Krushi Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कृषी विभागात या पदांवर नोकरीची सुवर्णसंधी…

Krushi Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कृषी विभाग आणि ऑटो-रिलायन्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र पुरस्कृत योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांना “पाठपुरावा/व्यवस्थापन सहाय्य” देण्यासाठी रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृषी विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असलेल्या या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली असल्याचं दिसून येत आहे.

Krushi Vibhag Bharti 2024
Krushi Vibhag Bharti 2024

भरती प्रक्रिया आणि अर्ज करण्याची माहिती | Krushi Vibhag Bharti 2024 Recruitment Details

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

कृषी विभागाने जिल्हास्तरीय रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Person – DRP) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृषी विभागाने ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि अर्जाची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2024 अशी निश्चित केली गेली आहे. इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

भरती करणारी संस्था: कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी विभाग यांच्याद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

भरती श्रेणी: राज्य सरकार (महाराष्ट्र सरकार) अंतर्गत ही भरती होत आहे.

पदाचे नाव: जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Person – DRP)

शैक्षणिक पात्रता | Krushi Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria

उमेदवाराने कोणत्याही राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

तसेच कृषी, अन्न तंत्रज्ञान किंवा संबंधित क्षेत्रात तंत्रज्ञान विकास, उत्पादन गुणवत्ता हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन, नवीन उत्पादन विकास या क्षेत्रात 3-5 वर्षांचा कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

प्राधान्य: सेवानिवृत्त बँक अधिकारी, सरकारी अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट (सीए), कन्सल्टिंग फर्म, फ्रेंडली बँक ऑफिसर किंवा विमा एजंट यांना प्राधान्य दिले जाईल.

विद्यापीठ/अन्न तंत्रज्ञान संस्था/कृषी अभियांत्रिकी संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांना देखील प्राधान्य राहील.

हे देखील वाचू शकता: MAHA Security Recruitment: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाद्वारे भरती सुरू…; पगार दरमहा 35,000/-

भरती प्रक्रियेतील अटी आणि शर्ती | Krushi Vibhag Bharti 2024 Terms and Conditions

  • अर्जदारांनी त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाचे कागदपत्र अर्जासोबत सादर करणे अतिशय आवश्यक असणार आहे.
  • या भरती अंतर्गत होणारी अर्ज प्रक्रिया ही संपूर्णतः ऑफलाइन असणार आहे आणि यासाठीची अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 19 सप्टेंबर 2024 असणार आहे.
  • कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना आधी प्राधान्य दिले जाईल. Krushi Vibhag Bharti 2024
  • निवड झालेल्या उमेदवारांना जिल्ह्यात कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.
  • निवडीनंतर उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल.
  • शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार नाही आहे हे लक्षात घ्यावे.

मुलाखतीसाठी विशेष सूचना | Krushi Vibhag Bharti 2024 Some Important Tips

  • या पदासाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. वेळेत हजर नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • निवडीनंतर मानधन तत्त्वावर तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल.
  • काम समाधानकारक नसल्यास निवड रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. Krushi Vibhag Bharti 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली कार्यालय,
मध्यवर्ती प्रशासन इमारत, सांगली-मिरज रोड,
विजयनगर, सांगली – 416415

अधिकृत वेबसाईट👉  इथे क्लिक करा

जाहिरात👉  इथे क्लिक करा

निष्कर्ष:

या पोस्ट मध्ये Krushi Vibhag Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment