागतील,  relevant document अपलोड करावे लागतील, यामध्ये तुम्ही पुढील पैकी काही हि घेऊ शकता जसं कि  Aadhar card, Birth Certificate, Marksheet of class 10 or 8 or 5, Indian Passport, PAN Card, Driving License, Baptism Certificate. 
 
तुम्ही हे document अगोदरच तुमच्या मोबाइल मध्ये save करून ठेवा, तुमचा स्वतःचा फोटो, आधार कार्ड आणि pan card पैकी किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन काहीही जन्म तारीख म्हणून पुरावा म्हणून अपलोड करावा लागेल.  maximum २ MB  पर्यंत तुम्ही जन्म तारीख पुरावा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नंतर थोडीशी तुमच्या बद्धल माहिती द्यावी लागेल. 
 
२ MB  पर्यंत document  आणि फोटो अपलोड झाल्यावर, Male – Female -Other  जे आहे ते निवडायचं आहे, तुमचं नाव टाकायचे नंतर Name (In Regional ) हे ऑटोमॅटिक येईल जे काय आहे ते मराठी असला तर मराठी मधून, नंतर तुम्हाला आडनाव टाकायचं आहे, नंतर अपंग आहेत का विचारलं जाईल जे काही असेल ते उत्तर द्या, जर अपंग वैगरे नसाल तर ते तसेच ठेवून पुढे जाऊ शकता. 
 
नंतर तुम्हाला Name Of Relative विचारले जाईल तिथे तुम्हीं वडील ,आई, बहीण, भाऊ, नवरा, बायको याचे नाव टाकायचे, नंतर त्या व्यक्तीचे नातं टाकायचं नंतर (Relative Epic Number  (If issued) म्हणजे मतदान कार्ड नंबर विचारला जाईल असेल तर टाका नसेल तर सोडून द्या, नंतर नाते विचारले जाईल ते select करा आणि पुढे जावा, पुढे गेल्यावर तुम्हाला पुढचा पेज येईल. 
 
नंतर तुम्हाला आता पत्ता टाकायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मतदान यादी मध्ये नाव लावायचं आहे त्या मतदान क्षेत्राचा पत्ता टाकायचा आहे, हाऊस नंबर, एरिया टाकायचा आहे पोस्ट ऑफिस, गावाचा नाव, शहराचं नाव, पिन कोड त्या नंतर आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा च नाव सिलेक्ट करा, नंतर तुम्हाला Assembly Constituency सिलेक्ट करायचं आहे – म्हणजे कोणता मतदार संघ आहे तो सीलेक्ट करा, नंतर तुम्हाला पुन्हा एकदा document अपलोड करायचे आहे. 
 
Address Proof  Document साठी पुन्हा document अपलोड करायचे आहे त्यात तुम्हाला पुढील document विचारले जातील अपलोड करण्यासाठी Indian Passport, Driving License, Bank/Kisan/post office Current pass book, ration card, income tax assessment order, rent agreement, water bill, telephone bill, electricity bill, Gas Connection  Bill, homeless , Post /latter /mail delivered by Indian p. काय असेल तुमच्याकडे ते document पुरावा म्हणून तिथे अपलोड करा.  फक्त २ MB पर्यंत document अपलोड होतो याची नोंद घ्या, नंतर नेक्स्ट करा. 
 
 
पुढे तुम्हाला आता Declaration दयावे लागेल त्यात तुम्ही जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर तुम्ही किती वर्ष्यापासून राहताय ती तारीख आहे ती तारीख तुम्हाला द्यावी लागेल, त्या नंतर तुमचं नाव टाकायचं नंतर place टाकायचं आहे आणि done करायचं आहे, Done केल्यानंतर तुमच्या समोर जी माहिती येईल ती पूर्णपणे नीट पाहायची आहे सगळी माहिती चेक करायची आणि त्या नंतरच शेवटी एक Confirm एक पर्याय येईल तो Confirm करायचा आहे 
 
Confirm केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन समिट झाले आहे, वोटर कार्ड साठी Thank  You असा दिसेल, तसेच थोडा वेळ थांबा. थोडावेळ थांबल्यावर तुम्हाला message सुद्धा येईल,आणि शिवाय तुमच्या स्क्रीनवर Thank  You  चा जो स्क्रीन असेल त्याचा screenshot काढायचा, या वरती स्क्रीन वर एक reference number तुम्हाला देण्यात येईल, तुमचा हा रेफेरन्स नंबर copy करून ठेवा, तुम्हाला तुम्हाला हा रेफेरन्स नंबर पुढे लागणार आहे. 
 
मित्रांनो आता आपल्या पहिल्या होमपेज वर यायचं आहे, त्यात खाली कोपऱ्यात explore हा पर्याय आहे, option आहे ते निवडायचं आहे, त्यात आपलं स्टेटस चेक करत राहायचं आहे, तर explore मध्ये आलात तर तिथे status  of  application या option वर क्लिक करायचं आहे, तुमचा जो reference id रेफेरन्स नंबर आहे तो टाकायचा आहे, पेस्ट करायचा आहे आणि ट्रॅक स्टेटस वर क्लिक करायचं, ट्रॅक स्टेटस वर क्लिक केल्या नंतर तुमचा application submit दाखवेल, त्या नंतर काही दिवसांनी बेलो अँपॉईंट (BLO Appointed) होईल, त्या नंतर तुमचे document चेक होतील, document verify झाले, तुमची माहिती व्यवस्थित असेल, तर तुमचे जे अँप्लिकेशन जे आहे ते कन्फर्म होईल. 
 
१ ते २ महिने जे या प्रोसेस ला लागू शकतात, या नंतर तुमचं जे वोटर कार्ड आहे ते ग्रामपंचायत किंवा पोस्ट ऑफिस मधून भेटून जाईल, फक्त वोटर कार्ड तुमच्या घरी येण्यासाठी वेळ लागतो १ वर्ष २ वर्ष सुद्धा लागू शकतात, आणि तुमचं मतदान यादी मध्ये नाव जे आहे ते तुमचं अँप्लिकेशन accepted  झाल्यावर लागू शकत. 
 
तर मित्रांनो तुम्ही या प्रकारे नवीन वोटर कार्ड,  मतदान कार्ड ऑनलाईन हि काढू शकता, मित्रांनो हि माहिती कशी वाटली नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा , जर रजिस्टर नसेल केलं तर करीन घ्या आणि नवीन वोटर कार्ड आणि मतदान कार्ड मिळवा. 
 
।। धन्यवाद ।।

Leave a Comment